✍ बाबानी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी दुसरा नियम "सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे" या नियमाचा अर्थ काय ? - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

✍ बाबानी आपल्याला पाच नियम दिले आहेत त्यापैकी दुसरा नियम "सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे" या नियमाचा अर्थ काय ?

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"

दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१८ शनिवार
                                      ते
               ०९ ऑक्टोबर २०१८शुक्रवार

 चर्चा बैठकीचे विषय 】


✍ बाबानी आपल्याला ५ नियम  दिले आहेत त्यापैकी दुसरा नियम  "सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे" या नियमाचा अर्थ काय आहे ❓  

【 विचार क्रमांक १ 】

-: सत्य :-


सत्य हे कटू असते. नेहमी सत्याचेच आचरण ठेवायला पाहिजे. सत्य शेवट विजय सत्याचीच होतो. एखाद्याने आपल्या मानावर सूरी ठेवली तरी आपण सत्याचेच आचरण ठेवायला पाहिजे. सत्य ही परमेश्वर है, परमेश्वर ही सत्य है.

-: मर्यादा :-

आपण सेवकांनी सर्वांन सोबत मर्यादाचा भान ठेऊनच बोलायला पाहिजे. कारण मर्यादा भंग झाली तर प्रेम डगमगतो. व मग राग निर्माण होतो. म्हणून कोणी कितीही लहान व मोठा असेल तरी मर्यादातच बोलाला पाहिजेत. व सर्वांन सोबत नमस्कार घेत चला. एक उदाहरण सांगू इच्छितो,

उदा. 👉 एक बर्फाची फॅक्टरी असते, तिथे काम करणारे कर्मचारी असतात व गेट जवड security gaurd असतो. एक दिवस असा होतो की, सायंकाळ होतो सर्वांची सुट्टीची वेळ होतो आणि कर्मचारी निघतात जायला. तेवढ्यात एक कर्मचारी काम बंदच करत असतो तेवढ्यातच मशीन बिघडतो आणि तो सुधरवण्यात लागतो. व बाकीचे सर्व कर्मचारी जायला निघतात व दार पण बंद करतात. याचा लक्ष नसतो हा मशीन सुधरवतच राहतो, खूप रात्र होतो आणि मग मशीन सुधरतो. तो निघायला जातो पाहते तर दार बंद असते. तो खूप आवाज मारतो, ओरडतो आणि थंडी पण वाढतो तिथली. तेवड्यात security gaurd येतो आणि दार उघडून त्याला वाचवतो. कर्मचारी विचारतो सर्व गेले न तू का करतोस इथच. Security gaurd म्हणतो, मला कित्तेक तरी वर्ष होतील ह्या बर्फाच्या कंपनीत काम करत आहे तर. खूप सारे कर्मचारी येतात आणि आपला कामाशी काम ठेवतात. पण तुम्हीच असे एक आहात की रोज सकाळी अंदर येतांनी व सायंकाळी घरी जातांनी माझ्याशी नमस्कार घेता. झालं असं की आज तुम्ही आत येतांनी नमस्कार घेतला मात्र बाहेर जातांनी तुम्ही नमस्कार घेतले नाही. म्हणून मला काहीतरी वाटलं, आणि मी तुम्हाला वाचवाला आलो आणि वाचवलो.

-: प्रेम :-

जर आपण सत्य आणि प्रेमाचे आचरण केलो तर, प्रेम आपोआप दिसून येतो.

म्हणून👉 सत्य,मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे.


सेवक : कौशिक कनोजे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक २ 】



बाबांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीनुसार सत्य कायम स्मरणात ठेवावे. शेव कात व कुटुंबात समाजात प्रेमाने म्हणजेच मनात कुणाही प्रती वाईट विचार किंवा आकस न ठेवता स्वच्छ भावनेने व्यवहार करावे .आपण कोणत्याही कार्यालयात काम करत असल्यास त्या कार्यालयात त्या पदाची जबाबदारी समजून आपण आपलं कर्तव्य पार पाडावे .आपल्या कुटुंबात मर्यादित आपण वागले पाहिजे सेवका प्रती व कुटुंबातील सदस्याप्रती आदर व प्रेमळ भावना स्वतःमध्ये कायम जागृत ठेवावी. व बाबांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्यास सर्वांनी आपले कर्तव्य समजावे .यामधूनच एक चांगला समाज चांगलं कुटुंब व बाबांचे चांगले सेवक म्हणून आपल्याला ओळख करता येईल वरील गोष्टीचं आचरण म्हणजेच सत्य मर्यादा व प्रेम कुटुंबात कायम करणे होय .असे माझे विचार आहेत .काही चूक झाली असल्यास मी भगवंताजवळ क्षमा याचना करतो .नमस्कार.


सेवक : प्रमोद गभने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

【 विचार क्रमांक ३ 】


आजचा विषय छान आहे, आजच्या विषयावर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. 


#सत्य #

सत्य कटू असते पण परमेश्वराला प्रिय असतो. सत्य म्हणजे आपल्या हातून काही चूक झाली असेल तर काय दुःख येईल याची चिंता न करता आपल्या अंतर आत्म्यातून न घाबरता निघालेले कटू सत्य म्हणजे सत्य होय. 
सत्य म्हणजे समोरच्या यक्तीमनावर कोणताही परिणाम हवाय याची तमन्ना न बाळगता निघालेला शब्द होय. व मानवाच्या मानेवर जर सूरी कोणी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे कारण म्हणतात ना "भगवान के घर मे देर है, अंधेर नही "या मणी प्रमाणे सत्य सुध्दा उशिरा कळते. या मानव धर्मातील जागृत शक्ती ही सत्य आहे. 

#मर्यादा #

महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपले देह (शरीर )चंदनासारखे झिजवून एका भगवंताची प्राप्ती करून दुःखी कष्टी मानवाला मुक्त करून सेवकांना सुखी समृद्ध बनविले. 
मर्यादा म्हणजे एका यक्तीने दुसऱ्या यक्तीचा केलेला मान सम्मान आणि बिकट परिस्थितीत त्या यक्तीला केलेलं सहकार्य हे आपले कर्तव्य, दक्षता तसेच मर्यादा आहे. 
प्रत्यकाने आपल्या कुटुंबात व सेवकात किंवा परिवारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी छोटे किवा मॊठे किंवा वडीलधाऱ्या यक्तीशी मर्यादेनेच वागायला पाहिजे कारण यामध्ये भगवंताच्या कार्याची मर्यादा टिकून राहते 

#प्रेम #

प्रेम हा शब्द अडीच अक्षराचा आहे पण त्याच्यात खूप ताकत आहे. सेवकात तसेच कुटुंबामध्ये नेहमीच प्रेमाचे आचरण ठेऊन कोणतेंही कार्य करायला पाहिजे 
प्रेमाचे पण प्रकार आहेत. पण जे प्रेम आपल्याला चांगले वाटते तेच प्रेम आपण आपल्या आचरणात आणायला पाहिजे. नेहमी प्रेम वाटा प्रेम हा भगवंताचा आवडता गुण आहे. आपल्या मनात सर्वा विषयी प्रेम असणे गरजेचे आहे जिथे राग येतो. तिथे प्रेम नाही 
म्हणून म्हटले आहे कि धायी अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. 
लिहिण्यात माझी काही चूक झाली असेल तर तर मी भगवान बाबा हनुमानजीला आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो. 


सेवक : दयाराम लिचडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले 
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सौजन्य

ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages