⏩ बाबानी आपल्याला परमात्मा एक तत्व दिले आहे या तत्त्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

Breaking

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला परमात्मा एक तत्व दिले आहे या तत्त्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला परमात्मा एक तत्व दिले आहे या तत्त्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

【 विचार क्रमांक १ 】

◼️ मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. "संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मीळून एक परमात्मा आहे." म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जिवात्म्यात आहे.म्हणून बाबांनी परमेश्वराला 'परमात्मा एक' मानले. म्हणजेच सर्व मानव समान आहेत. 

◼️ आत्मा 24 तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे. म्हणून परमेश्वर हे व्यक्ती नसून शक्ती आहे व ती निराकार आहे. ही शक्ती आकारात येत असली तरी ती अदृष्य आहे आणि ती दिसत नसून फक्त तिचे गुण दिसतात.... 

◼️ माझ्या लिहिण्यात काही चुकी झाली असेल तर सर्वांनी मला माफ करावं

✍🏻 आपली सेवकिन: श्वेता अाथिलकर पारडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करून मानव धर्माची स्थापना केली व सर्वप्रथम आपल्याला 4 तत्त्व देण्यात आले. त्यापैकी बाबांनी भगवंतांला 2 तत्त्व दिले.
◼️ त्यापैकी 1 तत्त्व
◼️ परमात्मा एक

◼️ प्रत्येक मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. "संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मीळून एक परमात्मा आहे." म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जिवात्म्यात आहे.म्हणून बाबांनी परमेश्वराला 'परमात्मा एक' मानले. म्हणजेच सर्व मानव समान आहेत. तरी पण आपण दुसऱ्याच्या आत्मेला समजून न घेता आपण ती दुखवण्याचा प्रयत्न करीत असतो.

◼️ आत्मा24 तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे. म्हणून परमेश्वर हे व्यक्ती नसून शक्ती आहे व ती निराकार आहे. ही शक्ती आकारात येत असली तरी ती अदृष्य आहे आणि ती दिसत नसून फक्त तिचे गुण दिसतात....म्हणून बाबांनीआपल्या पायावर कोण्या सेवकांना डोके ठेऊ दिल नाही. कारण एक आत्मा दुसऱ्या आत्मेसमोर झुकला तर तो मानवाचा अनादर नसून तो साक्षात परमेश्वराचा अनादर होत असतो.

◼️ माझ्या लिहिण्यात काही चुकी झाली असेल तर सर्वांनी मला माफ करावं.

✍🏻 आपला सेवक :- प्रशांत मानापुरे मोहाडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】

◼️ महान त्यागी बाबा जुमदेवजीनीं अशा एका परमेश्वराचे,जो मानवाची सर्व प्रकारची दु:खे दूर करू शकतो त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले.तेव्हा त्या परमेश्वराने आकारत येऊन दर्शन दिले. ' तुज आहे तुजपाशी तरी तू भूललाशि ' या मणीप्रमाणे ते बाबांना मनाले, सेवक तू मूझे कहाँ देख रहा है। मै 24 घंटे तेरे पास हू। जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर म्रुत हो जायेगा। तेव्हा बाबांनी विचार केला की , अशी कोणती वस्तू आहे ज्या मूळे  मी जिवंत आहे .तेव्हा त्यांना ' आत्मा , ही वस्तू आठवली.मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर म्रूत्य होते.शरीर हे नस्वर आहे.आत्मा ही अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे.सम्पूर्ण प्राण्याचा आत्मा मिळून एक ' परमात्मा,  आहे .मनजेच परमात्मा चा अंश प्रतेक जीवआत्म्यात आहे.हे बाबांनी ओळखले .मनून बाबांनी परमेश्वराला ' परमात्मा एक मानले , ती आत्मजोत आहे.

◼️ जी आत्मा बाबानजवळ आहे तेच आत्मा इतरानजवळ आहे . मनजेच सर्व समान आहेत हे बाबा समजतात.त्या मूळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेऊ देत नाही.कारण एका आत्म्या चा समोर दुसरी आत्मा झूकनें  हा आत्म्याचा अनादर आहे .आत्मा चोवीस तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे .ती निराकार आहे ती आकारत येत नसली तरी ती अद्रूस्य आहे .ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात. यालाच परमात्मा असे मानतात.

◼️ लिहिण्यात काही चुकी झाली असेल तर मला सर्व सेवक दादांनी व ताईंनी माफ कराव.

✍🏻 आपला सेवक :- अजित कुंजीलाल तुरकर सिहोरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】

◼️ आजच्या विषयावर मी आपले विचार देत आहे.

◼️ महानत्यागी बाबा जूमदेवजीनी अश्या एका परमेश्र्वराचे जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख दूर करू शकतो यांचे शोध घेण्याचे कार्य सुरू केले तेव्हा परमेश्र्वराने बाबांना दर्शन दिले व म्हणाले तुज आहे तुज पाशी तरी तू भुललासी या मनी प्रमाणे बाबांना म्हणू लागले सेवक तू मुझे कहाँ ढूँढ़ रहा मैं चौबीस तास तेरे पास हूँ जिस पल छूट जाऊँगा तेरा तेरा शरीर मूर्त जायेगा तेव्हा बाबा विचारात पडले की अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जिवंत आहे तेव्हा बाबाला आत्मा ही वस्तू आठवली मनुष्याचा शरीरातून आत्मा निघाल्यावर शरीर मूर्त होते म्हणजे शरीर नश्वर आहे आणी आत्मा ही अमर आहे तेव्हा बाबांनी म्हटलं भगवान मेरे पास होकर मैं कितना लंबा ढूँढ़ रहा हूँ तेव्हा बाबांनी प्रतेक जीवात्म्यात परमेश्वराचे अंश आहे हे बाबांनी ओळखले व तेव्हा पासून परमात्मा एक असे संबोधले.

◼️ विचार देण्यात काही चुका झाल्यास भगवंताला व बाबाला माफी व तुम्हा सर्वांना माफी मागतो

✍🏻 आपला सेवक :- अशोक कडव वाहनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】

◼️ आजचा विषय एका भगवंताची जाणीव करून देणारा असुन त्यावर मि विचार देण्याचे प्रयत्न करत आहो माझ्या प्रयत्नला यश देणारे भगवंत आहे.

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी अशा एका परमेश्वराची, ओळख करून दिली जो मानवाचे सर्व प्रकारची दुःख दूर करू शकतो त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु केले तेव्हा त्या परमेश्वराने आकारांत येऊन दर्शन दिले.

◼️ "तुज आहे तुजपाशी तरी तू भूललासी" या म्हणी प्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ देख रहा हैं, मैं २४ घंटे तेरे पास हूँ, जिस पल छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जायेगा, तेव्हा बाबांनी विचार केला की अशी कोणती वस्तु आहे ज्यामुळे मी जीवंत आहे. तेव्हा त्यांना "आत्मा" ही वस्तु आठवली.मनुष्याचा आत्मा निघुन गेल्यावर त्याचे शरीर मृत होते .शरीर हे नश्वर आहे .आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे .संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक "परमात्मा" आहे म्हणजेच परमात्माचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे .हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले, ती आत्मज्योत आहे .जो आत्मा बाबाजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे. म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेंऊ देत नव्हते. कारण एका अत्म्याच्या समोर दूसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे. आत्मा चोवीस तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे .म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे .ती निराकार आहे .ती आकारांत येत असली तरी ती अदृश्य आहे .ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात .

◼️ भगवत कृपेनी आजच्या विषयावर मला जे शब्दरूपी विचार देता आले, माझ्या बुद्धिप्रमाने ते मि आपणास मार्गदर्शन केले यात जर कळत न कळत माझ्यातर्फे काही चूक भुल झाली असेल त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणशी आई, सर्व सेवक दादा व ताईला माफी मांगतो.

✍🏻 आपला सेवक :- कुणाल शेंडे येरली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】

◼️ आज माझा ग्रुप वर 1 लाच दिवस असल्यामुळे माझ्या हातून काही चूक भूल होऊ शकते, त्या विषयी माफी असावी.

◼️ बाबानी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्या करीता आपल्याला 4 तत्व दिलेले आहेत.

1) परमात्मा एक
2) मरे या जिये भगवत नाम पर
3) दुःख दरी दूर करते हुये उद्धार
4) इच्छा अनुसार भोजन

◼️ यापैकी बाबानी परमेश्वराला 2 वचन दिलेले आहेत.

परमात्मा एक व मरे या जिये भगवत नाम पर

◼️ तेव्हा परमेश्वरा नि बाबांनवर खुश होऊन 2 वरदान बाबांना दिले. 

दुःख दरी दूर करते हुये उद्धार व इच्छा अनुसार भोजन

◼️ त्यापैकी बाबानी परमेश्वराला दिलेले सर्वात महत्वाचं वचन म्हणजेच परमात्मा एक

◼️ आता परमात्मा एक म्हणजे काय, तर बाबानी जेव्हा एका परमेश्वराची प्राप्ती 1948 ला केली त्या वेडी परमेश्वर बाबाला म्हणाले. 
!!तुज आहे तुज पाशी परी तू जागा भुललाशी!!
!!हे मानव मै जीस पल तुझसे छूट जाऊंगा तब तेरा शरीर मृत हो जायेगा!!

◼️ तेव्हा पासून बाबानी आपल्या घरातील सर्व देवी - देवतांचा विसर्जन करून फक्त एकच परमेश्वराला मानू लागले. 

◼️ म्हणजेच बाबानी सांगितले आहे की परमेश्वर आपल्या जवळच 24 तास जागृत आहे. 

◼️ म्हणजेच बाबानी आपल्याला आत्मा रुपी परमेश्वर दाखविलेला आहे. 

◼️ आणि आपण जो परेनंत जिवंत असतो तो परेनंत आत्मा रुपी परमेश्वर आपल्या शरीरात वास्तव्य करीत असतो. 

◼️ आणि जेव्हा आत्मा आपल्या शरीराला सोडून जातो तेव्हा आपला शरीर मृत होतो. 

◼️ याच परमेश्वराची प्राप्ती बाबानी केली आणि यालाच परमात्मा एक असे नाव दिले. 

◼️ म्हणून बाबा आपल्या पायावर कोणालाही डोकं ठेऊ देत नव्हते. 

◼️ याच कारण अस होत की, एक आत्मा दुसऱ्या आत्म्याच्या समोर झुकने म्हणजेच परमेश्वराचा अनादर होतो असे बाबा नेहमी सांगायचे. 

◼️ आणि म्हणूनच आपण मूर्ती पूजा बंद करून फक्त एकच परमेश्वराला मानतो. 

◼️ आणि याच शक्ती मुळे आपल्याला फायदा मिळतो. 

एवढेच माझे विचार
◼️ लिहण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी

✍🏻 आपला सेवक:- यादव बुराडे तुमसर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】

◼️ या विषयावर मी माझ्या अल्पशा बुद्धीने विचार व्यक्त करत आहे.

◼️ भगवंताच्या प्राप्ती साठी व निष्काम कर्मयोग साधण्यासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा पहिलाच तत्व आहे.

◼️ बाबानी भगवंताला दोन तत्व दिले (पहिला व दुसरा तत्व). 
त्यांनंतर भगवंतांनी सुद्धा बाबाला दोन तत्व दिले(तिसरा व चौथा तत्व).

◼️ बाबानी भगवंताला दिलेल्या दोन तत्वापैकी हा पहिलाच तत्व म्हणजेच परमात्मा एक

◼️ पृथ्वीतलावावर जेवढे सजीव आहेत. तेवढ्या सजीवांमध्ये आत्मा आहे. आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणून कुणाचीही आत्मा दुखावणार नाही अस कार्य आपल्या मानवाला करायचं आहेत. 
    
◼️ एखाद्या व्यक्तीला जर का आपण वाईट बोललो किंवा त्याच्याशी  गलत व्यवहार केलो तर त्याची आत्मा दुखेल. अर्थात परमेश्वराला त्रास होईल. 
      
◼️ परमात्मा एक या तत्वा मुळे बाबा जुमदेवजी कुणालाही आपल्या पाया पडू देत नव्हते.  कारण एक आत्मा दुसऱ्या आत्मेसमोर झुकली तर परमात्माचा अनादर होतो. हीच शिकवण बाबानी आपल्याला पहिल्या तत्वात दिली आहे.

◼️ आपल्या मानव धर्माची ओळख सुद्धा या परमात्मा एक वर आहे. बाहेर कुठं पण पाहतो तर बऱ्याच गाड्यांवर *परमात्मा एक* अस नाव लिहिलं असते. म्हणजेच आपल्या मानव धर्माच्या सेवकांची गाडी आहे अस आपण समजतो. त्याचप्रमाणे अनेक वाल्याना सुद्धा असा विश्वास असतो कि हि गाडी परमात्मा एक वालाची असल्यामुळे या गाडीत आपण सुरक्षित आहोत असा विश्वास सुद्धा अनेक वाले व सेवक करत असतात.

◼️ शेवटी सांगायचं एवढंच कि, परमात्मा एक मध्ये  खरोखरच खूप शक्ती आहे. परक्याची आत्मा जाणून घेण्याची शक्ती या शब्दामध्ये आहे.

◼️ चूक भूल क्षमा करावी.

✍🏻 आपला सेवक : हेमराज (सोनू) शेंडे मांडवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ८ 】

◼️ जेव्हा परमेश्वराने  बाबांना   दर्शन दिले आणि त्यांना बेईमान म्हटले. त्या नंतर बाबांनी परमेश्वराला   ईमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जगवीण्याचे कार्य करीन असे वचन देऊन "परमात्मा एक आणि मरे या जीए भगवत नामपर " हे वचन दिले . 
     
◼️ परमात्मा एक म्हणजे काय ?प्रत्येक मानव आणि प्राण्यांच्या  शरीरात असलेली "आत्मा" आत्मा ही अशी वस्तू आहे ज्यामुळे मानव आणि प्राणी   जिवंत आहे. 

◼️ आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रतेक सजीवांमध्ये आहे. म्हणून  बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले. ती आत्मज्यौत  आहे. 

◼️ आत्मा हा व्यक्ती नसून ती एक चैत्यन शक्ती आहे. ती प्रतेक मानवाच्या शरीरात  24 तास वास   करत असते. मार्गातील  सेवक हा नेहमी नमस्कार घेतो, कुणालाही आपल्या पायांवर डोक ठेऊ देत नाही कारण एका आत्म्याच्या सामोर दुसरा आत्मा झूकणे  हा  आत्म्याचा अनादर असून तो परमेश्वराचा सुध्दा अनादर आहे .  

◼️ माझ्या लीहण्यात काही चुका झाल्या असतील तर मला माफ  करावे ही विनंती.

आपली सेवकीन :- रजनी  भगवान भोंगाडे उसरिपार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ९ 】

◼️ या विषयावर मी आपले विचार देत आहे

◼️ महानत्यागी बाबा जूम्देवजीनी एका भगवंताची प्राप्ती करून आपल्या गोर दुखी मानवाला हा विना मूल्य मार्ग दिला आहे आणि महानत्यागी बाबा जूम्देवजीनी सांगितले आहेत की आत्मा ही परमात्मा आहे आणि एक म्हणजे आपलीपरकीय आत्मा व आपली आत्मा  एकता करणे म्हणजे परमात्मा एक. 

◼️लिहण्यात चूक झाली असेल तर माफ कराव. 

✍🏻 आपला सेवक : रोशन मंगल चाचीरे सिहोरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १० 】

◼️ मी आपले विचार आपल्या मते देत आहे चुकल्यास सर्वांनी माफ कराव. 

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एका परमेश्वराला प्राप्त करून विदेह अवस्थेत असताना एका परमेश्वराने बाबाला दर्शन दिला. आणि बाबा जुमदेव जी ला बईमान मनाले. त्यानंतर बाबा जुमदेवजी ने परमेश्वराला ईमानदारी मी या जगात सेवकांचा माध्यमातून दाखवेन अस वाचन दिला...

◼️ पर  म्हणजे परका व आत्मा म्हणजे सजीव प्राणी पशु सर्वांची आत्मा म्हणजे परमात्मा चा अंश आहे...बाबाने कुणाचाही पाया पडायला बंदी घातली म्हणजे आपली आत्मा कुणाचाही आत्मेचा समोर झुकवू नये कारण आत्म्याचा अनादर होतो आणि कुणाची आत्म्याचा अनादर म्हणजे परमात्माच अनादर होतो अस सांगितला....

◼️ परमेश्वर ही व्येक्ती नसून एक ही शक्ती आहे. ती निराकार अदृश्य आहे आणि ती आपल्या शरीरात आहे. पण ती दिसत नाही दिसते तर तिचे गुण दिसतात आणि ते ओडखण्याच काम असते...

◼️ येवडच बोलून आपल विचार वेक्तं  करतो आणि माझं लिहाण्यात चुकल असेल तर भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो तसेच महान त्यागी बाबा जुमदेव जी ला माफी मागतो व सर्व सेवक दादा व ताईला माफी मागतो...

✍🏻 आपला सेवक - उमेश दादा पराते सिहोरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ११ 】

👉 आजचा विषय "परमात्मा एक" यावर माझ्या परीने विचार देण्याचा प्रयत्न करतो.

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करण्यासाठी साधना सुरू केली आणि मानवाचे दुःख दूर करू शकले.

▶ त्या शक्तीचा शोध घेत असता एका भगवंताने बाबांना निराकारातून आकारात येऊन दर्शन दिले.

'तु तेरे पास है फिर भी भुल गया' या मणिप्रमाणे भगवंताने बाबांना म्हंटले की , "सेवक तु मुझे काहा धुंड रहा है, मैं २४ घंटे तेरे पास हूं. जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर म्रुत हो जायेगा." बाबांनी यावर खुप विचार केला की , अशी कोणती वस्तु आहे ज्यामुळे मी जिवंत आहे. तेव्हा बाबांना आत्मा ही वस्तु सापडली जी शरिरातून निघुन गेल्यास शरीर म्रुत होते.

▶ आत्मा हा अमर असुन परमेश्वराचा अंश आहे आणि सम्पुर्ण सजीव प्राण्यांचा आत्मा एक परमात्मा बनलेला आहे.

▶ प्रत्येक जिवंत आत्म्यात परमात्माचा अंश असतो.तेव्हापासुन बाबा परमेश्वराला मानुन सर्व सजीव आत्म्यात परमेश्वराचा अंश अशल्याने सर्व मानव हे समान आहेत.

"परमात्मा" ही एक वस्तु नसुन आत्मज्योत आहे. ती निराकार चैतन्यमय शक्ती आहे. ती आपल्याला दिसत नसुन तिचे गुण दिसतात. 

◼️ माझ्या विचार देण्यात किंवा लिहण्यात चुक झाली असेल तर मला सर्वांनी माफ करावं.

✍🏻 आपला सेवक : तेजराम आंबिलकर मोहगाव देवी 

📚📚📚📚📚📚📚📚📚📚
।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages