✍ बाबानी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी तिसरा नियम "अनेक वाईट व्यसन बंद करणे (दारू, टानिक इत्यादी..)" या नियमाचा अर्थ काय ?❓ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

✍ बाबानी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी तिसरा नियम "अनेक वाईट व्यसन बंद करणे (दारू, टानिक इत्यादी..)" या नियमाचा अर्थ काय ?❓

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

दिनांक : १० ते १६ नोव्हेंबर २०१८

 चर्चा बैठकीचे विषय 】

✍  बाबानी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी तिसरा नियम   "अनेक वाईट व्यसन बंद करणे (दारू, टानिक इत्यादी..)" या  नियमाचा अर्थ काय  ❓  

【 विचार क्रमांक १ 】

➢ जीवनात चालण्याकरिता गृहस्थी उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी तिसरा नियम:-


➢ "अनेक वाईट व्यसन बंद करणे (दारू, टॉनिक, सट्टा, जुआ, लॉटरी, पटाची होळ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे)", 'स्त्रियांनी आपल्या मुलांना व पतीदेवाला वाईट शब्दात बोलू नये', या शिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.

➢ बाबांनी आपल्याला या नियमांमध्ये अनेक वाईट व्यसन बंद करायला सांगितले आहेत. कारण आपले जीवन अधिक सुखमय आणि आनंदी बनवायचे असेल तर या वाईट व्यसनाचा आपल्या जीवनातून त्याग करावा लागेल. ही सर्व व्यसने आपली गृहस्थी खाली आणण्याकरिता कारणीभूत आहेत. या व्यसनाचा जर आपण अधीन झालो. तर आपले जीवनमान कधीही उंचावू शकणार नाही आणि आपले शारीरिक नुकसान होईल. या शिवाय आपले जीवनात नैराश्य निर्माण होईल. 

➢ या व्यसनाचा सुरुवातीला आनंद उपभोगले. तरी पण शेवटी त्यांचे नुकसान अधिक दिसून येतात. म्हणून प्रत्येक सेवकांनी, समाजानी या गोष्टीचा त्याग करायला हवा. ज्यामुळे आपले जीवन अधिक सुखमय होण्यास मदत होईल. 

➢ खरचं जर या वाईट व्यसनाचा त्याग केला. तर कुन्याही सेवकांचा किंवा मानवाच्या संसाररूपी रथाच्या गाडीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. आपले लक्ष एका भगवंताकडे राहील. वाईट मार्गाने जाणार पैसा बचत होईल. वाईट भावनेचा नाश होईल. मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होईल व व सर्व नियमाचे पालन करणे सुलभ होईल. 

➢ "स्त्रियांनी आपल्या मुलांना व पतीदेवाला वाईट शब्दात बोलू नये"

➢ स्त्री ही कुंटुंबात समाजात आपल्या खास शैलीमुळे वेगळे स्थान निर्माण करीत असते. स्त्रीचे संस्कार हे प्रत्येक मुलांना त्यांचे जडणघडन करण्यास उपयुक्त ठरतात. त्या स्त्रीने आपल्या मुलाला ज्याप्रकारे शिकवले. त्याप्रकारचे संस्कार त्या मुलावर होत असतात. 

➢ एका स्त्रीमुळेच एवढे मोठे शिवाजी महाराज निर्माण झाले. ते तिच्या संस्कारामुळेच म्हणून आपण आपल्यापेक्षा मोठ्याला किंवा लहाण्याला वाईट शब्दात बोलू नये. तसेच स्त्रियांनी किंवा कुठल्याही सेवकांनी आपल्या शब्दावर नियंत्रण ठेऊन बोलायला हवे. 
याशिवाय कोणतेही वाईट व्यसन बंद करणे. (निंदा करणे, वाईट भावनेचा त्याग करणे)

➢ माझ्या लिहण्यात काही चुकभुल झाली असेल, तर स्वयंम भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच मातोश्री वाराणसी आई व सर्व सेवक दादा व ताई मला माफ करतील. अशी मी सर्वाना विनंती करतो. 

सेवक : प्रशांत मानापुरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


【 विचार क्रमांक २ 】




!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!

!!महानत्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम!!
!!परमात्मा एक !!

➢ बाबांनी जिवनात जगण्याकरिता मानवाची ग्रती उंच आण्याकरिता बाबांनी सेवकाला पाच नियम दिलेले आहेत त्यापैकी तिसरा नियम आहे अनेक वाईट व्यसन बंद करणे दारू टानिक सट्टा जुवा लाट्री तिकीट पटाची होड कोबद्याची काती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे स्त्रियांनी मुलाबाळांना व पती देवाला वाईट शब्दात बोलू नये याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.

➢ मनुष्य हा रोज च्या जिवनात जगत असतानी त्याचा विविध प्रकारचा व्यक्ती सोबत संपर्क येत असतात त्यामध्ये काही व्यसनी असतात तर काही खोटे व्यवहार करतात.परंतु आपण त्या मनुष्य सोबत व्यवहार करतांनी बाबांनी आपल्याला जे नियम दिले आहेत त्याचा भान असणे हे अत्यंत गरजेचे आहे .आज आपला सर्वांचा उदाहरण म्हणजे आपण अनेकात असतानी अनेक प्रकारचे व्यसन असतो त्यामुळे आपली जे घर ग्रस्ती असते ते खालवत जात असते उदा. दारू ,सट्टा जुव्वा असे अनेक प्रकारचे व्यसन असतो.परंतु जेव्हा आपण परमात्मा एक या मार्गाची धाव घेतो तेव्हा हे सर्वच व्यसन बंद होतात व या सर्व प्रकारात जाणारा पैसा हा वाचत असतो .तसेच त्यानंतर राग आणणे म्हणजेच प्रत्येक व्यतीला राग येत असतो राग हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे .ज्याने रागावर नियंत्रण केले त्याने आपले जीवन हे सफल केले असे म्हणेन आहे जेव्हा आपणास राग येतो तेव्हा न बोलणारा शब्द हा आपल्या मुखातून निघून जातो ज्या क्षणी आपणास राग येतो त्या क्षणी आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडने हाच एक योग्य उपाय आहे.त्यानंतर स्त्रियांना मुलाबाळांना व पती देवाला वाईट शब्दात बोलू नये जर असे बोल्यास राग निर्माण होऊन वाईट शब्द हे निघू शकतात आणि नंतर मानवी जीवन खाली आणणारा अशा कोणताही वाईट व्यसन करू नये या करिता आपल्याला हा नियम दिलेला आहे.

➢ माझ्या लिहण्यात काही चुका झाल्या असतील तर मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी न माफी मागतो महान त्यागी बाबा जुमदेवजी ना माफी मागतो आई वाराणशी ला शुद्धा माफी मागतो सर्व सेवक दादा व सर्व सेवकीन ताईना माफी मागतो.


सेवक : राजेंद्र ढबाले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


【 विचार क्रमांक ३ 】


➢ जीवनात चालण्याकरिता गृहस्ती उच्च आणण्याकरीता मानवी जीवनाचे अनेक उददेश सफल करण्याकरीता बाबांनी पाच नियम दिले आहेत,,,,,,,,,
➢ त्यातील तिसरा नियम ::- अनेक वाईट व्यसन बंद करने,,,यावर मि माझ्यापरिने विचार व्यक्त करत आहे.........

➢ आपण अनेक मध्ये होतो तेव्हा खुप व्यसनाच्या आहारी पडलो होतो,जसे, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होड लावणे हे व्यसन असल्यामुळे आपली गृहस्थी खुप खालावलेली होती, कितीही कमाई केले तरी ते पुरणासे होते, त्यामुळे खायला अन्न मिळू शकत नव्हते मुलांचे शिक्षण होऊ शकत नव्हते, अंगाला वस्त्र नाही अशी परिस्थिति होती, नंतर या मार्गाचा स्विकार केला, या मार्गात आल्यावर ध्येयाने एका परमेश्वरला मानलो व सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात तसेच कुटुंबात ठेऊन, अनेक व्यसनाच्या दुर झालो, पण असे नव्हे कि फक्त दारु टॉनिक सट्टा जुवा लॉटरी पटाची होड कोम्बड्याची काती, चोरी करने, खोटे बोलने, राग आणणे बंद करने तर स्त्रियांनी मुलांना व पति देवाला वाईट शब्दात बोलु नये, आणि सर्वात मोठा व्यसन म्हणजे चारित्र्यहीन, या मार्गातिल सेवक असो या सेवकीन यांनी असी चुक केली तर दुःखाला स्वता आमंत्रित करतो,म्हणुन महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे, की या शिवाय मानवी जिवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करने, म्हणजेच याचा अर्थ अनेक वाईट व्यसन बंद करणे होय. माझ्या लिहिन्यात नक्की चुका झाल्या असतीलच, तरी पण आपण, आपला लहान भाऊ समझुन माफ करावे, सर्वात प्रथम भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो, महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, तसेच आपल्या मातोश्री वाराणसी आईला सुद्धा माफी मागतो आणि सर्व सेवक, सेवकीन ताईला माफी मागतो,, सर्वांना माझा प्रेम पुर्वक नमस्कार..



सेवक : नितीन जांगडे

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य


ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages