📚 【 अनुभव क्रमांक ६ 】✍🏻 सेवकाचे नाव : हितेश मेश्राम मु. गोंदिया 🙏🏼 - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

📚 【 अनुभव क्रमांक ६ 】✍🏻 सेवकाचे नाव : हितेश मेश्राम मु. गोंदिया 🙏🏼

🔹परमात्मा एक युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप द्वारा प्रस्तुत अनुभव मालिका 🔹

【 अनुभव क्रमांक ६ 】

!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!

मी हितेश अनिल मेश्राम मार्गात येण्याचा कारण आपल्यासमोर सादर करीत आहे.


👉 आम्ही मार्गात येण्याअगोदर माझे आई बाबा आणि आम्ही तीन भावंड असा आमचा कुटुंब होता. माझ्या वडिलांना दारू पिण्याचा खुप मोठा व्यशण होता. ते दारू शिवाय राहुच शकत नव्हते. 

➡ माझे वडील पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत व आम्ही त्यावेळेस भंडारा येथे पोलीस वसाहत मध्ये राहायचो. त्याच वेळेस माझे वडील नौकरी वरून तात्पुरते निलम्बित झाले होते आणि या आधी पण दोन ते तीन वेळा निलम्बित झाले होते. शेवटी कायमचे निलम्बित होण्याची वेळ माझ्या वडिलांवर आली. आता तर नौकरी गमवायची वेळ आली होती. 

➡ आम्ही तिघेही भाऊ शिक्षणाचे होतो, शिक्षणाला लागणारा पैसा आणि दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवायच्या कश्या हा प्रश्ण माझ्या आईला पडला. माझ्या कुटुंबाला विचार आला जर नौकरी गेली तर करायचं काय ? कारण आमच्याकडे आमची घर ग्रुहस्ती चालविण्याकरिता नौकरी शिवाय दुसरं साधन नव्हता. सर्व जबाबदारी आईच्या खांद्यावर वर आली कारण माझी आईच आमच्या कुटुंबाची आधारस्तम्ब होती.

➡ आमच्या ओळखीच्या एक काकु होत्या त्यांनी माझ्या आईला या मार्गाविषयी माहिती सांगितली. त्या काकुसोबत आई मार्गदर्शक काकाजी कडे गेली. मार्गदर्शक काकाजीनी मार्गांची रूपरेषा समजावुन सांगितली. पण माझ्या वडिलांनी हा मार्ग स्वीकारण्यास नकार दिला. पण माझी आई आपल्या निर्णयावर ठाम होती. माझी आई आणि आम्ही तिन्ही भावंड मिळुन विनंती व पार्थना करायला सुरुवात केली. याच काळात एकदा अशी परीस्तिती झाली की वडिलांना नोटीस आला आणि आता वडील कायमचे निलम्बित होणारच अश्यावेळी आई एस.पी. ऑफीसला जाऊन तिथल्या वरच्या अधिकाऱ्याला आईने विनवणी केली आणि नौकरी वाचवली हे सर्व भगवंताचीच क्रुपा होती. हा सर्व प्रकार घडल्यानंतर माझे वडील हा मार्ग स्वीकारण्यास तयार झाले. अश्याप्रकारे आम्ही मार्ग स्वीकारला. 

▶ आज आम्हाला मार्गात येऊन १८ वर्ष झालेत आणि आम्ही सुख-समाधानाने व आनंदाने जिवन जगत आहोत. भगवंताच्या क्रुपेने आज माझा मोठा भाऊ मेकनिकल इंजिनियर आहे, मजला भाऊ शिक्षक आहे आणि माझ २०१६ ला इलेक्ट्रीकल मध्ये इंजिनीरिंग झाला.

▶ ज्या महामानवाने भगवान बाबा हनुमानजीला प्राप्त करून मानव धर्म मार्गाची प्रुथ्वी तलावावर निर्मिती केली आणि माझ्या कुटुंबासारख्या अनेक दुःखी कुटुंबाला निष्काम सेवा वाटुन त्यांना सुखाचा मार्ग दाखविला असे आपले सर्वांचे सदगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना माझा कोटी कोटी प्रणाम. 

माझ्या लिहण्यात कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर मी भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजीनां माफी मागतो तसेच सर्व सेवक दादा व ताईनां क्षमा मागतो.


सर्वांना माझा प्रेमपुर्वक नमस्कार

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपला सेवक - हितेश अनिल मेश्राम 

पत्ता -  मुर्री चौकी (गोंदिया) ता.+ जि.- गोंदिया

मार्गदर्शक - कैलाशजी शेंद्रे गोंदिया
सेवक नंबर - 14254

सौजन्य :

 ©️ ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप 】

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages