📚 【अनुभव क्रमांक ५】✍🏻 सेवकाचे नाव : मारोती शहारे मु. परसवाडा 🙏🏼 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

📚 【अनुभव क्रमांक ५】✍🏻 सेवकाचे नाव : मारोती शहारे मु. परसवाडा 🙏🏼

🔹परमात्मा एक युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप द्वारा प्रस्तुत अनुभव मालिका 🔹

【अनुभव क्रमांक ५】

!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

मी मारोतीजी शहारे आज आपला सत्य अनुभव व मार्गात येण्याचे कारण सांगत आहे.

👉 माझी मुळ वस्ती सुंदरटोला ( गोबरवाही ) हे गाव होते. मी 2009 मध्ये माझ्या सासरी परसवाडा ईथे राहायला आलो. मी , माझी पत्नी,  २ मुल ,  १ मुलगी आणि सासुबाई असा आमचा सहा लोकांचा कुटुंब आहे. माझ्या कडे ४ एकर शेती आहे आणि शेती मध्ये पिक काढुन मी माझा प्रपंच चालवत होतो. शेतीला जोडधंदा मनुन दुधाचा धंदा होता माझ्याकडे ३ गाई होत्या आणि मी दररोज ३५ लिटर दुध काढायचो त्यातुन मला दररोज ६०० रु.मिळायचे. या प्रकारे मी आणि माझा परिवार आनंदात जगत होतो.

➡ पण काही दिवसानंतर माझ्यामागे कर्मभोग लागला. अगोदर माझ्या २ गाई मरण पावल्या आणि शेती मध्ये पिक पण पुरेसा निघत नव्हता. मला माझा प्रपंच चालवण्याकरिता पैसा अपुरा जाऊ लागला. दिवसेंदिवस मला माझ्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यात अडचनी निर्माण होऊ लागल्या. मी पैशांच्या अडचणीं मुळे त्रासलो होतो. 

➡ मी काही दिवस दुर्गादेवीची व अन्य देवीदेवताची पुजा अर्चना केली. ९ दिवस जवारा घट आणि उपवास अगोदर पासुन करत होतो. येवढं पुजापाठ करूनही माझ्या मदतीला कोणतेही दैवत धावुन आले नाही. 

➡ माझ्या गावात परमात्मा एक  मानव धर्माचे सेवक होते. शंकरजी राऊत मारोतीजी शेंडे केशोरावजी येवले ( मार्गदर्शक ) यांनी मला या मार्गा विषयी मार्गदर्शन केले.

➡ पण माझा या मार्गावर विश्वासच बसेना. कारण मी अगोदर पासुन ३३ कोटी देवीदेवताची पुजा करत होतो आणि या मार्गात सर्व देवीदेवताच विषर्जन करून एकाच भगवंताच्या चरणी मरावं लागतं ही गोष्ट मला काही पटेना.

➡ दिवसेंदिवस माझ्या अडचणी वाढू लागल्या काय करावं आणि काय नाही मला काही सुचेना. जेव्हा मानव सर्व उपाय करून कंटाळुन जातो आणि त्याच्या कडे दुसरं काहीच उपाय उरत नाही तेव्हा त्याला मानव धर्माची आठवण येते. "मरता दया नही करता" या मणी प्रमाणे मी हा मार्ग स्वीकारन्या करिता मा. केशोरावजी येवले मार्गदर्शक मु.परसवाडा यांच्या कडे गेलो त्यांनी मला मार्गदर्शन केला आणि स्व. प्रभुदासजी पडोळे मार्गदर्शक सिहोरा परिसर यांच्याकडे जाण्यास सांगितले. 

➡ मी दुसऱ्या दिवशी सुखदासजी शेंडे यांच्या सोबत स्व. प्रभुदासजी पडोळे सिहोरा यांच्या निवास्तानी गेलो. मी त्यांना माझ्या सर्व अडचणी सांगितल्या त्यावर त्यांनी मला मार्गदर्शन केला आणि मला २ महिन्याचे कार्य दिले कारण ४ दिवसानंतर १२ वर्षानंतर येणारे शुध्दीकरणाच्या  त्यागाचे कार्याला सुरुवात होणार होती. मी घरी आलो आणि कार्याला सुरुवात केली आणि मला सुख समाधान मिळाला. हळूहळू माझी घर ग्रुह्स्ती मजबुत होऊ लागली. 

➡ २०१३ मध्ये मी त्याग घडविला व नऊ हवन सुध्दा झाले. आज मी आणि माझा कुटुंब आनंदात जीवन जगत आहोत.

माझ्या लिहण्यात चुक झाली असेल तर मी सर्वांना माफी मागतो. 

सर्वांना माझा प्रेमपुर्वक नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 

आपला सेवक - मारोतीजी शहारे
पत्ता - मु. परसवाडा पो. वहानी
          ता. तुमसर जि. भंडारा
मार्गदर्शक - स्व. प्रभुदासजी पडोळे सिहोरा
                - कंठीरामजी पडोळे सिहोरा

◀️ सौजन्य ▶️
 ©️ ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप】

!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
!!सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले!!
!!अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले!!
!!मानवधर्म की जय!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages