परमेश्वरला समोर ठेवून प्रत्येक मानवाने आपले कार्य करावे. आपण तत्व, शब्द, नियमाचे पालन केले तर आपण कधी दु:खी राहणार नाही. मानव लाख हुशारी करणार पण त्याला सत्यावरच जगावे लागणार आहे. म्हणून आपण जसे कार्य केले तसेच आपल्याला फळ मिळणार म्हणून आपण सत्य, मर्यादा व प्रेम तसेच मानव धर्माच्या शिकवणीचे गुण जोपासले पाहिजे.
परमेश्वर दिसत नाही पण त्याचे गुण दिसतात कारण तो २४ तास मानवाजवळ असून निराकार व चैतन्यमय आहे. जी शक्ती बाबाजवळ आहे तीच शक्ती मानवाजवळ जवळ आहे. पृथ्वी एक, भगवान एक पण मानवाचे विचार वेगवेगळे आहेत. म्हणून माणसाने कुठे त्याचा जर स्वार्थ साधत आहे तर, त्याने कधीही स्वार्थासाठी खोटे नाटक करू नये. मानव सत्य, मर्यादा, प्रेम व तत्व, शब्द नियम व शुद्ध विचाराने वागला तर भगवान प्राप्त करणार. जर मोह, माया,अहंकार व बेईमानीने वागला तर सैतान प्राप्त करणार. शेवटी कार्य करणार मानवच आहे. म्हणून शब्दच भगवान आहे व शब्दच सैतान आहे. म्हणून प्रत्येक नर-नारीने मानव धर्माच्या शिकवणीने वागून चार तत्व, तीन शब्द, पाच नियमाचे, काटेकोरपणे पालन करावे. चांगले कार्य करून आपले जीवन सफल बनवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा