⏩ बाबानी आपल्याला मरे या जिये भगवत नामपर तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला मरे या जिये भगवत नामपर तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला मरे या जिये भगवत नामपर तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪
【 विचार क्रमांक १ 】


➤ मानव हा पुर्थ्वीतलावर जन्माला आला तरी तो परमेश्वराचा एक अंश आहे परमेश्वराने त्याला बुध्धी दिली असून इतर गुणांबरोबरं त्यांच्यात मोह माया अहंकार निर्माण केला आहे तो स्वताला सर्वसर्वा समजतो तो परमेश्वराला मानत नाही त्यामुळे तो त्याचा बुध्दीचा उपयोग करून मोह माया अहंकारात फसतो ज्यामुळे तो दुःखी होतो दुःख निवारण करण्याकरिता तो नाना तर्हेचे उपचार करतो परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवन येते व तो त्याची आराधना करतो म्हणून महानत्यागी बाबा जूमदेवजी नेहमी सांगतात की मनुष्य हा सर्वासर्वा नाही परमेश्वर ही एक शक्ती आहे मानव हा कर्मकर्ता आहे त्याने फळाची आशा करू नये फळ देणारा भगवानच आहे म्हणून मानवाने जिवंत असतांना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करून त्याला आवडते असणारे कार्य करावे म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होतो अन्यथा तो चोऱ्याशी योनीत फिरत असतो त्या आत्म्याला अशांती मिळते आणि लक्ष चोऱ्याशी भोग येतात परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह माया आणि अहंकार नष्ट होतात यालाच म्हटलं आहे.

मरे या जिये भगवत नामपर
चूक भूल माफ कराल

आपला सेवक :- अशोक कडव वाहनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

➤ आजचा चर्चा बैठकचा विषयावर विचार देण्याचा प्रयत्न करत आहे.

➤ महानत्यागी बाबा जुमदेवजीचा कुटुंबात जसे 12 वर्षे दुःख राहिले. आणि त्या दुःखाचे निवाहरण करण्याकरिता महानत्यागी बाबा जुमदेवजीने एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि घरोघरी जनतेला हा मार्ग फुकटात वाटून दिला. ज्या वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजीने एका भगवंताची प्राप्ती केली आणि दुःखी कष्टी लोकांना जस जसे या मार्गाशी रूपरेषा जुडत गेले. तसे रंगारी समाजाची एक शांताबाई तिचे मागे एक भूतबादा लागली होता, ती स्वतःचा गालाचा मास काडुन स्वता खायची आणि ज्या वेळेस बाबाकडे आली.आणि बाबांना आपले दुःख सांगितलं त्या दुःखाचा निवाहरण करून बाबांनी तिला फुक मारून दिल आणि ती बाई अर्ध्या रस्त्यात गेली. आणि ती बाई पुन्हा अर्ध्या रस्त्यातून पलटून आली.बाबाना पुन्हा सांगायला लागली की तिचा अंगी फिरायला लागल, बाबांनी तिला तीर्थ बनवून दिला. आणि ती बाई पुन्हा रस्त्यांनी निघाली, रस्त्यांनी गेलीं अस्तानी ती बाई बाबाकडे पुन्हा वापस आली आणि बाबाने पुन्हा तिला तीर्थ करून दिल. अशी तीर्थ बनवण्याची आणि फुक मारण्याची दिन चार्या दिवस भर चालू राहिली. पण त्या बाईची दुःख दूर नाही होत होते. त्या वेळेस महानत्यागी  बाबा जुमदेवजीनी त्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. की असा शब्द ठेवला हे भगवान संसार मे ऐसी कोणसी शक्ती हे जो ईस बाईका दुःख दूर हो संके, भगवान किसे कहे ओर शेतान किसे कहे, ईसका उत्तर मुझे दिजिये. त्या वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी चा परिवारातील सर्व कुटुंब अनेक देवी देवतांना मानत होते. त्याच वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजीनी वचन दिले. परमात्मा एक  आणि मरे या जिये भगवत नामपर त्या वेळेस भगवंतांनी महानत्यागी बाबा जुमदेवीला सुद्धा दोन वचन दिले. दुःख दारी दूर करते हुये उध्दार आणि इच्छा अनुसार भोजन आता मरे या जिये भागवत नामपर यावर सांगतो म्हटलं तर आपण ज्या वेळेस या मार्गाशी जुडतो आणि भगवंता ला वचन देतो की मी अनेकात असतांनी जे माझे जुने विचार होते 36 कोटी देवाताना मानत होतो, अनेक जे काही वाईट विचार होते. आणि अनेक देवताची पुजा करत होतो. अनेक जे वेशने होते माझें या सर्व वेशनेचा मी विसर्जन केले.आणि एक चित्त एक लक्ष आणि एकच भगवंताला मानीन आणि मरे पर्यंत त्या एकचं भगवंताचे कार्य करीन असे सत्य वचन देतो.

➤ माझ्या लिहण्यात काही चुकभुल झाली असेल तर सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो.आणि महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो. आणि मातोश्री वाराणसी आईला माफी मागतो.आणि सर्व सेवक दादा आणि सेविका ताईला  माफी मागतो.

              नमस्कारजी

आपला सेवक :- क्रुणाल शेंडे येरली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

➤ आजच्या चर्चा बैठकीचे विषय ' मरे या जिये भगवत नाम पर, या विषयावर मी आपले थोडक्यात विचार व्यक्त करतो.
➤ भगवत प्राप्ती करिता.निष्काम कर्म योग साधण्याकरिता.बाबांनी चार तत्व दिले आहेत. त्या पैकी  ' मरे या जिये भगवत नाम पर ,  हा दुसरा तत्व आहे. ज्या प्रमाणे एक मन आहे.॥  मरो मरो सब कोई कहे ॥ मरणा न जाणे कोई ॥ एक बार ऐसा मरे ॥ की फिर मरणा न होई ॥ याचा अर्थ अशा की .ज्या मनुष्यानीं परमात्मा एक ला समजून घेतल आणि तो भगवंत जवळ संबधीत झाल असेल .आणि तोच भगवानाचा नावावर मरू शकते.जो मनुष्य ज्याला प्रेम करतो.तर तो व्यक्ती त्यालाच समर्पित होतो. मनून आपण भगवानाना प्रेम करून  ' कारण , प्रेम चा अर्थ होतो समर्प्रीत होणे.व भगवंतात  समर्प्रीत होणे.भगवंतात समर्प्रीत होणे मंजे भगवनाचा नावावर मरणे होय. जीवनाचा पूर्ण अधिकार भगवानाला दिले व आपले कर्म   धन , मान , सम्मान , सर्व भगवंतात समर्प्रीत करून देणे म्हणजेच मी मरीन किवा जगीन जीवनात एकच भगवंताला मानिन या प्रमाणे  मरे या जिये भगवत नाम पर या शब्दाचा अर्थ आहे.

➤तरी लिहिण्यामधे काही चुका झाले असतील तर सर्व सेवक दादांनी व ताईंनी मला माफ कराव हीच विनंती   
                                            

आपला सेवक :- अजीत तुरकर सिहोरा   

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】


➤ आजच्या चर्चा बैठकीचे विषय
➤ मरे या जिये भगवंत नाम पर

➤ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करून गोर गरीब दुःखी कष्टी मानवाला जगविण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. बाबांनी भगवत प्राप्ती करिता 4 तत्व दिले आहेत. 
त्यापैकी 2 रा तत्त्व

➤ मरे या जिये भगवत नामपर 

➤ म्हणजे आपण मार्गात येण्याच्या वेळेस आपण एखाद्या अनुभवी किंवा ज्येष्ठ सेवकासोबत कार्यकर्त्या कडे जातो. तेव्हा कार्यकर्ते आपणास मार्गदर्शन करतात आणि एका भागवंताविषयी म्हणजे या मार्गाविषयी माहिती देतात आणि सर्व जुने विचार बंद करायला सांगतात व या मार्गात मरावे लागते असे सांगतात तेव्हा जुने विचार भूत, बाधा, अंधश्रद्धा हे सर्व बंद करायला सांगतात व त्यावेळेस आपण सर्व विनंती ला बसून भगवंताला वचन देतो की मी मारिन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजी ला मानीन असे आपण वचन देतो व तेव्हा आपल्यावर असलेले सर्व दुःख दूर होतात. म्हणजे भगवंताला आपण ध्येयाने मानतो. परमात्मा एक आणि मरे या जिये भागवत नामपर हे दोन तत्व बाबां भगवंताला देतात तेव्हा भगवंत 2रे 2 तत्व देतात

➤ माज्या लिहिन्यात काही चुका झाल्या असतील तर त्या चुकीची भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आई व सर्व सेवक दादा व ताई मला माफ करतील अशी मी सर्वाना विनंती करतो


आपला सेवक :- प्रशांत मानापुरे मोहाडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य
ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
 युवा सेवकांचा ग्रूप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages