📚 【अनुभव क्रमांक ४】✍🏻 सेवकाचे नाव : तेजराम आंबिलकर मु. मोहगाव (देवी) 🙏🏻 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

📚 【अनुभव क्रमांक ४】✍🏻 सेवकाचे नाव : तेजराम आंबिलकर मु. मोहगाव (देवी) 🙏🏻

🔹परमात्मा एक युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप द्वारा प्रस्तुत अनुभव मालिका 🔹

【अनुभव क्रमांक ४】

!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
           
मी तेजराम हरी आंबिलकर मार्गात येण्याचा कारण आपल्यासमोर सादर करीत आहे.

👉 मार्गात येण्याअगोदर मी , माझे आई-बाबा, मोठे दादा आणि वहिनी असं पाच लोकांचा माझा कुटुंब होता. माझ्या बाबांना दारू चा व्यशण होता. माझे बाबा सावकार कडे कामाला होते पण पगार मिळाला की सर्व पैसा दारूच्या व्यशनात खर्च करायचे. माझी आई कसतरी मोल-मजुरी करून आपली ग्रुहस्ती चालवायची. माझ्या थोरल्या बंधुंना पण दारू आणि जुव्वा खेळायचा व्यशण होता.

▶ माझ्या घरची परीस्तिती खुप हालाकीची होती. कालांनतराने माझ्या आईची प्रक्रुती खालावली  पोटाचा त्रास वाढू लागला. तिला पोटाचा त्रास सहन होईना. अनेक वैद्यवान्या कडे गेलो , डॉक्टरी उपचार केले पण प्रक्रुती मध्ये सुधारणा होईना.

▶ अश्या हालाकीच्या परीस्तितीत माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोशळला. आई च्या पाठोपाठ वहिनीची पण प्रक्रुती खालावली. खुप डॉक्टरी उपचार केला पण वाहिनीच्या प्रक्रुतीत पण सुधारणा होईना.खुप पैसा खर्च झाला पण दोघांच्या पण प्रक्रुतीमध्ये काहीच सुधारणा नाही खर्चामुळे वैतागलो.

▶ मी माझ्या कुटुंबात सर्वात लहान असल्यामुळे मला तेवडं काही समजत नव्हता. मला शिकायची खुप आवड होती पण माझ्या घरची परीस्तिती नसल्यामुळे मला १० वी पर्यंतच शिक्षण घेता आलं. मला पुढचं शिक्षण घेता येत नसल्यामुळे मी खुप रडायचो.

▶ अशी आमची अत्यंत दैनीय परीस्तिती बघुन आमच्या गाव चे जेष्ठ सेवक मा. भीकुचंदजी जांगडे यांनी या मार्गाची जाणीव करून दिली आणि मार्गदर्शन केला. मार्गदर्शन ऐकल्यानंतर माझ्या कुटुंबाने मार्ग स्विकार करण्याचा निर्णय घेतला.

▶ दुसऱ्याच दिवशी भीकुचंदजी जांगडे  यांच्या सोबत कार्य घेण्याकरिता मा. यशवंतरावजी ढबाले गुरुजी  (जेष्ठ मार्गदर्शक तथा अध्यक्ष ब.ऊ.प.पु. परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी) यांच्या निवांस्तानी मोरगावला गेलो. गुरुजींना सर्व परीस्तिती सांगितली त्यावर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केला आणि  ३, ११, २१ याप्रमाणे कार्य दिले या कार्यात माझ्या कुटुंबाला समाधान मिळाला.

▶ आज माझा कुटुंब मार्गात येऊन १८-१९ वर्ष झालेत माझा कुटुंब सुख-समाधानाने व आनंदाने जिवन जगत आहोत.

▶ ज्या महामानवाने भगवान बाबा हनुमानजीला प्राप्त करून मानव धर्म मार्गाची प्रुथ्वी तलावावर निर्मिती केली आणि माझ्या कुटुंबासारख्या अनेक दुःखी कुटुंबाला निष्काम सेवा वाटुन त्यांना सुखाचा मार्ग दाखविला असे आपले सर्वांचे सद्गुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना माझा कोटी कोटी प्रणाम.

माझ्या लिहण्यात कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर  मी भगवान बाबा हनुमानजी व  महानत्यागी बाबा जुमदेवजीनां माफी मागतो तसेच सर्व सेवक दादा व ताईनां क्षमा मागतो.

🙏सर्वांना माझा प्रेमपुर्वक नमस्कार🙏

आपला सेवक : तेजराम हरी आंबिलकर
सेवक नं.         : २२१७
पत्ता                : मु. मोहगाव (देवी) ता. मोहाडी जि. भंडारा
मार्गदर्शक     : मा. यशवंतरावजी ढबाले गुरुजी  (जेष्ठ मार्गदर्शक  तथा अध्यक्ष ब.ऊ.प.पु. परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी)

◀️ सौजन्य ▶️
 ©️ ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप】


!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
!!सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले!!
!!अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले!!
!!मानवधर्म की जय!!
                     

                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages