⏩ आठवडी चर्चा बैठक घेण्याचे कारण काय आहे ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

⏩ आठवडी चर्चा बैठक घेण्याचे कारण काय आहे ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


【 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ आठवडी  चर्चा बैठक घेण्याचे  कारण काय आहे ⏪

【 विचार क्रमांक १ 】

◼ कुनीतरी जगात पुस्तकं लिहीली आनी त्यांचा बोध घेता यायला पाहिजे म्हनुन शाळा उघडून दिलं आनी आपन तेच घ्यायला शाळेत जातो. 

◼ याच प्रमाने महानत्यागी बाबा जुमदेवजी यान्नी सुद्धा एका भगवंताची प्राप्ती केली आनी तत्व, शब्द, नियम मिडवले आनी आम्हा गोर-गरिब, दु:खी-कष्टी लोकांना वाटून दिलं. पन याचि जानिव सेवकांना कसी होईल, त्याकरिता बाबानी आठ्वडी चर्चा बैठक उभारली.

◼ आपन चर्चा बैठकीला जातो पन का म्हनुण जातो हेच आपल्याला कडत नाही. आपन बैठकीला जातो ते फक्त तत्व, शब्द, नियमाची जानीव करून घेन्याकरिता, बाबानी दिलेल्या शिकवनीला अंगीक्रुत करन्याकरिता. आपल्या कडून आठवडाभरात काहितरी चुक घड़त असते आनी त्या चुकिची सोडवनुक करन्याकरिता आपन बैठकिला जातो. चर्चाबैठक ही आपल्या जिवनात प्रकाश घालायचा एक साधन आहे, फक्त ते घ्यायची आपली तयारी असायला पाहिजे.

◼ आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलेन आनी आपल्या शब्दाला विराम देते. 
माझ्याकडून बोलन्यात काही चुक घडली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजी ला आनी महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफ़ी मागतो तसेच सर्व सेवक दादा आनी सेवकीन ताईला सुद्धा माफ़ी मागतो.

✍🏻 सेवकाचे नाव : श्री दादा कुंभारे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

◼ आठवडी चर्चा बैठक घेण्याचे कारण म्हणजे मी आपल्या मते थोडक्यात विचार देतो व चुकल्यास सर्वांनी माफ करावं.

◼ महानत्यागी बाबा जुमदेवजी नी अती परिश्रम करून गोर गरीब दुखी कष्टी लोकांना मानव धर्माची आठवडी बैठकी चा   माध्यमातून खेलोपाळी जाऊन सेवकांना जागविले व आपल्या परिवारासोबत बसून बाबांनी तत्व शब्द नियमाची जाणीव केली व तीच जाणीव मानव धर्माला 
जुळले त्यांना सांगितली. चर्चा बैठकीत जाऊन आपल्या कडून झालेल्या आठवड्यातील चुकांचा निराकरण करता येते व नकळत चुका झाल्या ते पण माफ होतात आणि आपल्या मार्गाची माहिती पण मिळत राहते व मानव धर्माचा  प्रचार व प्रसार पण होत राहते. 

◼ येवड बोलून मी माझे मत व्यक्त केलं तरी माझ्याकडून लीहाण्यात चूक झाली असेल तर सर्वांना माफी मागतो...

✍🏻 सेवकाचे नाव : उमेश दादा पराते

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】


◼ आठवडी  चर्चा बैठक घेण्याचे  कारण काय आहे या विषयावर मी माझे विचार आपल्या बुद्धिप्रमाणे देत आहो,

◼ मानव धर्माची धर्मशाळा म्हणजे चर्चा बैठक.चर्चा बैठक ही एक भक्ती आहे बाबांनी या मार्गाची स्थापना करून हा मार्ग दुःखी कष्टी लोकांपर्यंत कस पोहचेल ह्यासाठी गावोगावी जाऊन चर्चा बैठक घेऊन या मार्गाचा प्रसार आणि प्रचार केला. बाबाच्या या अथक परिश्रमातून या मार्गाचा छोट्या रोपट्याच मोठं कल्प वृक्ष बाबांनी तयार केला. 

◼ बाबांची शिकवण चार तत्व, तीन शब्द, पाच नियम,सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना आणि सेवकांना आलेले अनुभव हे चर्चा बैठकीचे विषय असतात यातून प्रत्येक सेवक आपल्या परीने विचार देतो त्यांचा विचारातून एखादा सेवक कुठे चुकलं असेल तर आपल्या चुकीची जाणीव करून त्या चुकीची सोडवणूक करतो. बैठकीत भगवंत उपस्थित असतात आणि जिथे भगवंत उपस्थित असतात तिथे दुःख लवकर नष्ट होतात.

◼ त्याचप्रमाणे जेष्ठ सेवक आणि मार्गदर्शक आपल्याला बाबांच्या हयातीतील अनुभव सांगतात,ही युवा सेवकांसाठी सुवर्ण संधी असते की त्यांना बाबांचे काळातील अनुभव माहीत होतात. नवीन आलेले सेवक आपल्याला मार्गात येण्याचं कारण सांगतात.तर मानव धर्माची शिकवण आणि मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार हा  चर्चा बैठकीचे उद्देश आहे.

◼ माझ्या लिहण्यात काही चुकलं असेल तर क्षमा करा.

✍🏻 सेवकाचे नाव : हितेश दादा मेश्राम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】

◼ आजच्या विषयावर मी आपले विचार देत आहे.

◼ महानत्यागी बाबा जूमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करून आपल्या गोर दुखी कष्टी  मानवाला तत्व शब्द नियम दिले आहेत व त्या तत्व शब्द नियमाची जाणीव कशी  होईल बा म्हणून महानत्यागी बाबा जूमदेवजीनी आपल्या सेवकांना आठवड्यातून एक चर्चा बैठक दिली आहेत आणि आपण त्या चर्चा बैठक मधे गेलो तर आपल्याला तत्व शब्द नियमाची जानीव होईल व ज्या आपल्याशी आठवड्यातून काही चुका होतात ते चूक आपल्याला बैठकीत लक्षात येते व मानव धर्माचा  प्रचार व प्रसार होतो म्हणून आपल्याला चर्चा बैठक दिली आहे 

◼ काही लिहण्यात चूक झाली असेल तर आपल लहान दादा समजून मला माफ कराव.

✍🏻 सेवकाचे नाव : रोशन दादा चाचीरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】

◼ या विषयावर मी आपले विचार देत आहे.

◼ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी खूप परिश्रम करून एक भगवंत मिळविला व आम्हा दुःखी कष्टी लोकांना एका परमेश्र्वराचे परिचय करून दिले व या धर्माचे उपासक ! सेवक बनविले व आम्ही बाबांनी दिलेली मार्गांची शिकवण व तत्व शब्द नियम यांचे पालन करुंण आम्ही सुखी झालो. 

◼ बाबांनी ज्या प्रमाणे आपल्या मार्गदर्शनातून सेवकांना जागविले त्याच प्रमाणे माझं सेवक सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून इतरांना जागवेल म्हणून आम्हाला आठवडी पंधरवाडी चर्चा बैठक उघडून दिली ही चर्चा बैठक म्हणजे या मानव धर्माची शाळाच नाही तर एक प्रकारची या मार्गांची भक्ती आहे या चर्चा बैठ़कमुळे आपल्या विचारांची देवाण घेवाण होत असते व आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या असतात त्यांची सोडवणूक होतो.

◼ या बैठक मधे भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित राहतात । चर्चा बैठकमुळे मानवाचे आचार विचारात एक वेगळाच बद्दल घडून येतो चर्चा बैठकीचा बोध घेणारा सेवक कितीही मीठे संकट आले तरी तो डगमगनार नाही व त्याला भगवंत सुध्धा साथ देतो. म्हणतात ना चांगले फुल नेहमी देवाला आवडतात त्याच प्रमाणे आपल्या जिवनातं चर्चा बैठकांला फार महत्व आहे.

◼ विचार देण्यात काही चुका झाल्या असतील तरी सर्वांनी माफ करावं.

✍🏻 सेवकाचे नाव : अशोक दादा कडव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】

◼ आठवडी  चर्चा बैठक घेण्याचे  कारण काय आहे.

◼ मी या विषयावर आपले थोडक्यात विचार व्यक्त करत आहे.

◼ आठवडी चर्चा बैठक ही भक्ती आहे आणि यामध्ये मानव धर्माची शिकवण आपल्याला मिळते. 

◼ आपण नियमित चर्चा बैठक मध्ये गेल्यामुळे आपल्याला तत्व शब्द नियमांची जाणिव होते,  सेवकावर आलेले अनुभव ऐकायला मिळतात आणि अनुभवातुनच मानव शिकत असतो.

◼ आठवड्यात आपल्या कडुन झालेल्या चुकीची सोडवणुक होण्यास मदत होते.


◼ चर्चा बैठक मध्ये एकामेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते. ही एक मानव धर्मातील सेवकासाठी धर्मशाळा आहे. सर्वांनी आठवडी चर्चा बैठकचा लाभ घ्यावा हीच विनंती.

◼ माझ्या लिहण्यात किंवा विचार व्यक्त करण्यात चुकी झाली असेल तर मला माफ कराव.

✍🏻 सेवकाचे नाव : आशिष दादा चौधरी 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】

◼ चर्चा बैठक ही एक भक्ती आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनीअति घोर परिश्रम करून हा मानव धर्म स्थापन केला. व आपल्या सारखा गोर गरीब दुखी सेवकाला मोफत वाटून दिला.

◼ बाबानी भगवंताच्या प्रप्तीकरीता निष्काम कर्म योग साधण्याकरिता  जे चार तत्व.तीन शब्द.व पाच नियम दिले आहेत.हे काय आहेत हे सेवकांना कसे कळावे मनून  बाबांनी चर्चा बैठक दिली व तत्व शब्द नियमाचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण मंजे सत्य.मर्यादा.प्रेम प्राप्त करून नियमा प्रमाणे वागावे हा संदेश चर्चा बैठकीत मिळतो.

◼ व अनेक अनुभव मिळतात. व त्या अनुभवातून आपण शिकत असतो .व अनुभवाचा माध्यमातून  आपल्या चुका लक्ष्यात येत असतात.व मानव धर्म काय आहे कस आहे हे आपल्याला महित होते. व तत्वाचा शब्दाशी .शब्दचा नियमाशी व नियमाचा अनुभवाशी एक लक्ष साधून परमेश्वरी क्रुपेची ओळख करून घ्यावी व आलेल्या अनुभवानुसार इतर सेवकांना समोर वाढविन्यचा प्रयत्न करवा जेणे करून सेवक समोर वाढू शकेल हाच खरा चर्चा बैठकीचा उद्देश आहे 

✍🏻 सेवकाचे नाव : अजित दादा तुरकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ८ 】

◼ आठवडी चर्चा बैठक घेण्याचे महत्त्व या विषयावर मी आपले विचार व्यक्त करीत आहे.
◼ चर्चा बैठक ही एक भक्ती आहे. महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले देह चंदनासारखे झिजवून एका भगवंताची म्हणजे मानव धर्माची प्राप्ती केली व आपल्या सारख्या गोर गरीब सेवकांना ही सेवा वाटून दिली.

◼ सर्वप्रथम बाबांनी भगवंताची प्राप्ती करून 4 तत्त्व मिळविले तर बाबांनी आपला सेवक अज्ञानी नाही राहावं म्हणून प्रत्येक गावा गावात कार्यकर्ते नेमले व चर्चा बैठकीची निर्मिती केली. तर या चर्चा बैठकीमध्ये 4 तत्त्व 3 शब्द 5 नियम व अनुभव हे विषय सांगितलेले आहे. तर या विषयावर आपली चर्चा बैठक घेण्यात येत असते.

◼ यामध्ये तत्वाचा शब्दाशी, शब्दाचा नियमासी, नियमाचा अनुभवाशी संबंध असतो व यावर चर्चा बैठक घेण्यात येत असते. यामध्ये सेवकांच्या हातून झालेल्या चुकीची सोडवणूक बैठकीच्या माध्यमातून होत असते व सेवकांना आलेले नवनवीन अनुभव बैठकीत ऐकायला मीडत असते. यामध्ये सेवकांना शिकायला मिडते याचाच अर्थ असा की ज्याप्रकारे प्रत्येक मुलगा शाळेत जातो त्यासारखी चर्चा बैठक ही एक मानव धर्माची शाळा आहे.

◼ यामध्ये जर माज्या लिहिण्यात काही चुकी झाली असेल. तर सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजिला व महाणत्यागी बाबा जुमदेवजीला व वाराणसी आईला व सर्व सेवक दादा व ताईला माफी मागतो व मला सर्व सेवक दादा व ताई माफ करतील.

✍🏻 सेवकाचे नाव : प्रशांत दादा मानापुरे

📚📚📚📚📚📚📚📚📚📚
।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages