मानव धर्मात येणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

मानव धर्मात येणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती

मानव धर्मात येणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते.


ठळक मुद्देलताताई बुरडे : मोहाडीत सेवक संमेलन, हजारो सेवकांची उपस्थिती

मोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते. यशाचा मार्ग सापडतो. त्यामुळेच आज लाखो लोकांनी मानव धर्माचा स्वीकार केला आहे, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख व मानव धर्म प्रचार व प्रसारीका लताताई बुरडे यांनी केले.
मोहाडी येथे आयोजित परमात्मा एक सेवक सम्मेलनाप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते यशवंतराव ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी माजी खासदार नाना पटोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, आशिष पातरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, रिलायन्स जनरल मॅनेजर हरीश रायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी, परमात्मा एक सेवक मंडळ व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता यासारखे लोकोपयोगी कार्य करीत आहे. परंतु याऊलट शासन दारूच्या दुकाने उघडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढून दारूची दुकाने उघडून युवकांचे जीवन उधवस्त करीत आहे. जे काम शासनाने करायला हवे, ते काम परमात्मा एक मंडळातर्फे केल्या जात असल्याचे प्रतिपादन केले.
विशेष उल्लेखनीय कार्य करणारे नानाजी दमाहे सुखराम रोटके, मुलचंद जुमळे, सुखराम शिवणकर, हरलाल शरणांगते, केशवराव गभने, बाबुराव थोटे, शंकर तरारे, लक्ष्मीकांत तलांडे, वच्छला नागोसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत गित शिवांगी बुरडे हिने प्रस्तुत केले. तत्पूर्वी शोभायात्रेत अनेक प्रकारच्या वाहनांना सजविण्यात आले होते. सर्वाेत्कृष्ट झाकी प्रस्तुत करणाºयाला प्रथम ११ हजार १११, द्वितीय ९ हजार एक, तृतीय ७ हजार एक, चतुर्थ ५ हजार एक, पाचवा ३ हजार ५०१, सहावा दोन हजार ५०१ रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर काही झाँकींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविक मोरेश्वर सार्वे यांनी केले. तर संचालन उमेश भोंगाडे, इंद्रपाल मते यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास ४० हजार सेवकांची उपस्थित होती. गर्दीच्या नियंत्रणासाठी ठाणेदार सुधाकर चव्हाण, उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, पोहवा जगन्नाथ गिरीपुंजे व मंडळाच्या स्वयंसेवकांनी उत्तम कामगिरी बजावली.
कार्यक्रमाला नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजु पिल्लारे, नत्थु कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजु माटे, गुरूदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, व्यवस्थापक भगवान पिल्लारे, श्रीकृष्ण झंझाड, लक्ष्मण माहुले, कैलास ढबाले यांच्यासह सेवकांनी सहकार्य केले.

Receiving God in Human Rights

Mahantyagi Baba Jumdevji established human religion for every person to get relief from grief, anxiety, addiction. Every divine person coming to human religion receives the path of receiving a seeker from God and becomes free from suffering, poverty, evil addiction and superstitions.


Latatai Burde : Meetings of the Mohadi Sevak Sammelan, presence of thousands of servants


Mohali: Mahantyagi Baba Jumdevji established human religion for every person to get relief from grief, anxiety and addiction. Every divine person coming to human religion receives the path of receiving a seeker from God and becomes free from suffering, poverty, evil addiction and superstitions. Finding the way to success. That is why millions of people have accepted human rights, as the spiritual leader and propagation of humanity and propagation of Latatai Burde has done.

He was speaking at the conference of the Parmatma Ek Sevak Sammelan held at Mohali. The conference was inaugurated by Lata Burde, under the chairmanship of Yashwantrao Dhabale. Present on the occasion were former MP Nana Patole, Congress President Premsagar Ganvir, Pramod Titimare, Ashish Pathe, Sub-Divisional Police Officer Sanjay Jogdand, Thanedar Sudhakar Chavan, NCP Women's District President Kalyani Bhure, and RIL General Manager Harish Rakwad.

Speaking on this occasion, Nana Patole said, "Parmatma Ek Sevakl Mandal" is doing unnecessary work like remedies and homelessness. But the government is exposing the youth's life by opening a shop and taking away the scam from the court order to open liquor shops. The work that the government should have done is to be done by Paramatma Ek Mandal.

Special felicitations were made by Nanaji Dumay, Sukhram Roteke, Mulchand Jumele, Sukhram Shivankar, Harlal Sharanangate, Keshavrao Ghabne, Baburao Thote, Shankar Tarar, Laxmikant Tandhe, and Chanchala Nagos who specially did remarkable work. Welcome Git Shivangi Burde presented. Earlier, many types of vehicles were decorated in Shobhitra. First of all, 11 thousand 111, second 9 thousand one, third 7 thousand one, fourth 5 thousand one, fifth 3 thousand 501, 6, 2, 501 rupees were awarded. Some pockets were honored with a memento.

Introduced by Moreshwar Sarwe. Umesh Bhongde, Inderpal Mate did the work. Nearly 40 thousand attendees were present in the program. Thane Pawar Sudhakar Chavan, Sub-Inspector Om Prakash Gedam, Pahwa Jagannath Giripunje and the volunteers of the Mandal have done excellent work for the crowd control.

The program was supported by Naresh Sawwalkhe, Moreshwar Sarve, Kantiram Padare, Raju Pillare, Nathu Kohad, Eknath Jibhakate, Raju Mate, Gurudas Shende, Ravikumar MarasKolhe, Saraswata Mate, Manager Bhagwan Pillare, Shrikrishna zanzad, Laxman Mahule, Kailas Dhabale and Etc.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages