⏩ बाबानी आपल्याला इच्छा अनुसार भोजन तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला इच्छा अनुसार भोजन तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला इच्छा अनुसार भोजन तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪
【 विचार क्रमांक १ 】

◼️ जेव्हा मानव जन्माला आल्यावर त्याला पुर्ण आयुष्य घालण्याकरिता खुप गोष्टींची आवश्यकता भासत असते आणि आपले जीवन सुखी व समाधानी कसे बनु शकेल याकडे त्याचे जास्त लक्ष असते. तेव्हा त्याने भगवतांजवळ त्याला पाहिजे असलेल्या वस्तुंचे इच्छा केली आणि परमेश्वराजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तु सहज सुलभरित्या मिळत असते हेच इच्छा अनुसार भोजन आहे.आणि दुसरी इच्छा अनुसार भोजन म्हणजे मानवाला केव्हाही जेव्हा त्याला जे खाण्याची इच्छा झाली तेव्हा तेच खायला मिळते असे होत नाही. 

◼️ जसे उदाहरण असेल माझी हरी तर दईल पलंगावरी या म्हणी प्रमाणे खरे झाले असते पण हे चुकीचे आहे. त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याला इच्छा केली तरच त्याला ती वस्तु मिळत असते नाहीतर मिळत नाही. म्हणजे इच्छा अनुसार भोजनाकरिता त्याला याप्रमाने कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.

सेवक : कृणाल शेंडे येरली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  【 विचार क्रमांक २ 】

  ◼️ आजच्या बैठकीचे विषय आहे-की, इच्छा अनुसार भोजन* म्हणजे काय ?

 ◼️ तरी पण मी आपल्या अल्पबुद्धीने सांगत आहे. व माझ्या सांगण्यात काई चुका झाल्यास, स्वयंम- भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी, वाराणशी आई व सर्व सेवक-सेविका मला क्षमा करतील अशी मी विनंती करतो
 ◼️  भगवत प्राप्ती करीता, निष्काम कर्मयोग साधण्याकरीता  बाबांनी चार तत्व दिले आहेत.
त्यापैकी चौथा तत्व
४). इच्छा अनुसार भोजन

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजी, यांनी आपले देह चंदना सारखे झिजवून एका भगवंताची प्राप्ती केली. व भगवंताची प्राप्ती करून, फेब्रुवारी-१९४९ ला मानव धर्म स्थापन केला. व मानव धर्म आपल्या पुरताच न रहावे म्हनून, मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्या करीता, वेगवेगळ्या गावी दौरे घेऊन व बैठकीच्या माध्यमातून, ह्या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करू लागले. व आपल्या सारख्या गोर-गरीब, दुखी-कष्टी आणि व्यषणाधिष्ट लोकांना सुखी आणि सुधरवू लागले.
   महानत्यागी बाबा जुमदेवजी नी आपल्याला सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना आपल्याला रचून दिली.

◼️  सर्व प्रथम महानत्यागी बाबा जुमदेवजी नि भगवान बाबा हनुमानजी ला दोन तत्व दिले- परमात्मा एक आणि मरे या जीए भगवत नाम पर. त्या नंतर लगेच भगवान बाबा हनुमानजी नि महानत्यागी बाबा जुमदेवजी ला दोन तत्व दिले- दुखदारी दूर करते हुये उद्धार आणि इच्छा अनुसार भोजन.
   
◼️ आपण सेवक लालची आहोत कारण आपल्या अंत मनात एखादी इच्छा प्रकट होतो. ती इच्छा पूर्ण झाली की लगेच आणखी दुसरी इच्छा प्रकट होतो. आणि अनेकदा अस होतो की आपली कोणतीतरी इच्छा पूर्ण होत नाही. ते इच्छा पूर्ण न होण्याचे कारण असते की *ध्येय डगमगने, दिवस भर्यात केलेले कर्म आणि होणाऱ्या चुका. व सेवक हा त्याचा कडे लक्षच देत नाही. आणि चुकीचा पात्र ठरतो. आणि भगवंताला दोषी ठरवतो. आणि सत्य शेवट त्याचा वर दुःख येतात आणि तो दुखास पात्र ठरतो. परंतु जो सेवक हा खरोखरच ध्येयवादी असेल, दिवसभर्यात चांगले कर्म करणारा असेल, चुकिचा खुलासा करणारा असेल (कारण मानव हा चुकीचा पात्र आहे), तत्व, शब्द, नियम यावर चालणार असेल तरच त्या सेवकाचा जयजयकार आणि त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात.
हाच आहे-४). इच्छा अनुसार भोजन

◼️ परंतु अश्या पण इच्छा प्रकट नको करा की ज्याचाने आपल्याला नुकसान होईल.

एक अनुभव सांगू इच्छितो
   
◼️ एक बाई असते आणि तिचा मुलगा असते (सेवकच असतात) ते दोघे पण बैठकीत जात असतात, आणि ते बैठकीत असतात दोघे पण. बैठक सुरू होते, चर्चा सत्र सुरू होतो. त्या मधून एक सेवकिन बाई उभी होते आणि ती बाई आपल्या मुला  वर आलेले दुःख सांगते. आणि जे अगोदर चे आई आणि मुलगा बैठकीत आले असतात, त्या मधून ती बाई आपल्या मनात इच्छा व भावना निर्माण करते की, हे भगवंता परमेश्वरा माझ्या मुलाला दगडा सारख ठेव. भगवंत त्या बाईची ऐकतो आणि तसाच करतो. उभी झालेली बाई दुःख सांगून बसतो आणि काहीच वेळात बैठक ही समाप्ती कडे येतो आणि समाप्त होतो. ज्या वेडेस उभा होण्याची वेड येतो, परंतु त्या वेडेस त्या बाईचा मुलगा हा उभाच होत नाही आणि काई बोलत पण नाही. काही दोघे-तिघे सेवक मिडून त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो पण तो खूप भारी असतो आणि त्याला ते उचलू पण नाही शकत. मग सेवक लोक त्याचा आईला विचारतात की काय झालं तुमच्या मुलाला, हा एवढा भारी कसा ? मगत्याची आई सांगते की मी सहज भगवंताला अस म्हटलं की, माझा मुलाला दगडा सारखा ठेव. मग तिला सेवक म्हणतात की, विनंती कर आणि सांग की माझा मुलाला अगोदर सारखे कर माझ्यानी महान चूक झाली मला माफ कर. ति विनंती करता बरोबरच मुलगा हा अगोदर सारखाच होतो आणि उभा पण होतो आणि बोलायला पण लागतो.
🌷 नमस्कार जी 🌷


सेवक : कौशिक कनोजे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】

◼️ आजच्या विषयावर विचार देत आहे. या पुथ्विवर जिवन जगत असतांना प्रतेक मानवास वाटते माझ परीवार सुखी समाधानी असायला पाहीजे असल्या खुप इच्छा मनी ठेवत असते आणी परमेश्वर पुर्न करीत असते पन आपन जर म्हटल कि देगा हरी पलंगावरी तर अस होनार नाही. त्यासाठी चांगल कर्म असायला पाहीजे बाबानी दिलेल्या शिकवनी प्रमाने वागायला पाहिजे चार तत्व, तिन शब्द ,पाच नियम ,व कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरन केल तर परमेस्वर आपल्या पाठिसी उभा राहुन आपन परमेस्वरा जवळ जी ईच्छा केली ती इच्छा परमेस्वर पुर्न करीत असतो मनजेच ईच्छा अनुसार भोजन,,,,,,,,,,,,,,,। 

  सेवक : उमेश बुधे वाहणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】
              
            नमस्कारजी 
◼️ मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालविण्याकरिता खूप गोष्टींची आवशकता भासते. तो आपले जीवन सुखी आणी समाधानी कसे बनू शकेल त्याकडे त्याचे जास्त लक्ष असते. तेव्हा त्याने भगवंता जवळ त्याला पाहिजे असलेल्या वस्तूंची इच्छा केली आणी परमेश्वरजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तू सहज व सुलभ मिळते हेच ईच्छा अनुसार भोजन होय. इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ मानवानी  केव्हाही जे काही खाण्याची इच्छा केली तर तेच खायला मिळाले पाहिजे असे होत नाही. जसे असेल माजा हरी तर देईल पलंगावरी ही तुकाराम महाराजांची मन आपल्या मानव धर्मात खोटी ठरली आहे.

◼️ मानवाने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याने इच्छा केली तरच त्याला ती वस्तू मिळते अन्यथा मिळत नाही म्हणजेच इच्छाअनुसार भोजनाकरिता त्याला त्याप्रमाणे पूर्ण कर्म करणे महत्वाचे आहे म्हणून मानवांनी कर्म कराव म्हणजेच इच्छा अनुसार भोजना करिता कर्म करणे फार महत्वाचे आहे

चूक भूल माफ कराल

सेवक : अशोक कडव वाहनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】

 नमस्कार

 ◼️ विषय खूप छान आहे. इच्छा अनुसार भोजन.

◼️ इच्छा अनुसार भोजन म्हणजेच आपल्याला जे खायला आवडते ते खायला मिळालं म्हणजे झालं असा होत नाही.

◼️ तर  भगवंताच्या प्राप्तीसाठी व निष्काम कर्मयोग साधण्यासाठी जे चार तत्व आहेत त्यातील भगवंतानी मानवाला दिलेला हा चौथा तत्व होय. आपण जेव्हा भगवंताला दोन तत्व देतो तेव्हा भगवंत आपल्याला दोन तत्व परत करतो. मानवाच्या इच्छा आकांक्षा ह्या भरपूर आहेत आणि जसजशी एक एक इच्छा पूर्ण होते तसतशी मानवाच्या एक एका इच्छा ह्या वाढत जातात. आपण भगवंताला जेव्हा काही मागतो. (उदा.घर बांधणे, प्लॅट घेणे, गाडी घेणे, नोकरी वर लागणे, भरपूर पैसे कमावणे,एखादं धंदा जोमान चालणे,संतती योग मागणे,इ. )अशा ज्या इच्छा आपण भगवंताजवळ ठेवतो त्या इच्छा भगवंत पूर्ण करतो. तोच आपला भोजन होय.

◼️ परंतु ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बाबांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे, तत्व शब्द नियमाने वागणे आवश्यक आहे तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होतात. व इच्छा अनुसार भोजन हा तत्व यशस्वी होतो. 
चूक भूल क्षमा करावी.

सेविका : मनीषा ताई ईश्वरकर बेटाळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】
   
आजचा विषय इच्छा अनुसार भोजन
आजचा विषय हा खुप सूंदर आहे

▶ भगवत प्राप्ति करीता निष्काम कर्मयोग साधन्या करीता  बाबानी ४ तत्व दिले आहेत त्यापैकी ४ था तत्व
इच्छा अनुसार भोजन

▶ मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालविण्याकरिता खुप गोष्टींची आवश्यकता भासते. तो आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनवु शकेल याकडे त्याचे जास्त लक्ष असते. तेव्हा त्याने भगवंताजवळ त्याला पाहीजे असलेल्या वस्तूंची इच्छा केली आणि परमेश्वराजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तू सहज सुलभरीत्या मिळते. हेच 'इच्छा अनुसार भोजन' होय.

▶ इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ मानवाला केव्हाही जेव्हा त्याला जे काही खाण्याची इच्छा झाली, तर तेच खायला मिळाले पाहिजे असे नाही.

▶ जसे 'असेल माझा हरी, तर देईल पलंगावरी' हे चुकीचे आहे. त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याने इच्छा केली तरच त्याला ती वस्तू मिळते. अन्यथा मिळत नाही.
▶ म्हणजेच इच्छाअनुसार भोजनाकरिता त्याला त्याप्रमाणे कर्म करणे महत्वाचे आहे.
▶ जेव्हा आपन तत्व, शब्द, नियमाचे काटेकोर पने पालन करतो तेव्हा परमेस्वर आपल्याला ४ था तत्वाचा लाभ पोहचवितो
▶ काही चूक भूल झाल्यास माफ़ करा

सेवक:- रोशन दमाहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी भगवत प्राप्तिकरिता  चार तत्व दिली आहेत त्यातील चौथा तत्व म्हणजे इच्छा अनुसार भोजन.

◼️ इच्छा अनुसार भोजन म्हणजे जेवण नाही  तर मानवाला जीवनात ज्याकाही गोष्टींची गरज असते  त्या  मिळविणे, म्हणजेच आपण जर ती इच्छा भगवंता पुढे मांडली तर ती आपल्याला  जरूर मिळतेे,  ते दुःख असो की कोणती वस्तू असो आपण जर महानत्यागी बाबा  जीवदेवजीनी दिलेल्या कार्य आणि तत्व शब्द नियमाचे जर तंतोतंत पालन केले तर आपण जी पण इच्छा भगवंता पुढे ठेवली तर आपली इच्छा पूर्ण होते. या मार्गात सर्व सेवक दुःखा मुडे येतात काही दिवसांनी  ते खूप चांगल्या सुखी संसारात नांदतात कारण ते महानत्यागी बाबा जुमदेवजीचे गुण गातात. आज सर्व सेवक सुखात आहे कारण त्यांच्या पाठीशी  भगवंत उभा  आहे.

◼️ भगवंत आपल्याला जे पाहिजे ते देऊ शकतो फक्त आपल्याला भगवंताला तत्व शब्द नियमाची  भिक द्यायची आहे. तेव्हाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकते. जर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आपण चांगले कार्य करणे  तत्व शब्द नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे  तेव्हाच आपल्याला त्याच फळ मिळेल.
सेवक : मनोज  ईश्वरकर मु. बेटाळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ८ 】

आज चे विषय" इच्छा अनुसार भोजन" 

◼️ इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ मानवाला केव्हाही ,जेव्हा त्याला  जे काही खाण्याची इच्छा झाली तर खायला मिळाले पाहिजे असे नाही ,तर त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याच प्रमाणे त्याने इच्छा केली  आणि परमेश्वराजवळ विनंती असेल तरच त्याला ती वस्तू मिळते ,अन्यथा नाही , म्हणजेच  त्याला चांगले  कार्य  आणि कर्म करणे हे महत्वाचे  आहे.

◼️ बाबांनि  मंगरली या गावी भगवतकार्याची चर्चा बैठक घेतली होती .  वातावरण आनंदी असल्यामुळे रात्री 12 वाजे पर्यंत बैठक चालली . बैठक समाप्त झाल्या नंतर बाबांनी  गावातील  सेवकांना म्हणाले , आता दुधाचा चहा प्यावयास पाहिजे , अशी बाबांनी इच्छा केली.त्यावर गवळी सेवक म्हणाला  एवढ्या मध्यरात्री दूध कुठून मिळणार आणि माझ्या घरच्या म्हशी जंगलात चरावयास गेल्या होता आणि वासरू सोबत होता त्यामुळे वासरांची संपूर्ण दूध पिऊन टाकले . 
     
◼️ तेव्हा सेवकांनी बाबांना विनंती केली की , बाबा आपण मला मार्गदर्शन करा की दूध कुठुन मिळणार ?  त्यावर बाबांनी सेवकांना उद्धेशून म्हणाले , मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केली , भगवंत दूध देईल .त्यानंतर बाबांनी सांगितल्याप्रमाणे विनंती केली आणि भगवंताचे नामस्मरण करून त्याने म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन म्हशीचे दूध काढू लागला  . आश्चर्य असे कि ज्या म्हशीने  अगोदर एक थेंब हि दूध दिले नव्हते त्या म्हशीने चर - चर   2 लिटर दुध दिले. 
         
◼️ त्यावर बाबा सेवकाला म्हणाले , या संपूर्ण दुधाचा चहा बनवा एक हि थेंब पाणी टाकू नका आणि थेंब भर  हि दूध शिल्लक ठेऊ नका .पूर्ण दुधाचा चहा बनवून सेवकाने सर्वांना दिला . 

◼️ म्हणून बाबानी तत्वात सांगितले आहे की " इच्छा अनुसार भोजन " म्हणजेच मानवाने परमेश्वरणाजवळ  केलेली इच्छा  हि पूर्ण होते फक्त त्यासाठी लागतो एक लक्ष्य , एक चित्त, आणि एक भगवान मानून कर्म करावे लागते . 

◼️ माझ्या लिहण्यात काही चुका झाल्या असतील तर मी  सर्वाना माफी मागते.

सेविका : कु. रजनी ताई भोंगाडे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ९ 】

मी यावर आपले  थोडक्यात  विचार देत आहे .  
            
◼️ भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहेत. त्यापैकी 'इच्छा अनुसार भोजन, हा  चौथा तत्व आहे. इच्छा अनुसार भोजन म्हणजे काय की   मानवाला जेव्हा जे खाण्याची इच्छा झाली तर तेच खायला मिळाले असे होत नाही .जसे 'असेल माझा हरी तर देईल पलंगावरी, हे चुकीचे आहे. इच्छा अनुसार भोजन याचा अर्थ अशा आहे की मानव हा जन्म घेऊन प्रुथ्वीवर जीवन जगण्याकरिता येतो.तर त्याला खूप गोष्टींची गरज असते.ते म्हणजे की आपले जीवन शुकी कसे बनेल व आपले आयुष्य कसे जगता येईल या गोष्टी कडे जास्त लक्ष असते.तेव्हा त्याने भगवंता जवळ  जे त्याला पहिजे  असलेल्या वस्तूची   इच्छा ठेवली  व परमेश्वराला विनंती केली तर त्याला ती वस्तू  मिळते  पण त्याने ज्या प्रमाणे कार्य केले असेल त्या प्रमाणे इच्छा ठेवली असेल तरच त्याला ती वस्तू मिळते .अन्यथा मिळत नाही म्हणजेच इच्छा अनुसार भोजनाकरीता त्याला त्याच प्रमाणे कर्म करणे महत्वाचे आहे .हेच म्हणजे इच्छा अनुसार भोजन होय .
                    
◼️ माझा लिहिण्या मध्ये काही चुका झाले असतील तर सर्वानी मला माफ कराव .

सेवक : अजीत तूरकर ( सीहोरा )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १० 】

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी भगवंताची प्राप्ती केली तेव्हा परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिल आणि त्यातून या चार तत्वाचा निर्माण झाला त्यापैकी ३ रा आणि ४ था  नियम  परमेश्वराने बाबाला दिला तर ४था नियम आजचा विषय आहे या वर मी माझे विचार देण्याचा प्रयत्न करत आहो.

◼️ इच्छा अनुसार भोजन म्हणजे दैनंदिन जीवनात चालत असताना मानवाला खूप इच्छा असतात कोणाला शिक्षणासाठी,नोकरीसाठी, व्यवसायात,कुटुंबात अश्या एक ना अनेक इच्छा आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे असतात तर एखादी इच्छा परमेश्वराला केली तर ती पूर्ण झाली पाहिजे यासाठी आपण परमेश्वराकडे शब्द ठेवतो आणि बाबांच्या शिकवणी प्रमाणे कार्य करतो तस सगड्या सेवकांना या तत्वाची जाणीव प्रत्येकाला आपल्या जीवनात अनुभव रुपी मिळते कारण मानव हा इच्छा करतोच आणि परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करतो.

 ◼️ ज्याप्रमाणे आपण इच्छा करतो त्याप्रमाणे कार्य आपल्याला करावे लागतात देगा हरी पलंगावरी या प्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते आयत आपल्याला  मिळणार नाही त्यासाठी आपल्या कर्माला आपल्याला प्राधान्य दयावे लागते तेव्हाच ती इच्छा पूर्ण होते.
◼️ माझ्या लिहण्यात काही चुकलं असेल तर क्षमस्व सर्वाना माझा नमस्कार.

सेवक : हितेश  मेश्राम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ११ 】

विषय = ईच्छा अनुसार भोजन यावर मी माझ्या परिने मत मांडण्याचा प्रयास करतो.
         
◼️  महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताला प्राप्त करण्यासाठी,,,,१) परमात्मा एक,,,२) मरे या जिये भगवत नामपर,,हे दोन तत्व पुर्ण केले,,, आणि भगवंताने बाबांना,,,,३) दुःख दारी दुर करते हुये उद्धार,,,४ ईच्छा अनुसार भोजन, हे दोन तत्व पुर्ण केले,,,,, जेव्हा आपन या मार्गाचा स्विकार केलो तेव्हा दुःखी, कष्टी होतो.. आपन परमेश्वराचरणी मरण्याचा वचन दिल्यावर आपल्या शब्दावर भगवान उभे राहुन आपले दुःख दुर करतो, आपली दुःखातून मुक्तता झाल्यावर आपल्या अनेक प्रकारच्या ईच्छा आपन भगवंता समोर ठेवायला लागतो,, जसे नौकरी ची ईच्छा, घर बांधने किंवा इतर आपल्या मुला मुलींचा भविष्य अशा अनेक चांगल्या ईच्छा आपण परमेश्वरा जवळ ठेऊन त्यापरिने कर्म करतो तेव्हा भगवान आपल्या ईच्छा पुर्ण करण्यात मदत करतो, त्यासाठी आपणास कर्म करने हे ही अतिशय गरजेच आहे आपल्या प्रयत्नाला यश देऊन भगवान आपल्या ईच्छा पुर्ण करतो,,, यालाच म्हणतात ईच्छा अनुसार भोजन,,,,,,,,,,
◼️ माझ्या लिहिन्यात काही चुकल असेलच त्यासाठी सर्वांना माफी मागतो🙏

सेवक:-  तेजराम आंबिलकर, मोहगांव ( देवी )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १२ 】

 विषय = ईच्छा अनुसार भोजन यावर मी माझे मत माझ्यापरिने मांडत आहे,,,,,,,,,,,
         
◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजींनी भगवंताला प्राप्त करण्यासाठी, दोन तत्व दिले,,१) परमात्मा एक,,,,२) मरे या जिये भगवत नामपर आणि भगवंताने बाबांना ,,,,,,दोन तत्व दिले,,३) दुःख दारी दुर करते हुये उद्धार,,,४) ईच्छा अनुसार भोजन,,,,,,
     
◼️ जेव्हा आपण अनेक मध्ये होतो तेव्हा आपण खुप दुःखी व दारिद्र्यात होतो,नन्तर या मार्गाचा स्विकार करून एका भगवंताच्या चरणी मरण्याचा वचन देतो, तेव्हा आपण त्या दुःखातून व दारिद्रयातून भगवान आपल्याला मुक्त करतो,हा आयुष्य आपल्याला पुर्ण घालवन्याकरिता खुप गोष्टीन्ची आवश्यकता भासते,आपण आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनु शकेल, यावर पुर्ण लक्ष्य देत असतो, व आपण चांगले कर्म करून भगवंता समोर आपल्या ईच्छा ठेवल्या तर परमेश्वर आपल्या त्या गरजा, त्या ईच्छा पुर्ण करतो, पण अस नाही की जेव्हा आपली काही खाण्याची ईच्छा झाली व ते खायलाच मिळेल, जसे,,,असेल माझा हरि, तर देईल पलंगावरी,, याप्रमाणे नाही तर आपण आपले चांगले कर्म करून भगवंता समोर ज्या मानवी जीवनाला लागणाऱ्या गरजा आहेत त्यासाठी विनंती केली तर परमेश्वर आपल्या त्या ईच्छा पुर्ण करतो,,, म्हणजेच याचा अर्थ ईच्छा अनुसार भोजन होय,,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐जी,,,, 

◼️ माझ्या हातून लिहिन्यात काही चुका झाल्याच असतील, तरी आपण आपला लहान भाऊ समझुन मला माफ कराल, मी सर्वांना माफी मागतो🙏🏼🙏🏼🙏🏼नमस्कार जी सर्वांना,,,,,,,,,

सेवक : नितिन जांगडे, मु, मोहगांव ( देवी )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १३ 】

◼️ Eccha anusar bhojan aajch vishay yavr mi maze vichar det ahe tri pn kahi sevk dada ani taini tyanchya parine dilele vichar brobr ahe tri sangitl ahe ki apli eccha margat yenyaadhi aplya jya kahi eccha hotya mhnj jevnachya vgere eccha nasun aplya jivnachya eccha tya  kahi purn jhalya nahi pn aapn ya  eka bhagwantachya charni marun apn ekach chittane eka manane eka bhagwantala va ya manav dharmala swikarlo tya vedes aplya jya kahi eccha hotya mhnj kuni margat ale tr dukhi hote kiva ajun etar samasya hote jya anekamdhe astana tya dukhanche nivarn kahi jhale nahi pn ya margat alyavr eka bhagwantala aapn ektene va satya maryada premache aachrn krun yog magitle va te aaplyala aplya parmeshwarani apnas dile tr aaplya hya jya eccha aahet tya purn jhalya mhnunch aapnala ha 4 tha tatv ahe ki eccha anusar bhojan etk bolun mi ethech thambto va maza lihinyat v bolnyat kahi chukl asel tr mala bhgwan baba hanumanji tasech mahantyagi baba jumdevji  maf kartil ani group vr aslele sevk sevkini suddha mala maaf krtil asi tumhas vinati krto sarvana maza  namskar.

सेवक : प्रवीण हेडाऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक १४ 】

 आजच्या चर्चाबैठकीचे विषय:- ४ था तत्त्व इच्छा अनुसार भोजन

◼️ इच्छा म्हणजे आपले ध्येय, आकांक्षा त्या भागवंतासमोर मांडणे. त्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला स्वतः खूप प्रयत्न करावे लागते. केवळ आपल्या इच्छा भागवंतासमोर मांडून आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही. त्याकरिता आपल्या हातून मानवी कार्य त्या ध्येयाला अनुसरून व्हायला हवी.

◼️ इच्छा अनुसार भोजन म्हणजे आपल्याला खायला पाहिजे ते मिळाले म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाली असे होत नाही.

◼️ "No gain whatever without pain" म्हणजेच बिना मेहनत केल्याशिवाय किंवा जखम झाल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. त्याकरिता सर्व तो परी यश येई पर्यंत कार्य करीत राहायला पाहिजे.

◼️ आपण जेवढे प्रयत्न केले तेवढे फळ आपल्याला मदत असते.

◼️ प्रयत्न वाचून आपला उधार होणार नाही. आपल्या इच्छा ज्योतीच्या माध्यमातून परमेश्वर पूर्ण करतो. परंतु आपण शाळेत जातो तो शिकण्याकरिता, ज्ञान प्राप्त करण्याकरिता. वर्षभर केलेली मेहनत हे आपले इनपुट आहे. आणि परीक्षेमध्ये मिळालेले मार्क हे आपले वर्षभराची कमाई आहे. म्हणजे जेवढे प्रयत्न तेवढे आउटपुट त्या परिक्षेमधील मार्कच्या स्वरूपात आपल्याला मिळत असते. आपले प्रयत्न हे कधीही 100% राहू शकत नाही म्हणून आपल्या योग्यतेनुसार परमेश्वर आपल्याला फळ देत असतो.

◼️ यालाच "इच्छा अनुसार भोजन"असे म्हंटले आहे.सेवक : प्रशांत मानापुरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य :
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻  युवा सेवकांचा ग्रूप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages