महानत्यागी बाबा जुमदेवजीचे आदेश
प्रत्येक गटातील किंवा प्रत्येक गावात जबाबदार सेवकांनी निष्काम भावनेने परमेश्वरी कृपा प्राप्त केली. म्हणून सेवकांत आणि कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे. कोणत्याही संस्थेमध्ये खोटे व्यवहार करु नये. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या ४५ वर्षाच्या काळात असे निदर्शनास आले आहे की, सेवक खोटे बोलतात. बाबांनी आजपर्यंत कोणत्याही सेवकांशी केव्हाही खोटे व्यवहार केले नाहीत. म्हणून दैवी शक्तीला बाबांनी टिकवून ठेवले आहे. जर बाबांनी खोटे व्यवहार केले असते तर ही दैवी शक्ती बाबांना कधीही साथ देऊ शकली नसती. त्याप्रमाणे या मार्गाच्या सेवकांनी खोटे व्यवहार केल्यास दैवी शक्ती त्यांना कधीही साथ देणार नाही आणि त्याला दुःख निर्माण होईल.
या मार्गातील सेवकांनी कोणत्याही सेवकाची कोणत्याही प्रकारे निंदा करु नये. कोणत्याही सेवकाबद्दल काही गोष्टीची माहिती झाल्यास ती त्याने आपल्या मनात ठेवून काही प्रसंगाने ती शंका मांडून आपले मन मोकळे करावे. कोणत्याही सेवकाने आपल्याबद्दल दुसऱ्या सेवकाने निंदा केली असे सांगितल्यास त्याचे बोलणे मनावर न घेता समोरासमोर दोघेही आल्यावर त्याचे निर्णय घेण्यात येतील असे सांगावे. प्रेमाने त्याची शंका दूर करावी. सेवक निंदाखोर आहे असे लक्षात आल्यास त्या निंदाखोर सेवकाशी संगत करु नये. शंका करणाऱ्या सेवकास दुःख येते आणि त्यास भगवंत साथ देत नाही.
या मार्गाची भाषा बोलण्याची पद्धत भगवंताने महानत्यागी बाबा जुमदेवजींना तत्व, शब्द, नियम याव्दारे समजावून निष्काम कार्य करण्याची जबाबदारी सोपविली त्याप्रमाणे बाबा आपली जबाबदारी समजून परमेश्वरी कृपा नेहमी प्रसन्न राहावी. या उद्देशाने आलेल्या सेवकांना शुद्ध मार्गदर्शन करुन समाधान देतात. त्यामुळे बाबांना जीवनात भगवंताने सुख आणि समाधान दिलेले आहे. त्याप्रमाणे सेवकांनी पण आचरण करावे. कोणालाही वाईट वाटेल असे शब्द मुखातून काढू नये. सेवक सेवकात एकमेकाबद्दल काही शंका आल्यास आपआपसातच विचारपूस करावी आणि मनाचे शुद्धीकरण करावे. वाईट उदगार काढल्यास त्याचे परिणाम वाईटच निघतात आणि सेवकारची एकता भंग होते म्हणून ती एकता भंग होऊ नये आणि तिला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा