✍ बाबानी आपल्याला ५ नियम दिले आहेत त्यापैकी १ ला नियम "ध्येयाने एक परमेश्वर मानणे" या नियमाचा अर्थ काय आहे ❓ - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

✍ बाबानी आपल्याला ५ नियम दिले आहेत त्यापैकी १ ला नियम "ध्येयाने एक परमेश्वर मानणे" या नियमाचा अर्थ काय आहे ❓

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

दिनांक : २६ ऑक्टोबर २०१८ शुक्रवार

 चर्चा बैठकीचे विषय 】

✍ बाबानी आपल्याला ५ नियम  दिले आहेत त्यापैकी १ ला नियम  "ध्येयाने एक परमेश्वर मानणे" या नियमाचा अर्थ काय आहे ❓  

【 विचार क्रमांक १ 】

♦ जीवनात चालण्या करीता, गृहस्थी उंच आन्याकरीत मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्या करीता बाबानी पाच नियम दिले आहे.


! त्यापैकी १ ला नियम !

१). ध्येयाने एकच परमेश्वर मानने.

♦ ध्येय म्हणजे एक चित्त एक लक्ष भगवान. मानव धर्माचा स्वीकार तर कोणी पण करू शकतो पण ज्याचे ध्येय हे मजबूत असेल तोच टिकून राहतो. मानव धर्मातील सेवकांचे ध्येय एवढे मजबूत पाहिजे की, लात मारला तर पाणी निघायलाच पाहिजे.
आपल्या वर कितीही मोठे संकट आले तरी, आपण आपले ध्येय मजबूत ठेवायला पाहिजे.
♦ जर एखादे काम आपल्याला करायचे असले तर तो काम पूर्ण करायलाच पाहिजे व तो काम करतांना अनेक अडचणी येतात पण ध्येय आपले 'तो काम पूर्ण करायलाच पाहिजे', याचा कडेच ठेवायला पाहिजे.
♦ म्हणून सेवकांनो जास्तीत जास्त भगवत कार्याला वेळ द्या.

नमस्कार....!


सेवक : कौशिक कनोजे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】

♦ बाबांनी आपल्याला 5 नियम दिले असून त्या मधला 1ला नियम "ध्येयाने एक परमेश्वर मानणे "याचा अर्थ सर्व देवी देवतांचे विसरजन करुन तसेच आपल्या अंगी असलेल्या मोह माया अहंकार व वाईट विचार यांना दुर ठेवून सत्य मर्यादा प्रेम व दया क्षमा शांती अंगी करुन एक लक्ष्य एक चित्त एक परमेश्वर आपले मन एकाग्र करुन परमेश्वराची आराधना करने माझ्या परी मी आपले विचार व्यक्त केले काही चुक भुल झाली असेल तर माफ करावी आपला सेवक भाऊ। नमस्कार जी सर्वाना


सेवक : अशोक पुरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】


♦ आजच्या विषयावर मी माझे विचार देण्याचा पर्यंत करतो. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपले देह शरीर चंदनासारखे झिजवून एक भगवंताची प्राप्ती करून दुःखी कष्टी मानवाला मुक्त सेवकांना सुखी समृद्धी बनविले. 
♦ मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्यासाठी बुद्धी दिली आहे. जेणेकरून तो आपल्या बुद्धी चा वापर करून एक चित्त एक मन एका परमेश्वराची ओळखील त्याचा बरोबर मोह, माया, अहंकार, यांना बाजूला ठेऊन त्यांचे लस परमेस्वरांकडे राहील आणि परमेश्वरी कृपा आपल्या मानवी जीवनाला सुखी करेल. 
♦ परमेश्वर एकच आहे आणि तो प्रत्यकात विराजमान आहेत तो निराकार आहे तो व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे. ती मानवात चोवीस तास कार्य करीत असते फक्त एक चित्त एक मनाने मानावे 
♦ लिहिण्यात काही चूक झाली असेल तर मी बाबा हनुमान जी आणि बाबा जुमदेवजी ला माफी मागतो. 

नमस्कार


सेवक : दयाराम लिचडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ४ 】


♦ ध्येयाने एक परमेश्वर मानणे

♦ बाबांनी आपल्याला या मार्गामध्ये मानवाची खालच्या स्तरावर गेलेली घर गृती उंच येण्यासाठी आपल्याला पाच नियमाचे पालन करणे असते त्यांपैकीं
१)ध्येयाने एक परमेश्वर मानणे
♦ एकक चित्त एक लक्ष परमेश्वर शक्ती वर विश्वास ठेवणे म्हणजे ध्येयाने एक परमेश्वर मानणे आपल्या वर किती ही संकट आले त्या क्षणी मनात परमेश्वर ची आठवण असणे गरजेचे आहे जेव्हा आपण परमेश्वर चे नाव घेऊ तेव्हा आपले कार्य सुध्दा सफल होतील आणि आपली घर ग्रस्तही उंचावेल त्यासाठी आपल्याला बाबांनी ध्येयाने एक परमेश्वर मानणे हे नियम दिलं आहे.

♦ माझ्या लिहण्यात काही चुका झाल्या असतील तर मी सर्व प्रथम भगवान बाबा हनुमान जी ला माफी मागतो महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो सर्व सेवक दादा व सर्व सेवकिन ताईंना माफी मागतो..


नमस्कार


सेवक : राजेंद्र ढबाले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ५ 】


 ♦ ध्येयाने एक परमेश्वर मानणे या विषयावर आपले विचार व्यक्त करीत आहे. विचार ठेवतांनी काही चुका होतील, तर स्वयंम भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी व वाराणसी आई व सर्व सेवक दादा व ताई मला क्षमा करतील अशी मी विनंती करतो.
ध्येय म्हणजे एक चित्त, एक लक्ष, एक विश्वास, एक भगवान होय. एका ध्येयाने किंवा एका मनाने जर परमेश्वराला मानले तर आपले ध्येय विश्वास हे अधिक मजबूत कणखर बनते. महानत्यागी बाबा जुमदेवजीने सुध्दा आपले सर्व लक्ष परमेश्वराला केंद्रित केले होते. म्हणून ते एका भगवंताची प्राप्ती करू शकले. 
♦ आपले ध्येय त्यांनी कधीही डगमगू दिले नाही. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार आणिला नाही. त्यांचे लक्ष केवळ आणि केवळ एका भगवंत प्राप्तिकर होते. म्हणून परमेश्वरानी बाबांच्या कुटुंबातील दुःख दूर करून त्यांना सुखी व समाधानी बनविले. त्यावेळी त्यांनी आपल्या कुंटुंबाचा विचार केला असता किंवा मनात तसले विचार आणले असते तर त्यांनी आपले कुंटुंब कधीही सुखी बनविले नसते.
♦ बाबानी आपले ध्येय ज्या प्रकारे भगवंतावर केंद्रित केले त्या प्रकारे आपले नित्य करीत असताना परमेश्वरी नामस्मरण करून केवळ एका भगवंताचा जयजयकार आपल्या मनातून उमटविला. परमेश्वरविषयी श्रद्धा त्यांनी आपल्या मनात ठेवली. 
♦ या मार्गातील सेवकाचे दुःख दूर झाले ते एका परमेश्वरामुळे म्हणून आपण 24 तास एका भगवंताचे नामस्मरण करावे. कारण परमेश्वर प्रत्येक जिवात्म्यात आहे. आणि जेवढे आपन भगवंताचे नामस्मरण करू तितकाच परमेश्वर आपल्या जवळ राहतो.




सेवक : प्रशांत मानापुरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ६ 】


♦ बाबा जुमदेवजींनी आपल्या सर्व शेवकांना जी शिकवण दिलेली आहे. त्या आधारावरच संपूर्ण जीवन जगने .कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा आपल्या मार्गाचे विचार न सोडता आपल्या भगवंताचे स्मरण करून आनंदात राहणे .व आपल्या कामात आपला विश्वास ठेवून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणे . म्हणजेच ध्येयाने एक परमेश्वर मान्य होय.


सेवक : ग्यानिराम गभने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ७ 】



♦ भागवत प्राप्ती करिता व निःक्कम कर्म योग साध्याण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत त्यातील 1-ध्येयाने एक परमेश्वर मनाने
उत्तर-मानव धर्मात जन्म झाल्या पासून तर मरेपर्यंत एकाच देवाची उपासना करणे.


सेवक : प्रशांत बोरकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य

ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages