📚 【अनुभव क्रमांक १】 ✍🏻 सेवकाचे नाव : हेमराज (सोनु) शेंडे मु. मांडवी 🙏🏻 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

📚 【अनुभव क्रमांक १】 ✍🏻 सेवकाचे नाव : हेमराज (सोनु) शेंडे मु. मांडवी 🙏🏻

🔹 परमात्मा एक युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप द्वारा प्रस्तुत अनुभव मालिका 🔹

【अनुभव क्रमांक १】


!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!


 ▶️आज मी माझ्या आयुष्यातील घडलेला व न विसरणारा अनुभव तुम्हाला सांगत आहे. मी हेमराज(सोनू)शंकर शेंडे
मी 2012 पासून ग्रामपंचायत बेलगांव येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे. आमच्या काही मागण्यांसाठी दिनांक 15 नोव्हेंबर 2015 ला हिवाळी अधिवेशन चालू असताना  नागपूर येथे विधानभवनांवर  मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्टातील प्रत्येक तालुक्यातील  ग्रामपंचायत मध्ये एकूण २७,००० संगणक परिचालक कार्यरत आहेत. ते सर्व परिचालक आपल्या हक्काच्या मागण्यासाठी मोर्च्यात सहभागी झाले होते. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आम्ही सर्व परीचालकांनी नागपूर येथे रस्त्यावर बसून मागण्याच्या पूर्ततेसाठी वाट पाहत बसलो होतो. परंतु त्या दिवशी मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सर्वांनी रस्त्यावरच आपला तळ ठोकला होता. त्यामुळे मी सुद्धा तिथंच थांबलो व रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान मी माझ्या मित्रासोबत एका पोलीसाच्या रुमवर मुक्काम केलो. 

▶ दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राबरोबर मंडवीला येण्याच्या तयारीत होतो परन्तु मोरच्याला एक भेट द्यायची व गावाकडे निघायचं अस ठरवलं. व आम्ही मोर्च्यात सहभागी झालो तर इकडे सर्व शांत असतांनी भाषणे चालू होती व काही परिचालक मंत्र्यांचे पुतळे बनवून पेटवत होते. अचानक आमच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चाला संपवण्यासाठी लाठीचार्ज केला त्यामुळे सर्व परिचालक मिळेल त्या रस्त्याने पळू लागले. आम्हाला काही सुचलच नाही व आम्ही सुद्धा त्या ठिकाणावरून पळ काढला. व एका गल्लीमधून पाळण्याचा विचार केलो व पळालो लहानशी गल्ली असल्यामुळे त्या गर्दीमधून जायला जागाच मिळाली नाही व मी त्या गर्दीत पायऱ्यांवर खाली पडलो. २७००० परीचालकांच्या गर्दीत माझ्या अंगावरून लाता मांडून सर्व पळत होते. मी उठण्याचा खूप प्रयत्न केला परन्तु मला उठता आलं नाही. माझा श्वास वाढत गेला व मला अस वाटलं कि आता सर्व संपलं. आई घरी माझी वाट बघत असेल माझ्या आईच रक्षण कोण करेल अश्या अनेक विचारातच मी गोंधळून गेलो व परमेश्वराला फक्त हाक दिली कि, हे भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी माझं रक्षण करणारे तुम्हीच आहात. मला  घरी सुखरूप पोहोचविणारे तुम्हीच आहत. माझी आई माझे रिश्तेदार सर्व माझी वाट बघत असतील म्हणून मला या चेंगराचेंगरी मधून वाचविणारे तुम्हीच आहात. मी मानव धर्माचा प्रचार व प्रसार करिन अशी विनंती परमेश्वराला केलो व मी बेहोष  झालॊ. मग नंतर काय घडलं मला काहीच माहित नाही.

▶मला जेव्हा गाडीत झोपवलं तेव्हा जोरजोरात ओरडनाऱ्या काही मुलामुलींचा आवाज आला. ते मला उठवत होते. मी डोळे उघडलो व बघितलो तर काय मी पोलीस गाडीत झोपलो होतो. त्या डग्यात खूप माझ्यासारखे परिचालक होते. मला जाग येताच त्यांनी मला गाडीतच पाणी पाजलं.  व मला विचारू लागले कि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात. तर मी त्यांना सांगण्यासाठी तोंड उघडला व तालुका व जिल्हा भंडारा अस सांगण्याचा खूप प्रयत्न केलो पण माझी पूर्ण वाचा बंद झाली होती, हात हलवण्याचा प्रयत्न केलो पण हात सुद्धा हलत नव्हते दोन्ही हात तुटले अस मला वाटल. पाय वर उचलण्याचा प्रयत्न केलो पण पाय  उचलत नव्हते. आता सर्व संपलं अस वाटलं व मी रडू लागलो. मला त्या गाडीत कोणीच ओळखीचे नव्हते म्हणून मी माझ्या तालुक्यातील मित्रांना कॉल करणार होतो  पण बोलता येत नसल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही.माझ्या तोंडामधून रडण्याचा  आवाज निघत नव्हता पण डोळ्यामधून अश्रू येत होते. पण हे सर्व होत असताना मी बाबा हनुमानजी च्या धावा करत होतो. मला बोलता आल्या पाहिजे माझे हातपाय व सर्व शरीर ठीक राहिल्या पाहिजे अशी विंनती परमेश्वराला करत होतो. मी मनात विनंती केलो व भगवंताला सांगितलं कि मला आताच्या आता बोलता आल्या पाहिजे व माझे हातपाय काम केल्या पाहिजे अस सांगितलो व थोड्याच वेळात मला बोलता आलं. मी खिशातून मोबाईल काढलो व मित्रांना कॉल केलो व त्यांना दवाखान्यात मला नेत आहेत कोणत्या दवाखान्यात नेत आहेत ते माहित नाही पण तुम्ही तिकडे या अस त्यांना संगीतलो. गाडीत असणाऱ्या ना पिण्यासाठी पाणी मगितलो मला खूप चांगलं वाटलं कारण परमेश्वराने माझी हाक ऐकली होती. मला हातपाय हलवता येत होता.  पण माझ्या छातीमध्ये पुष्कळ त्रास होत होता. मला श्वास घ्यायला अडचण होत होती.माझया डोक्याला पण त्रास होता व पोटाला पण त्रास होत होता. मग आम्हाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं.  मी सोबत असलेल्या परीचालकाना विचारलो कि, मला कोणत्या दवाखान्यात आणलं. तर त्यांनी मेयो मध्ये सांगितलं. मला थोडं बरं वाटलं कारण माझ्या गावचे 4 ते 5 मूल तिथं GNM ट्रेनिंग वर होते.  मी माझ्या गावशेजारील परीचालकाना कॉल करून दवाखान्याचा नाव सांगितलं. व त्यांना लवकर या म्हणून विनंती केली.  त्या दवाखान्यात खूप गर्दी झालेली होती नुसते संगणक परिचालक बेड वर झोपले होते त्यांचा इलाज चालू होता. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. तेवढ्यात मला माझ्याच गावचा मुलगा दिसला व त्याला मी आवाज दिला तर तो लगेच डॉक्टर ला घेऊन माझ्याकडे आला. मला काहीच सुचत नव्हते फक्त माझ्या तोंडातून बाबा हनुमानजिचा नाव निघत होता. भगवंताला विनंती करत होतो कि मला एवढा त्रास आहे परन्तु माझी आई घरी माझी वाट बघत असल्यामुळे मला लवकरात लवकर घरी जाण्यासाठी सुट्टी पाहिजे. व माझ्या सर्व रिपोर्ट नॉर्मल पाहिजेत अशी विनंती मी भगवंताला करत होतो. डॉक्टरानी मला डोक्याचा सिटी स्कॅन, व पोटाला लागल्यामुळे व तोंडामधून रक्त निघत असल्यामुळे X-ray, काढायला सांगितलं. व मला त्या रूम मध्ये नेलं. पण काहीच निघलं नाही रिपोर्ट मध्ये थोडा प्रॉब्लेम वाटल्यामुळे मला पुन्हा X-Ray व सिटी स्कॅन साठी मोट्या मशीन कडे पाठवलं पुन्हा तसंच प्रॉब्लेम. त्यांनी  माझा 2 ते 3 मशीन वर 5 ते 6 वेळा X-Ray व सिटी स्कॅन काढला परन्तु त्यांना दिसत नव्हतं कि मार कुठं लागला आहे. कारण मी भगवंताला विनंती केली होती कि रिपोर्ट नॉर्मल पाहिजे म्हणून। व तसच झाल. नंतर एका डॉक्टर नि सांगितलं कि लिव्हर ला मार लागलं आहे त्यामुळे त्रास होत आहे व तोंडामधून रक्त निघत आहे. माझे डोळे सुद्धा पूर्ण लाल झाले होते. लहान मुलं तर पाहूनच घाबरत होते. म्हणून त्यांनी मला admitte केलं. माझ्या गावचे मूल असल्यामुळे मला डॉक्टरांनी खूप वेळ दिला व चांगली काळजी घेतली. पण मी घरी कॉल केलो नाही व कुणाला करू दिला नाही.. 3 ते 4 दिवस मी भर्ती राहिलो सर्व डॉक्टर वगैरे ओळखीचे झाले होते. पण माझ्या लिव्हर ला मार असल्यामुळे  मला त्रास होत होता. नंतर मी सुट्टी काढून घरी आलो. पण माझ्या डोळ्यातील रक्त जसेच्या तसा होता. 1 ते 2 महिने डोळे दुरुस्त होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तोंडातून रक्त येणे चालूच होता. मी घरी येताच व माझ्या डोळ्यांकडे बघताच आई घाबरली व रडू लागली.  

▶पण मी माझे धैर्य कमी होऊ दिल नाही. मी मोहडीला  एका सेवकसोबत भवनमध्ये गेलो. चर्चा बैठक चालू होती. मी बाबाला नमस्कार करून पूर्ण दुःख संगीतलो. सांगतानी माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. बाबांनी पण मला हिम्मत दिली व भगवंताला योग माग आराम होईल अस सांगितलं. बाबानी व ढबाले गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं व 21 ची तीर्थ कटोऱ्यामध्ये  बनऊन तिथं डोळे उघडझाप करायची अस सांगितलं. व तोंडातून  रक्त येन बंद झाल्यापाहिजे यासाठी योग मागायला सांगितलं.
मी घरी येऊन दुसऱ्या दिवशी पासून आईसोबत कार्य करायला सुरुवात केलो. बघा भगवंताची लीला न्यारी या म्हणीप्रमाणे माझे तिसऱ्या दिवशीच माझ्या तोंडामधून रक्त येणं बंद झाला. व नंतर हळूहळू 21 दिवसाच्या कार्यात डोळे पण दुरुस्त झाले. बघा परमेश्वरानी मला साथ दिली व माझे संपूर्ण दुःख नाहीसे झाले. एवढ्या मोठ्या संकटामधून मला बाहेर काढणारे आराध्य भगवान बाबा हनुमानजी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि आई वाराणसी* यांच्या कृपेने व आशीर्वादाने मी दुरुस्त झालो भगवंताचे, बाबाचे व आईचे मी ऋणी आहे.

माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर सर्वप्रथम  मी भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी व वाराणसी आईला माफी मागतो.

✍🏻 सेवकाचे नाव: हेमराज(सोनू) शंकर शेंडे
                          मु.पो.मांडवी ता. जि. भंडारा
सेवक क्र. : ५४७२
मार्गदर्शक:- मा. श्री.यशवंतरावजी ढबाले गुरुजी मु. मोरगांव          🔸 सौजन्य 🔸
    ©️  युवा सेवकांचा ग्रूप

!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
!!सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले!!
!!अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले!!
!!मानवधर्म की जय!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages