⏩ बाबानी आपल्याला "मर्यादा पाळणे" शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ❓ ⏪ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

⏩ बाबानी आपल्याला "मर्यादा पाळणे" शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ❓ ⏪

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

दिनांक :०५ ऑक्टोबर २०१८ शुक्रवार

 चर्चा बैठकीचे विषय 】

⏩ बाबानी आपल्याला "मर्यादा पाळणे" शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे  ❓ ⏪

【 विचार क्रमांक १ 】

◾आजचा चर्चा बैठकचा विषयावर विचार देण्याचा प्रयत्न करत आहे.

◾महान त्यागी बाबा जुमदेवजीनी सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की,त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे.स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोले पाहिजे.प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे.लहानांनी मोठ्यांशी वागताना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागावे.इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित-अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे.तो भेदभाव आहे. सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत. बाबांनी सर्व पूजा बंद केली आहे. आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे  ही खरी मर्यादा आहे. ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्यामुळे घरात आपआपसांत प्रेम निर्माण होते. त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. त्यामुळे सत्य व्यवहार होतात.

◾माझ्या लिहण्यात काही चुकभुल झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो. आणि वाराणसी आईला माफी मागतो. आणि सेवक दादा व सेविका ताई ला माफी मागतो.

सेवक : कृणाल शेंडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】
       

♦ बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत.
♦आपल्या कुटुंबात व सेवकात मर्यादा पाळणे
♦ह्या मानव धर्मात जो नमला आहे तोच जमला आहे. पण जो जमला आहे तो नेमके नमतो काय ? असा प्रश्न येत असतो खूप सेवकांच्या मनात, तो फक्त बाबांनी दिलेले बाराखड्या नमतो. व म्हणूनच तो सेवक कधी दुःखास पात्र ठरत नाही व त्याचाच जयजयकार होतो.
♦सर्व सेवकांन मध्ये एकताच राहली नाही. त्याचा सर्वात मोठा कारण म्हणजे मर्यादा. सर्व सेवक मर्यादा विसरत चालले आहेत, कोणी म्हणतात हा मंडळ तसा आहे, कोणी म्हणतात हा मंडळ तसा, कोणी म्हणतात हा मंडळ तसा करतो, कोणी म्हणतात तो मंडळ तसा करतो. अरे सेवकांनो हा कशाला वीसरता तुम्ही की, मंडळ कोणताच असो पण कार्य तर भगवंताचे असतात न. सेवकान मध्ये ऐकताच नाही तर मग दुसऱ्यांना काय सांगू आपण की हा मार्ग किती सुंदर आणि सरल आहे. कृपया करून एकता भंग नको करा सेवकांनो. जैसी रीत प्रेम से वैसी प्रीत हराम से होय, जो चला जाये वैकुंठ पला ना पकडे कोई सर्वांना प्रेम वाटा, प्रमाशीच बोला.
♦मानवी जीवन जगत असतांना कळत-नकळत मर्यादा भंग होतेच. पण का बरं होतो ? कारण आहे याचा की चूका करणे, दिवस भऱ्यात वाईट कर्म होणे, बाराखड्यात चुकने, सत्य व प्रेमाचे आचरण नसणे आणि हा सर्व होऊन त्याची माफि न मागणे. सेवकांनो आपला पूर्ण जीवन जगा पण असे जगा की कधीच कोणाचं मन नाही दुखायला पाहिजे.
♦फक्त कुटुंबात व सेवकातच नाही तर कोणाशी पण मर्यादित बोलण्याचा व मर्यादा पाळण्याचा प्रयत्न केल पाहिजे व मी पण प्रयत्नच करिन.
♦हीच आहे मर्यादा.
♦व सेवकांनो शिष्त पाळा, सवय नको.

सेवक : कौशिक कनोजे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】

⏩महानत्यागी बाबा जुमदेवजीने आपले देह (शरीर)  चंदनासारखे झिजवून एका भगवंताची प्राप्ती करून दुःखी कष्टी मानवाला दुःखातून मुक्त करून सेवकांना सुखी व समृद्ध बनविले.
⏩महानत्यागी बाबा जुमदेवजीने अनेक मार्गदर्शनात म्हटले आहे की, प्रत्येकाने आपल्या परिवारात मर्यादेचे पालन करायला पाहिजे लहाण्यांनी मोठ्याशी किंवा मोठ्याने लहाण्याशी वागताना मर्यादेने वागायला पाहिजे प्रत्येक मार्गातील सेवकाने सेवकांशी वागताना मर्यादेशील असणे आवश्यक आहे.
⏩मर्यादा म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा केलेला मानसन्मान आणि बिकट परिस्थितीत त्या व्यक्तीला केलेले सहकार्य. हे आपले कर्तव्य दक्षता तसेच मर्यादा आहे. बाबांनी आपल्याला दोनच जाती सांगितल्या आहेत. ते म्हणजे नर आणि नारी या व्यतिरिक्त दुसऱ्या जाती मात्र मानवाने आपल्या स्वार्था करीता बनविल्या आहेत अन्य कोठल्याही जातीला वाव (थारा) नाही. ही आपण पाळणे म्हणजे मर्यादा होय.
⏩ समोरील व्यक्ती गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित
लहान, मोठा असला तरी आपण सर्वाशी प्रामाणिकपणे वागायला पाहिजे. बाबांनी सर्व पूजा बंद करून केवळ एका भगवंताची पूजा करायला सांगितली आहे. ती आपण पाळली पाहिजे. ही या मार्गाची सर्वात मोठी मर्यादा आहे अशा प्रकारे प्रत्येक सेवकांनी आपल्या कुंटुंबात व सेवकात मर्यादांची अगरबत्ती लावून ती टिकविण्याचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे.
⏩प्रत्येकाने आपल्या कुंटुंबात व सेवकात किंवा परिवारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी छोटे किंवा मोठे किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीशी मर्यादेने वागायला पाहिजे कारण या मध्ये भगवंताच्या कार्यामध्ये मर्यादा ही टिकून राहत असते.
⏩तसेच बाबांनी आपल्याला दिलेले 4 तत्त्व, 3 शब्द, 5 नियम व बाबांचे आदेशाचे पालन आपल्या कुंटुंबात व सेवकात करणे म्हणजे आपल्या सेवकांची मर्यादा होय.
     
सेवक : प्रशांत मानापुरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】

बाबांनी भगवत गुणांचे 3 शब्द दिले आहेत त्यातील २रा  मर्यादा पाळणे हा दुसरा शब्द आहे, यावर मी माझे विचार देण्याचा प्रयत्न करत आहो.

आपला मार्ग हा एकतेचा आहे आणि सत्य मर्यादा प्रेमाचा आहे. ज्याप्रमाणे आपण कुटुंबात सत्याची वागणूक करतो त्यातून मर्यादा निर्माण होते आणि आपली शिकवणही टिकून राहते.

सर्व प्रथम आपल्याला आपल्या कुटुंबात मर्यादेचे पालन करायचे आहे, आई,वडिलांचं किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा मान ठेवून त्यांनी सांगितलेलं काम करणं यातून मर्यादा दिसते त्याचप्रमाणे आपल्यापेक्षा कोणी लहान असेल तर त्याला सुद्धा ती शिकवण मिळते.

खरी मर्यादा ही एका परमेश्वराचे कार्य करणे आहे, कारण आपण रोज विनंती मध्ये वचन देतो त्याला पालन करायचं आहे.
या मार्गात शिक्षित,अशिक्षित, गरीब,श्रीमंत अस काही चालत नाही कारण हा भेदभाव आहे ही मार्गाची शिकवण नाही सर्व सेवक समान आहेत असे आपल्याला समजायचे आहे आणि मर्यादेत राहायचे आहे.

सेवकांसोबत नमस्कार घेऊन बोलणं हि खरी मर्यादा आहे.व्यवहारात काम करत असताना आपला व्यवहार हा पारदर्शी असायला पाहिजे त्यातून मर्यादा दिसते.
त्याचप्रमाणे  दैनंदिन जीवनात आपले काम करत असताना  मार्गातील सेवक असो किंवा अनेकतील असो सर्वांशी आपल्याला मर्यादाच पालन करायचे आहे कारण कोणालाही दुखवू नये आणि आपला स्वार्थपणा साधु नये.
आपण मानव धर्माचे सेवक आहोत याचा चांगला परिचय लोकांना दयावा हि विंनती.
माझ्या लिहण्यात काही चुकलं असेल तर माफ करा.

सेवक : हितेश मेश्राम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】

बाबानी भगवत गुणांचे 3 शब्द दिले आहेत त्यापैकी दूसरा शब्द मर्यादा पाळणे

▶ मर्यादा पाळणे ◀

▶ बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की, त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे.
 स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेन बोलले पाहिजे.
▶ प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे.
▶ लहानांनी मोठ्यांशी वागतांना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे.
▶ सेवकांनी सेवकांशी वागतांना मर्यादेने वागावे.
▶ इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे. तो भेदभाव आहे.
▶सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत. बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे. ही खरी मर्यादा आहे. ती पाळली पाहिजे.
▶ मर्यादा पाळल्यामुळे घरात, आपआपसांत प्रेम निर्माण होते.
▶ त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख, समाधान मिळते.
▶ एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते.
▶ त्यामुळे सत्य व्यवहार होतात.
▶ काही चूक भूल झाल्यास माफ़ करावे

सेवक : रोशन दमाहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】

➖प्रत्येक मानवाने *मर्यादाशील* असणे आवश्यक आहे.
➖लहानांनी मोठ्यांशी वागतांना किव्वा मोठ्यांनी लहनांशी वागतांना एकमेकांविषयी *मर्यादा* ठेवली पाहिजे.
➖सेवकांनी सेवकांशी वागतांना *मर्यादेने* वागले पाहिजे. 
➖सर्व सेवक भगवंताला सारखे आहेत*, बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे.
ही खरी मर्यादा आहे, व ती सर्वांनी पाळलीच पाहिजे .
➖मर्यादेचे* पालन केल्यामुळे घरात, आपापसात प्रेम निर्माण होतो व त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते, एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होतो आणि सत्याचे व्यवहार होतात.

माझ्या लिहिण्यात काही चुका झाल्या असतील तर मी सर्वांना क्षमा मागते

सेवक : श्वेता आथीलकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】

बाबाने भगवत गुणाचे 3शब्द दिले आहे आपल्या कटुंबात व सेवकात

2 शब्द मर्यादा पाळणे यावर भी माझ विचार देत आहे ,बाबा जुमदेवजी यांनी अहो रात्र परिश्रम करुण एका भगवंताची प्राप्ती करुन हि परमेश्वरी कृपा सर्व सेवकांना वाटुंन दिली महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी माझा सेवक सिकायला पाहीजे म्हणुन गांवोंगावी दौरे करुन एका परमेश्वरा बद्दल सांगितले बाबा नहीं सर्व पुजा बंद केली आणि सेवकांना पन सांगीतले या मार्गातिल सेवकांनी कुटुंबात व सेवकात मर्यादा पाळली पाहिजे स्रियांनी पत्नी सी मर्यादा ने बोलले पाहिजे या मार्गात प्रत्येक मानवाने मर्यादा सिल वागले पाहिजे कुटुंबा मध्दे मोठ्यानी लहानासी लहानांनी मोठ्यासी एक मेका विषय मर्यादा ठेवली पाहिजे सेवकांनी सेवकाशी मर्यादाने वागले पाहिजे सेवक गरिब असो की श्रीमंत सुक्षिशित असो किंवा अशिक्षित त्याच भेदभाव नको असायला पाहीजे तिथच मर्यादा असते सर्वच सेवक परमेस्वराला सारखे आहेत आणि सर्वाला सारखे तत्व, शब्द नियम दिले आहेत म्हणून कोनताही मनात द्देव्श उच निच हा भेदभाव नाही निर्माण होन हिच खरी मर्यादा पाळणे होय आणी जिथ मर्यादा चे पालन होते त्याच्या पाठिसी परमेश्वर उभा असते आणि त्या कुटुंबात  आप आपसात प्रेम निर्मान होते आणि त्याच्या जिवनात सुख समाधान शांती मिळते व प्रेमाची भावना व सत्य व्यवहार होता तो बेच आहे मर्यादा पाळणे 

चुक भुल माफ कराल
सेवक : उमेश बुधे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य :
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻  युवा सेवकांचा ग्रूप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages