📚 【अनुभव क्रमांक २】✍🏻 सेवकाचे नाव : अशोक कडव मु. वाहणी 🙏🏻 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

Breaking

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

📚 【अनुभव क्रमांक २】✍🏻 सेवकाचे नाव : अशोक कडव मु. वाहणी 🙏🏻

🔹परमात्मा एक युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप द्वारा प्रस्तुत अनुभव मालिका 🔹

【अनुभव क्रमांक २】

!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

👉 मी अशोक विठोबा कडव आज ग्रुप वर मार्गात येण्याचे कारण आपल्या समोर सादर करीत आहे.

▶माझ्या परिवारात मला दोन आई वडील दोन बहनी व मी असा माझा परिवार होता माझ्या दोन्ही ताईचे लग्न झाले होते त्यामुळे मी व माझ्या दोन्ही आई व वडील असे चार लोक राहत होता माझ्या वडिलांना दारूचे वेशन होते त्यांच दारू मुळे  सर्व परिवार त्रासुन गेले होते घरात खायला अन्न सुधा मिळत नव्हते अशी परिस्थिती अशुन मी सुधा दारूच्या आहारी गेलो व खुप दारू पेऊ लागलो. काही दिवसा नंतर माझी प्रक्रुती  बिघडली अनेक उपचार करून मला आराम मिळत नव्हता नंतर मला तुमसर च्या सरकारी दवाखान्यात नेऊन एकशरा काढन्यात आला व मला टीबी झाली असे सांगितला व औषध दिले हे टीबी झाली हे ऐकुण खूप दुःख झाले मी आता जास्त दिवस जगणार नाही अस मला वाटू लागल.  दिवसेनदिवस प्रक्रुती खालावत होती काही दिवसानंतर माझ्या तोंडातून रक्ताचे ठसे पडत होते ते रक्त पाहून मी घाबरलो व मला मार्गाची आठवण झाली पण माझे वडील या मार्गाच्या विरोधात होते मी वडिलांना विनंती केली की मी आता मरणार आहे म्हणून माझ्या साठी तरी  मार्गात जायला तयार व्हा माझ्या बहनी व आई वडिलांना विनंती करु लागले व वडील कसे तरी तयार झाले.

▶माझ्याच गावातील सेवक श्री लीम्बाजी ढबाले मु.वाहनी यांच इथं आम्ही गेलो व त्याना आम्ही सर्व दुःख सांगितले त्या वेळेस मला साधा खोकला जरी आला तर माझ्या तोंडातून रक्त पडत होता त्यांनी आम्हाला फोटोच्या समोर बसविले कापूर अगरबत्ती लाउन आपले दुःख भगवंता समोर मांडायला सांगितले.मी तसच केला व ती तीर्थ व रक्षा तोंडात घेतली आणि  बाजूला झालो थोड्याच वेळात खूप जोरात खोकला आला पण माझ्या तोंडातून जे रक्त पडत होते ते रक्त पढ़ने बंद झाले. माझा  या मार्गावरचा  विश्वास वाढला व दुसऱ्या दिवशी मांडवी ला गेलो श्रीकिशन ढबाले यांनी मला  11 दिवसाचे कार्य दिले व या 11दिवसाच्या कार्यातच माझी प्रक्रुती  सीरीयश झाली व मला भंडारा इथं सरकारी दवाखान्यात भर्ती केले ही गोष्ट सन 2000 मधली घडली आहे व माझे वय 23 वर्ष होते पण मला भंडारात सुधा आराम मिळत नव्हता  इकडे मी भर्ती अशतांनी  वडिलांनी कार्य करन बंद केले एक आई माझ्या जवळ होती व दूसरी मोठी आई घरी होती माझी मोठी आई दररोज ज्योत लाऊन माझ्या करीता योग मांगत होती व तिला मूल-बाळ नव्हते मीच तिला सर्वशव होतो माझे  वडील मोठी आईला खूप त्रास देत होते काही दिवसांनी मोठी आईची तब्येत बिघडली व तिला सुध्दा भंडाराच्या दवाखान्यात घराजवळील  श्री गलीरमजी बांडेबुचे यांनी आईला भर्ती केला  आई एका वार्डात आणि मुलगा दुसऱ्या वार्डत पण आम्ही दोघेही अभाग्या एकमेकाणा पाहू शकत नव्हतो व आमची दोघांची काळजी लहान आई घेत होती व माझ्यात चालायची शक्ति सुधा राहली नव्हती कारण तेव्हा माझे वजन घटुन 15 किलो झाले होते व मोठ्या आईला डॉक्टराणी अल्सर सांगून फोड़ा फुटला असून जास्त दिवस जगणार नाही असे सांगितले काही दिवसांनी आईला सुट्टी झाली आईला घरी नेले व मी तिथेच राहलो आईला गावी सोडून लहान आई परत माझ्याजवळ आली व माझे वडील घरी आईला त्रास देने सुरुच होते व माझी आई माझ्या वडिलांना नेहमी मनायची की मी तर मरणार पण तुम्हालाही सोबत नेणार व माझे उरलेले आयुष्य नक्की दया अशी भगवंता जवळ नेहमी योग मागायची व माझा  मुलगा घरी कधी येईल याच चिंतेत रडत बसायची व मी दोन महीने 17 दिवस राहलो व त्या वर्डातिल माझ्या सोबत असलेले  9 रोगी मरण पावले व त्या वेळेस मी आईला म्हणत होतो की आता लवकरच माझा 10 वा नम्बर लागेल आता तू माझे हात सोळ व त्या दिवशी सकाळी माझी प्रक्रुती  जास्त झाली व डॉक्टराणी निर्णय घेतला की याला नागपूरला हलवा हा जगू शकत नाही तेव्हा मी भगवंताला विनंती केली की भगवंता मला नागपूर ला नका  पाटऊ मला घरी पाटवा रात्री झोपी गेले व त्याच रात्री आईला व मला जाग्रुती पडली की तू घरी जा आणि घरची साफ सफाई करुन कार्य कर तुझ्या घरी कार्य बंद आहेत सकाळी मला सांगु लागली की असे बाबांनी सांगितले तेव्हा मी आईला सांगु लागलो की हीच  जाग्रुती मला पण आली नंतर 10 वाजेला डॉक्टर फेरी वर आले व मी डॉक्टरला विनंती केली की मला नागपुरला रेफर करू नका कारण नागपूरला जाऊन मरण्यापेशा मी आपल्या घरी जाऊन आपल्या आईच्या मांडीवर डोका ठेऊन मरणार व  त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन मला घरी पाटवला व आईनी माझ्या करीता रिक्षा आणला व मला बसस्टॉप वर घेउन आले माझ्या ताई कडे    (तुमसर ) खैरलांजी इथ घेऊण आले व माझ्या ताईनी व भाऊजीनी खूप सेवा केली व माझ्या साठी खूप काही केले व ते आता या मार्गाचे सेवक सुधा आहेत. 

▶दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या घरी आलो आईची प्रक्रुती पण तशीच होती आईला पाहून माझे ही मन भरून आले मग आम्ही नवीन कार्य घेतले त्या कार्यात मला विनंती च्या जागेवर कशीबशी आई बसवायची कारण माझ्यात चालायची शक्ती राहाली नव्हती. माझी मोठी आई खाटेवरूनच भगवंताला हात जोडायची व नेहमी भगवंताला सांगायची की माझे आयुष्य मुलाला दया अशी प्रत्येक वेडेस शब्द बोलायची व त्या कार्यातच एके दिवशी आई ची तबियत बिघडली व ती मला हाक मारत होती पण मी अभागा तिच्या जवळ जाऊ शकत नव्हतो कारण मी  सुद्धा सीरीयसच  होतो व दुसऱ्या दिवशी आमची विनंती झाली काही वेळातच माझ्या आई ची प्राणज्योत बंद झाली आई मला सोडून भगवंतात  विलीन झाली मी अभागा आईच्या अर्थी देऊ शकलो नाही फक्त खाटेवर बसून डोळ्यांतून अश्रू काढत होतो. आईचे अंतिम संस्कार पार  पडले पण माझ्या प्रक्रुती ला आराम मिळत नव्हता. एवडी वाईट परीस्तिती असुनही माझे कुटुंब व नातेवाईक माझ्या घरी येत नव्हते.कारण मला टीबी झाली होती मानुन सांगाड्यानी पाठ फिरवली होती.पण माझे सेवक बांधव माझ्या सोबत होते आणि माझी काळजी सुध्दा घेत होते. या मार्गाच्या सेवकीन  ताई सुलताबाई बुध्ये , पुस्तकाला बाई मांडरे आणि गोपिका बाई साहारे अश्या अनेक सेवकीनी माझ्या आवडी-निवडी चे पदार्थ आनुन दयायचे व आईच्या तेरावीच्या दिवशीच माझी प्रक्रुती खुप खराब झाली. मी बेशुध्द झालो डॉ. ला बोलावण्यात आला डॉ. नी उपचार करून हात वर करून दिले व काही वेळात मी शुध्हीवर आलो आणि तेरावी चा कार्यक्रम पार पडला. 

▶संपुर्ण परिसरात ही बातमी हवेसारखी पसरली की मार्गात राहून सुध्दा याची प्रक्रुतीत सुधार का होत नाही आहे. गुलाबजी नंदरधणे मु. परसवाडा हे  मला भेटण्याकरिता माझ्या गावी आले व माझ्या घरी निरोप पाठवला की अशोक ला घेऊंन तुम्ही लिम्बाजी ढबाले यांच्या ईथ या. मला सायकिल वर नेण्यात आलं त्यांनी माझ्या परीस्तिती बद्दल संपुर्ण विचारणा केली व मला एकवीस दिवसाचे कार्य दिले व सांगितलं की तु स्वःता पाणी आणायच, जागा साफ करून  ज्योत लावायची कारण मी चालू शकत नव्हतो संडासला सुध्दा जाऊ शकत नव्हतो तेव्हा त्यांना मी  सांगितलं की सर्व करणार पण पाणी आननार नाही. तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं की तु कसंही जा रांगत जा अथवा बसत जा पण पाणी तु स्वःता आन आणि ज्योत लाव. तु एकवीसव्या दिवशी बाहेर फिरायला नक्कीच निघसील मी आईच आधार घेऊन घराजवळच्या बोअरवेलच पाणी कसतरी आनत होतो व कार्य करत होतो. एकवीसवा दिवस उजाडला तो दिवस पोळ्याचा दिवस होता या दिवशी कधी न चालणारा कधी न स्वःता होऊन उठुन बसणारा मी नाल्या पर्य़ंत चालत संडासला गेलो. मला बघुन सर्व आचर्यचकीत झाले व माझे वडील मला बघण्याकरिता नाल्या पर्य़ंत आले व मी नाल्यावर बसलो होतो तेव्हा वडिलाला सांगितलं की तुम्ही घरी जा व मी त्या  दिवसपासुन चालायला व फिरायला सुरुवात केली. मी जर एखादयाच्या दुकानात बसलो की लोक मला टीबी झाली आहे असं मनुन माझ्याजवळुन उठुन जायचे. तेव्हा माहागुजी मांडरे यांचे नातु दुर्गेश मांडरे हे माझा हात धरून आपल्याघरी घेऊन जायचे.त्याचा आजोबानी मला वाचण्याकरिता मानव धर्माची पुस्तक दिले व या पुस्तकीतून मानव धर्माचा अभ्यास करून मार्गाचा गुण घ्या असे सांगितले. मी इकडे तिकडे न बसता सरड  मी त्यांचा घरी जाऊन बसत होतो. त्याचा घरातील प्रत्येक सदस्यांनी माझी सेवा केली.

▶मला काही दिवसात गोंदिया येथली डॉक्टरकडे नेण्यात आले.  त्या डॉक्टरांनी मला दोन वर्ष औषध खायला सांगितले.  पण मी सहा महिने औषध घेतली आणि भगवंताला शब्द दिला की भगवन्ता मी ही टीबी ची औषध खाणार नाही मला कार्यात यश दया व मी औषध घेणे बंद केले माझी प्रकृती हळू - हळू सुदृढ होवु लागली व मी बरा होत चाललो होतो तेव्हा आणखी काळानी दगा दिला माझे वडील सुध्दा एका परमेश्वरात विलीन झाले व वडिलांचा अंतिम संस्कार करण्याकरिता सरणाचा बंडी वर बसवून नदीवर नेण्यात आला व वडीलाचा अंतिम संस्कार पार पाडला व पुन्हा कार्याला सुरुवात केली.मला पुन्हा दवाखान्यात नेण्यात आला.  माझा एक्सरा काढला त्या एक्सऱ्यात टीबी निघाली नाही पुन्हा दुसऱ्या वर्षी एक्सरा काढला तिथ पण टीबी निघाली नाही पुन्हा 2003 मध्ये एक्सरा तिथ पण टीबी निघाली नाही व मी एकदम ताजा तवाना झालो असे मला वाटू लागले.

▶2005 मध्ये माझे लग्न करायची चिंता लागली व माझा लग्न झंझाड हरदोली या गावी जुडला.  पण मायत्यानी मुलाला टीबी झाली हे मुलीचा कुटुंबीया पासून लपवला पण मी मायत्याला सांगितल की तुम्ही हि गोष्ट का बर लपवली. तर मायत्यांनी माझा गोष्टी कडे लक्ष न देता माझा गोष्टी कडे दुर्लक्षित केला.. अस जर सांगितला तर तुझे लग्न तुटून जाईल.  पण मी स्वतः जाऊन सासरचा लोकांना सांगितल की मला टीबी झाली होती. आणि हि गोष्ट तुमचा पासून मायत्याने लपवली..  तर तुमचा काय विचार आहे ते सांगा.  तेव्हा माझा पत्नीनेच मला टीबी सोबत काही देणं घेणं नाही तुम्ही मार्गात आहात मी लग्नाला तयार आहे. आणि आमचा लग्न व्यवस्थित रित्या पार पडून आम्ही आपल्या वैवाहिक जीवनात पती  पत्नी व चार आपत्य त्यात तीन मुली व एक मुलगा आहे आणि आमचा जिवन आनंदात आहे. आम्ही आता भगवंताच्या कृपेने सुखी समाधानी आहो. मी जसा सुखी झालो तसाच मानव धर्मात दुःखी लोक कसे जागतिल याचा प्रसार-प्रचार करत आहे आणि मी मानव धर्मातील लोकांना जागवण्याचे कार्य करत आहे.आज मी बाबाचा कृपेने मार्गदर्शक सुध्दा आहे ....

▶ माझ्या लिखाणात काही चुक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना माफी मागतो तसेच सेवक दादा व ताई मला माफ करतील अशी आश्या बाळगतो.🙏🙏🙏


नाव       : अशोक विठोबा कडव
मुकाम    :  वाहनी
सेवक नं  : 13019
कार्यकर्ता : स्वर्ग प्रभुदासजी पडारे
कार्यकर्ता : कांटीरामजी पडारे
मुक्काम   : सिहोरा


          सौजन्य
 ©️ युवा सेवकांचा ग्रूप

!!भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय!!
!!परमात्मा एक!!
!!सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले!!
!!अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले!!
!!मानवधर्म की जय!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages