⏩ बाबानी आपल्याला दुःख दारी दूर करते हुए उद्धार तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

Breaking

रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला दुःख दारी दूर करते हुए उद्धार तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला दुःख दारी दूर करते हुए उद्धार तत्व दिले आहे या तत्वाचा अर्थ काय आहे ❓ ⏪
【 विचार क्रमांक १ 】

◼️ आजच्या विषयावर मी आपले विचार देत आहे

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी सांगितले आहे की मानवाने जर परमेश्वराला आवडणारे कार्य केले, मोह माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वांशी सत्य व्यवहार केले,  तो मर्यादाने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी आवडत असतो. 

◼️ नैसर्गिक वातावरानामुळे त्याला दुःख येतात तसेच त्याला जीवन जगतांना अनेक प्रकारच्या अडी अडचनी येतात. अश्या वेळेस तो अनेक उपचार करतो त्यावेळेस परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्यांचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजरीत्या नष्ट होतात या कामात परमेश्वर त्याला साथ देत. 

◼️ सरतेशेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजजे मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते. 

ज्या प्रमाणे सतयुगात अर्जुनाच्या बाणाने कर्ण जेव्हा जळजळीत झाला , तेव्हा त्याला श्रीक्रुश्ण म्हटलं "कर्णा आता तू मरत आहेस तरी तुला शेवटच्या क्षणि काय हवं ते मागं" तेव्हा त्या कर्णाने श्रीक्रुश्ण भगवंताला म्हटलं, हे भगवान मला जिथे मुरदे जाळतात तिथे मला जाळू नका. तेव्हा त्या श्रीक्रुश्ण त्या कर्णाला आपल्या हातावर जाळले म्हणूच त्या कर्णाला भगवंताच्या हातून मुक्ती मिळाली.

◼️ या कलयुगात सुध्दा मानव धर्मांच्या सेवकाला भगवान बाबा हनुमानजी त्याला चोऱ्याशी योनी फिरू न देता मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याच्या जीवनाचा उध्दार करतात. यालाच म्हटलं आहे दुःख दारी दूर करते हुये उध्दार. 

◼️ लिहण्यात किंवा विचार देण्यात चुक झाली असेल तर मला माफ करावं.


आपला सेवक :- अशोक कडव,  वाहनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक २ 】

◼️ या विषयावर मी माझे विचार देत आहे.

◼️ "भगवंताच्या प्राप्ती साठी व निष्काम कर्मयोग साधण्यासाठी" जे चार तत्व दिलेले आहेत. त्यामधील ३ रा तत्व "दुःख दारी दूर करते हुये उद्धार". हा तत्व भगवंतांनी मानवाला दिलेला आहे. म्हणजेच अतिशय महत्वाचा हा तत्व आहे.
   
◼️ आज बरेचसे सेवक म्हणतात कि आम्ही गरीब माणसं आहोत. आमच्या जवळ काही नाही आहे. त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व उपयोगाचा तत्व आहे.

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी आपल्या मार्गदर्शनात सांगत होते कि, "माझा सेवक दुःखी आणि गरीब" राहणार नाही. दुःखी व गरीब राहील तर तो आपल्या कर्माने. बाबाचे हे वाक्य अतिशय खरं आहे. भगवंतांनी जो आपल्याला ३ रा तत्व दिलेला आहे त्यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे कि, दुःख दारिद्र्य दूर करते हुये उद्धार म्हणजेच आपल्या सेवकांवर असलेले दुःख व दरिद्री (दरिद्री म्हणजेच गरिबी) दूर करून सरते शेवटी जेव्हा सेवकांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या आत्म्याचा उद्धार होतो. 

◼️ सेवकांच्या आत्म्याला शांती मिळते. भगवंत सेवकांच्या आत्म्याला भटकू देत नाही. म्हणजेच आपल्या आत्म्याला मोक्ष मिळून आपल्या जीवनाचा उद्धार होतो.

◼️ लिहण्यात किंवा विचार देण्यात चुक झाली असेल तर मला माफ करावं.

आपला सेवक:- हेमराज शेंडे मांडवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ३ 】

◼️ आजचा विषय खुप सूंदर आहे बाबांनी भगवत प्राप्तिकारिता निष्काम कर्मयोग साधन्यकारिता बाबानी 4 तत्व दिले आहेत. त्यापैकी 3 रा तत्व "दुःखदारी दूर करते हुए उद्धार".

◼️ महान त्यागी बाबा जुमदेवजीनी  म्हटले आहे की  *"मेरा सेवक कभीबी दुखी ओर गरीब नहीं रह शकता,अगर सेवक दुखी और गरीब है तो वह अपने कर्मो से"* या शब्दातच तिसऱ्या  तत्वाचे अर्थ लपलेले आहे. 

◼️ सेवक जर तत्व, शब्द, नियमाचे काटेकोर पने पालण करत असेल तर परमेश्वर त्या सेवकाला थोडीही ईजा पोहचु देणार नाही व सेवक तत्व शब्द नियमाचे पालन करत नसेल तर त्यावर्ती दुःख येतात व् त्याची आर्थिक परिस्थिति खालावाते.

◼️ म्हणून सेविकानी बाबांच्या शिकवनी प्रमाने आपले जीवन जगावे जेव्हा आपण बाबांच्या शिकवनी प्रमाने आपले जीवन जगतो.तेव्हा परमेश्वर शेवटी आपल्या जीवनाचा उद्धार करतात म्हणजे आपल्याला मुक्ति प्राप्त होते. "हेच आहे दुःख दारी दूर करते हुए उद्धार".

◼️ लिहण्यात किंवा विचार देण्यात चुक झाली असेल तर मला माफ करावं.

आपला सेवक :- रोशन ई. दमाहे सिरसोली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ४ 】

◼️ आजचे विषय आहे "दु:खदारी दूर करते हुये उद्धार" बाबांनी जे  भगवत प्राप्ती करिता व निष्काम कर्मयोग    साधन्याकरिता जे चार तत्व दिले आहेत.त्यातला दु:खदारी दूर करते हुये उद्धार हा तिसरा तत्व आहे तरी मी या विषयावर आपल्या बुद्धीनुसार विचार सांगत आहे.☝☝महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली .आणि सेवकांना संदेश दिला.की तत्व शब्द नियमांची प्राप्ती करून भगवंताला प्राप्त करू शकता. कारण ज्या प्रकारे बाबांनी शांताबाई रंगारी या बाईचे सैतान दूर केले.व महान त्यागी बाबा जुमदेवजींनी  भगवंताला वचन दिले , की हे "भगवान बाबा हनुमानजी इमान सामने रखकर निस्वार्थ आपकी सेवा करुंगा ऐसा मै सत्य वचन देता हू"  त्या प्रकारे महान त्यागी बाबा जूमदेवजींनी  भगवंताला         

(1) परमात्मा एक         
(2)मरे या जिये भगवत नाम पर 

◼️ हे  दोन तत्व दिले. तेव्हा भगवंत बाबांवर प्रसन्न झाले.व भगवंतानी बाबांना

(3)दु :खदारी दूर करते हुये उद्धार
(4)इच्छा अनुसार भोजन         

◼️ हे दोन तत्व दिले.आता विषय आहे  "दु :खदारी दूर करते हुये उद्धार" चा अर्थ तर महानत्यागी बाबा जुमदेवजीनीं आम्हाला सांगितले की  मोह, माया , अहंकार  यांचा त्याग करून सत्याचा व्यव्हार करून , मर्यादा चा पालन करून , प्रेमाचा जो आचरण करेल त्याचे दु:ख एका क्षणामधे दूर होईल.

◼️ मानवाला दु:ख येणे स्वभाविक आहे.मानव हा चुकीचा पात्र आहे .व मानवाने भगवंताला समोर ठेऊन कार्य केले.तर मानवाचे दु:ख दूर करण्यासाठी  भगवंत मानवाचा समोर उभे राहतात. व भगवंताला समोर ठेऊन व सत्य , मर्यादा, प्रेमाचा जो  आचरण करेल  व तत्व , शब्द , नियमांचा जो  पालन करेल त्याचे दु:ख  दूर होऊन  त्याला मोक्ष प्राप्त होतो  व त्याला भगवंताच्या चरनामध्ये जागा मिळते. व यालाच "दु:खदारी दूर करते हुये उद्धार" असे  म्हणतात.....     
                                            
◼️ तरी माझ्या  लिहिण्यामध्ये काही चुका झाले . असतील तर सर्व सेवक दादांनी व ताईंनी मला माफ कराव.  
                         
आपला सेवक :- अजीत तुरकर ( सीहोरा )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ५ 】

◼️ आजचा विषय खुपच छान असून यावर मि विचार देण्याचा प्रयत्न करतो.
           
◼️ 'दुखदारी दूर करते हुये उद्धार' मला वाटते हा विषयच प्रत्येक सेवकांना या मार्गात घेऊन आला.या मार्गात येणारा प्रत्येक सेवकच आपले अनेकांत असलेले दुःख जे दूर होत नव्हते ते दुःख दूर करण्यासाठीच या मार्गात सेवक आला.

◼️ जेव्हा शांताबाई नावाच्या बाईची भूतबाधा  दूर झाली व बाबांनी 'ईमान' या शब्दाची जाणीव करून भगवतांला तत्वरूपी दोन वचन दिले.

'परमात्मा एक व मरे या जिये भगवंत नाम पर'

◼️ या वरील दोन तत्व रुपी बाबांनी भगवतांला दोन शब्द दिले तेव्हाच भगवतं नि बाबांना 'दुखदारी दूर करते हुये उद्धार व इच्छा अनुसार भोजन' हे तत्व रुपी दोन शब्द दिले.

◼️ म्हणजेच या मार्गात येणाऱ्या सेवकांचे दुःख तेव्हाच दूर होते जेव्हा सेवक अनेकांत असतानी अंधश्रद्धा पाळून निर्जीवात भगवतं शोधत होता आणि सर्व प्रकारचे धागे दोरे बांधून,उपवास करून नाना प्रकारच्या मूर्ती आणि मन्दिरात भगवतं शोधत होता.हे अश्या प्रकारचे सम्पूर्ण जुने विचार बंद करून या मार्गात येऊन सेवक एक चित्त एक लक्ष एक भगवान या प्रमाणे जर पहिल्या दोन तत्वाचे 'परमात्मा एक व मरे या जिये भगवंत नाम पर' आपल्या जीवनात अंगीकार करेल म्हणजेच चोवीस तास निराकार चैतन्यमय आत्मरूपी परमात्मा ओळखून या मार्गात येऊन एका परमेश्वराच्या मार्गात मरून ध्येयाने एक परमेश्वर मानेल तेव्हाच या आपले दुःख दूर होतील व चौर्यांशी योवणीच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती साठी आपण प्राप्त करू.
            
◼️ माझ्या लिहण्यात काही चूकभुल झाली असेल त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो.व महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो आणि मातोश्री वाराणसीआईला माफी मागतो. सर्व सेवक दादा आणि सेविका ताईला माफी मागतो.
             
आपला सेवक :- कृणाल शेंडे येरली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ६ 】

◼️ या मार्गातील सेवक जर दिलेल्या सिद्धांतानुसार वागत असतील आणि परमेश्वराला प्रिय असणारे गुण त्यांच्या मनात असेल आणि सर्वांशी त्याचा व्यवहार प्रेमळ असेल, तर तो मानव किंवा सेवक परमेश्वराला अधिक प्रिय असतो. हे बाबांनी आपल्याला प्रत्यक्ष सांगितले आहे. त्या मानवाने मोह,माया, अहंकाराचा त्याग केला. तर त्याच्यावर्ती येणारे संकटे खूप कमी येतात. परंतु काही कारणास्तव जरी त्यांच्यावर संकटे किंवा दुःख आले तरी त्यांच्या संकट समयी आपले मन डगमगू न देता त्या परमेश्वराचे नामस्मरण करून समोरचे कार्य चालू ठेवायला पाहिजे. 

◼️ सरतेशेवटी परमेश्वर हा प्रत्येक मानवाचे कठीण समयी परीक्षा घेत असतो. कुठलेही कार्य करीत असताना सुद्धा आपले ध्यान एका भगवंताकडे असायला पाहिजे.
    
◼️ आज पाहतो की, या मार्गातील सेवक दिवसेंदिवस स्वार्थी बनत चालला आहे. त्या सेवकांचे दुःख परमेश्वर कसे दूर करील त्या करिता तो मानव चांगल्या वर्तनामुळे,कर्मामुळे, चांगल्या गुणामुळे परमेश्वराला आपल्या जवळ करू शकतो.

◼️ परमेश्वरविषयी आस्था आपुलकी गोडी असेल तर त्या मानवाचे जीवन परमेश्वर सुखी बनवितो. आणि शेवटी त्यांच्या जीवनाचा उद्धार करून त्यांची आत्मा परमेश्वरात विलीन करतो.

◼️ माझ्या लिहिण्यात काही चूकी झाली असेल तर त्याबद्दल मी प्रथम 'भगवान बाबा हनुमानजीला', 'महानत्यागी बाबा जुमदेवजीला', 'मातोश्री वाराणसी आईला' व सर्व सेवकदादा व ताईला माफी मागतो व सर्व मला माफ करतील अशी मी सर्वाकडुन आशा बाळगतो.

आपला सेवकदादा :- प्रशांत मानापुरे मु. मोहाडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ७ 】

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजी हे एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी विदेह अवस्थेत असतांना शेवटी एका परमेश्ववराणे बाबांना दर्शन दिले आणि त्यांना बेईमान म्हटले त्यानंतर बाबांनी परमेश्ववराला इमानदारी आणि निष्काम भावनेने  मानवाला परमेश्वराप्रात्ति जागविण्याचे कार्य करीन असे वचन देऊन 

परमात्मा एक, मरे या जिये भगवंत नाम पर 

◼️ हे वचन दिले,भगवंत बाबांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी बाबांना पुढील दोन वचने दिलीत, 

दुःखदारी दूर करते हुये उद्धार  आणि  
इच्छानुसार भोजन 

◼️ ही वचने या मार्गाचे सिद्धांत ठरून बाबांनी भगवत प्राप्तीकरिता,निष्काम कर्मयोग साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही चार तत्वे दिली आहेत.

◼️ तर आज आजचा चर्चा बैठकाचा विषय "दुःखदारी दूर करते हुये उद्धार" हा विषय आहे त्यावर मी थोडक्यात सांगु इच्छितो.

◼️ दुःखदारी दूर करते हुये उद्धार महानत्यागी बाबा जुमदेवजीनी  सांगितले आहे की,मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह,माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वाशी सत्य व्यवहार केले,तो मर्यादेने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. 

◼️ प्राकृतिक वातावरनामुळे त्याला दुःख येते तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अड़ी-अडचणी येतात.अशा वेळेस तो अनेक उपचार करतो.त्यावेळेस परमेश्वराला सामोर ठेऊन उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजरित्या नष्ट होतात,या कामात परमेश्वर त्याला साथ देतो.

◼️ सरतेसेवटी मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते.अशाप्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याच्या जीवनाचा उद्धार करते.

◼️ मी आपल्या शब्दाला विराम देते.

आपला सेवक :- मनीष पचघरे 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ८ 】

"दुःखदारी दूर करते होए उद्धार"
या तत्वाचा अर्थ म्हणजे काय..?

◼️ वरील विषय खूप सुंदर आहे आणि या विषयावर मी आपले थोडक्यात विचार देण्याचा प्रयत्न करतो.

◼️ ज्या वेळी सेवक हा मार्गामध्ये येतो त्या वेळी त्याला खूप असे दुःख असतात आणि मार्गात आल्यावर त्या दुःखाचे क्षणातच निवारण होत असते याचे कारण म्हणजे मानवधर्मातील जागृत शक्ती होय.

"दुखदारी दूर करते हुये उद्धार"  म्हणजेच..
◼️ सेवक हा मार्गात येण्याआधी कितीतरी दुख:णे पीडित असतो तो मार्गात आल्यावर त्याला त्याच्या दुःखाचे निरासरण अवघ्या काही दिवसातच होत असते कारण आपण एकाच परमेश्वराला मानतो आणि सेवक हा एका परमेश्वराच्या चरणी मरून जातो आणि याचेच फलसफल्य म्हणून आपल्याला परमेश्वर/भगवन्त जागृत शक्तीचा आधारे आपल्यावरील दुःख दूर करीत असतो आणि त्या वेळी आपल्या दुःखाचे निवारं होऊन आपल्या कुटुंबाचा उद्धार होत असतो हेच आहे दुःख दारी दूर करते हुये उद्धार..

◼️ माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा करावे.

सेवक :- रुपेश मेश्राम श्रीनगर गोंदिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
【 विचार क्रमांक ९ 】

◼️ आजचा विशय "दु:खदारी दुर करते हुए उद्धार" यावर मी आपल्या परीने आपले विचार देत आहे.

◼️ आपन सर्वांना माहिती आहे की, बाबांनी परमेश्वराला वचन दिले होते की मी निस्काम कार्य करेन म्हणुन त्यावेळी परमेश्वराने बाबाना 2 तत्व दीले होते. 

1)दु:खदारी दूर करते हुए उद्धार.
2)ईच्छा अनुसार भोजन.

◼️ आज आपन पाहत आहो की आजचा सेवक कोणत्या मार्गाला चाल्लेला आहे. आज सेवकात फक्त मोह, माया, अहंकार दिसतोय. आनी पर्मेश्वरला सत्य, मर्यादा, प्रेमाची आवड़ आहे.

◼️ जर सेवक सत्य, मर्यादा, प्रेमाने चालत असेल तर त्याला जिवनात कोनतीही कमी पडनार नाही. कारण त्याला देनारा परमेश्वर आहे आणि जो सेवक पर्मेश्वरचा होऊन राहिल, त्याचा परमेश्वर असतो.  

◼️ सेवकांनो सत्य, मर्यादा, प्रेमाचे पालन आचरण करा परमेश्वर नक्किच धाऊन येईल आणि तुमच्यावर असलेले दु:ख दूर करेल आनी तुमच्या जिवनाचे उद्धार हाईल. आणि यातच तुमच्या कडुन "दु:खदारी दूर करते हुए उद्धार" हा तत्व पूर्ण हाईल.

◼️ माझ्या लिहिन्यात काही चुका झाल्या असेल तर मी बाबाला तसेच सर्व सेवक दादा आनी ताईन्ना माफ़ी मागतो मला माफ़ करावं. 

आपला सेवक :- श्रीराम कुंभारे सिहोरा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १० 】

◼️ भगवतप्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी  चार तत्व दिले आहेत  

1 परमात्मा एक 
2 मरे या जे भगवत नाम पर  
3 दुःख दारी दूर करते हुये उध्दार 
4 इच्छा अनुसार भोजन  

◼️ आजचा विषय आहे *"दुःख दरी दूर करते हुये उध्दार"* आपण जेव्हा अनेकमध्ये असतो तेव्हा आपल्या वर खूप दुःख असतात. कोणाला वेसण असतो, कुणाला वैद वाणीचा त्रास असतो तर कुणाची प्रकुर्ती बरी नसते.

◼️ आपण या सर्व दुःखा मुळे त्रास ले असतो मनुन आपल्याला आपले दुःख कसे दूर होऊ शकते आणि आपला जीवन कसा सुखमय होऊ शकतो हा विचार मनात घेऊन आपण या मार्गात प्रवेश करतो. आपल्या मार्गात भगवंत आपल्या ला कधी च निराश होऊ देत नाही  3 दिवसाच्या कार्य मध्ये सेवकाला आराम मिळत असतो. आणि जे दुःख आपल्या वर असतात ते दुःख दु करून भगवंत त्या दुःखाचा उध्दार करून आपल्या जीवनाचा उध्दार करतो. 

◼️ जो सेवक बाबांनी दिलेले तत्व शब्द नियमाने वागत असतो,  त्याला च बाबा शिक्षा देत असतात. पण शिक्षा या करीता देतात की सेवका कडून चूक झाली होती ती दुन्यादा होऊ नये मानून आणि जेव्हा आपल्या वर दुःख येतो तेव्हा भगवंत नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो फक्त आपला विश्वास आपल्या परमेश्ववरा असायला पाहिजे कारण कर्ता करविता तोच आहे  भगवंत आपली परिक्षा या साठी पण घेत असतो कि माझ्या सेवकाला माझ्या वर किती विश्वास आहे मनुन आपल्या वर किती पण दुःख येतील तरी पण अस मनात ठेऊन कि माझ्या सोबत भगवान बाबा हनुमान जी महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत तेव्हाच आपल्या जीवनाचा उध्दार होतो याला म्हणतात "दुःख दारी दूर करते हुये उध्दार."

◼️ भगवान बाबा हनुमानजीला माझा नमस्कार महानत्यागी बाबा जुमदेवजीला माझा नमस्कार  माझी आई वाराणसी आईला माझा नमस्कार  सेवक दादा आणि ताईंना माझा नमस्कार.

◼️ माझ्या कडून झालेली चुक भुल माफ कराव.

आपली सेवकीन :- रीना शेंद्रे सकरला

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
【 विचार क्रमांक ११ 】

◼️ आजचा विषय "दुखदारी दुर  करते हुए उद्धार" मी माझ्या मते थोडक्यात मत मांडत आहे. 

◼️ आपन जेंव्हा अनेकमधे होतो तेव्हा खुप दुःखी होतो कुणी वैदामुळे, कुणी बिमारी मुळे तर कुणी व्यसना मुळे त्रासुन गेले होते. काय कराव काय नाही हे कळत नव्हत.तेव्हा कुनी मरन पालवे तेव्हा आपल्याला मानव धर्म विषयी मार्गदर्शन मिळतो,  आणि आपन सम्पुर्ण विचार करून या मार्गात येतो. तेव्हा भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेन व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आशिर्वादाने बाबांनी दिलेल चार तत्व, तिन शब्द, पाच नियम ,सत्य मर्यादा पे्म पालन करुन ३, ७ ,११,२१,दिवसाचे कार्यात आपल्याला सुख समाधान मिळत. 

◼️ ४२ दिवसाचे कार्य करुन आपन त्यागी बनतो व जिवनाच्या सेवट पर्यंत बाबाला आवड़नारे कार्य करित राहिला तर प्रतेकक्षणि  परमेस्वर आपल्याला साथ देत असते.आपल्यावर आलेल दुःख नष्ट करित असते व या कलयुगामध्ये आपन जिवन सुखमय जगत आहोत. 

◼️ मानव धर्माच्या सेवकाला भगवान बाबा हनुमानजी चौरृयाशी योनी फिरु न देता त्याचे संपुर्ण दुःख दुर करुन त्याला आपल्या जवळ स्थान देउन त्याच्या जिवनाचा उध्दार करतात.

◼️ माझ विचार देण्यात किंवा लिहण्यात चुके भुल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी ला व महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मांगते तसेच सेवक दादा व सेवकीन ताईना माफी मांगते

आपला सेवक :- उमेश बुद्धे वाहनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १२ 】

◼️ आजचा विषय " दु :खदारी  दूर करते हुये उद्धार".

◼️ सेवक मार्गात येण्याच्या अगोदर  खूप दुःखी आणि कष्टी होता . 33 कोटी देवी देवतांचे पूजन करत होता, तरीही त्याला समाधान व सुख प्राप्त होत नव्हते, तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या , त्यामुळे त्याने मार्गाचा स्विकार केला .

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की , मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह,माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वांशी सत्य व्यवहार केले ,  तो मर्यादेने वागला आणी प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. 

◼️ बाबांनी दिलेले तत्व , शब्द आणि नियम यांचे वेळोवेळी पालन केले तर परमेश्वर सुध्दा आपल्या कामाला साथ देतो मानवाला दु :खातून मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो .अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे दु :ख दूर करून  शेवटी त्त्याच्या जीवनाचा उद्धार करतो .

◼️ माझ्या लिहिण्यात काहि चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी .      

आपली सेवकीन :- रजनी भोंगाडे उसरिपार 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १३ 】

'' दुःख दरी दूर करते हुये उद्धार''.

◼️ जेव्हा आपण मार्गात येण्या अगोदर अनेक देवी देवतांची पूजा करतो. परंतु आपल्यावर संकटकाळी कुणीही देवी देवता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही. तेव्हा आपण आपली घर ग्रुहस्ती खालावत जाते व मनुष्य अनेक वाईट व्यंसन च्या आधीन जातो तेव्हा मानवाला काही कळतच नाही की,  काय करावें आणि काय नाही परंतु आपण जेव्हा मार्गाची धाव घेतो.

◼️ आपल्याला मार्गात तत्व शब्द नियम ची शिकवण दिली आहे.

◼️ दुःख मानवावर अनेक प्रकार असतात जर बाबांनी दिलेल्या तत्व,शब्द नियम यांनी वागलं तर दुःख आपले नाहीसे होतील आणि परमेश्वर त्यांचे पाठीशी उभे राहतील..

◼️ कृपया माझ्या लिहण्यात चुका झाल्या असतील तर सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजी ला माफ़ी मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजीना माफी मागतो आई वाराणसी ला माफी मागतो व सर्व सेवक दादा व सर्व सेवकिन ताईंना माफी मागतो.

आपला सेवक :- राजु ढबाले 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १४ 】

◼️ या विषयावर मी माझे विचार देण्याचं प्रयत्न करत आहे. 

◼️ भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरीता बाबांनी चार तत्व दिल आहे त्यातील 3 रा तत्व दुखदारी दूर करते हुये उद्धार हा तत्व भगवंताने बाबाला दिला आहे तर पाहा मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा कोणत्या न कोणत्या कारणाने दुःखी कष्टी होता, म्हणून या मार्गात आला आणि एका परमेश्वराचे कार्य करून सुखी आणि समाधानी जीवन जगून राहिला.

◼️ कारण अनेक मध्ये असतांना आपल्याला एका परमेश्वराची ओळख नव्हती सगडे देव आपण पूजत होतो त्या वेळी कोणी धाऊन आले नाही.पन या मार्गात बाबांनी अश्याच दुःखी लोकांना स्थान दिल आहे.

◼️ दुःख दूर झाले जीवन सुखमय झाले बाबांच्या ह्या कृपेमुळे पन  इथपर्यंत न थांबता परमेश्वराचे कार्य आपल्याला शेवट पर्यंत करायचे आहे.

◼️ कार्य करत असताना बाबांची शिकवण लक्षात असली पाहिजे आणि आपले ध्येय मजबूत असले पाहिजे कारण या मार्गातील सेवक हा ध्येयवादी म्हणून ओळखला जातो.

◼️ परमेश्वराला प्रिय असणारे कार्य करावे कारण जो आवडे सर्वाना तोच आवडे भगवंताला या प्रमाणे सरते शेवटी मानवाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा हा चौऱ्यांशी लक्ष न भटकता त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल. याप्रमाने आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायच आहे.

◼️ माझ्या विचार व्यक्त करण्यात किंवा लिहण्यात चुक झाली असेल तर सर्वांनी माफ करावं.

🙏।। युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रुप मध्ये उपस्थित सर्व सेवक दादा आणि सेविका ताईला नमस्कार।।🙏

आपला सेवक :- हितेश मेश्राम श्रीनगर गोंदिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १५ 】

◼️ आजच्या विषयवार आपले विचार देत आहे.

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती करून आपल्या सर्वाना 4 तत्व,  3 शब्द, व 5 नियम दिले आहे. 4 तत्वापैकी तिसरा तत्व आहे, "दुःखदारी दूर करते हुये उद्धार" या तत्वाचा अर्थ मी आपल्या विचारा प्रमाणे सादर करत आहे.

◼️ आपण अनेक मधी असतांनी खुप दुखी होतो व आपण अनेक उपचार केला पण काही आराम नाही. मग आपण या मार्गाकडे ओळलो आणि व आपले पूर्ण दुख दूर झाले आणि आपल उद्धार झाला.

◼️ माझ्या लिहण्यात चूक झाली असेल तर मला माफ कराल.

आपला सेवक :- रोशन चाचीरे सिहोरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १६ 】

◼️ विषय = दुःख दारी दुर करते हुये उद्धार,,,,,यावर मी माझ्या परीने विचार देण्याचे प्रयत्न करत आहे,,,,,,

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर दुःखी कष्टी लोकांना सुखी समाधानी बनवण्यासाठी तत्व, शब्द, नियम दिले,,त्यात चार तत्वांपैकी पहिला व दुसरा तत्व परमेश्वराला दिला म्हणजेच ध्येयाने एक परमेश्वर मानून चांगल्या विचाराने भगवंताच्या चरणी मरतो तेव्हा भगवंत आपल्याला दुःखातून मुक्त करतो,बाबांनी सेवकांना मार्गदर्शन केले आहे की "मेरा सेवक कभी दुःखी ओर गरीब नही रह शकता" अगर ओ दुःखी ओर गरीब रहता है तो ओ उसकी करमो की वजह से,,,, म्हणून मानवाने भगवंताला प्रिय असणारे कार्य करुन सत्य मर्यादा प्रेमाने आचरण करावे आपल्यातील वाईट विकारांचा नाश करुन सत्य व्यवहार करावे, यामुळे मानव सर्व दुःखातून मुक्त होते मानवाचा शरीर हा नश्वर आहे आत्मा अमर आहे म्हणून मानव मृत्यू पावल्यावर भगवंत त्याला मोक्ष प्रदान करतो आणि आपल्या जवळ स्थान देउन त्या आत्म्याचा उद्धार करतो त्यालाच म्हणतात, "दुःख दारी दुर करते हुये उद्धार".

◼️ माझ्या हातून लिहण्यात काही चुका झाल्या असतीलच तरी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, वाराणसी आईला माफी मागतो आणि सर्व सेवक व सेविकांना माफी मागतो.

आपला सेवक : तेजु आंबिलकर मोहंगाव (देवी)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक १७ 】

◼️ विषय = "दुःख दारी दुर करते हुये उद्धार"..…..….यावर मी माझ्या परिने विचार मांडत आहे.

◼️ महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की, ज्या  मानवाने परमेश्वरला आवडनारे कार्य केले,मोह माया अहंकारा पासुन दुर राहून, सर्वांशी सत्य व्यवहार केले, मर्यादाने वागले आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव नेहमी परमेश्वरला प्रिय असतो.

◼️ मानवाला सुख,दुःख व अडी अडचणी येत असतो जर त्या मानवाने परमेश्वरला समोर ठेऊन कार्य केले तर त्याचे दुःख दुर होते आणि त्याच्या अडचणी नष्ट होतात, परमेश्वर त्याला साथ देतो.

◼️ मानव हा कर्म भोगी असतो पण आत्मा ही अमर असते. तो जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याला परमेश्वर मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि मानवाला परमेश्वरा चरणी स्थान मिळते.अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दुर करतो व शेवटी त्याचा उद्धार करतो,, यालाच म्हणतात "दुःख दारी दुर करते हुये उद्धार"...
   
◼️ माझ्या हातून लिहन्यात काही चुका झाल्याच असतील, मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो,, महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो व मातोश्री वाराणसी आईला सुद्धा माफी मागतो आणि सर्व सेवक, सेविकांना माफी मागतो.

आपला सेवक = नितिन जांगडे मु. मोहगांव ( देवी )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻  युवा सेवकांचा ग्रूप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages