मार्गातील सेवकांकरिता नियम - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

मार्गातील सेवकांकरिता नियम

मार्गातील सेवकांकरिता नियम



➤ कोणत्याही मंदिरात किंवा तिर्थस्थानावर कोणत्याही देवाला नमस्कार करु नये.

➤ अनेकवाल्याकडे गेल्यास त्यांनी केलेल्या पूजेला नमस्कार करु नये. आरती घेवू नये आणि दुःखाला पात्र होवू नये. त्यांच्याकडे फक्त जेवण घ्यावे.

➤ पुजेला जीवदान दिलेली वस्तू कोणाच्याही कडे खाऊ नये. उदा. कोंबडा, बकरा इत्यादि.

➤ या मार्गातील सर्व सेवकांनी आपल्या कुटूंबात व सेवकांत खरे बोलावे. मर्यादा पाळावी, प्रेमाने वागावे.

➤ मठाधिपतींनी निर्माण केलेल्या सर्व संस्थांशी खरे व्यवहार करावे.

➤ सेवकांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच इतर सेवकांनी दिलेल्या वचनाचे (शब्दाचे) पुर्णपणे पालन करावे. अन्यथा शब्द देऊ नये.

➤ आपल्या कुटूंबात व जीवनात कोणत्याही प्रकारची जुनी भावना येऊ देऊ नये. यावर कर्त्यापुरुषानी लक्ष ठेवावे आणि दुःख आल्यास त्याने त्यांची पुर्ण छानबीन करावी. कारण बाबाच्या लक्षात आले आहे की, सेवक भावना उत्पन्न करुन दुःख आणतात.

➤ घरात कुणी, दारु पिऊन आला तर त्याला प्रथमच घरात घेऊ नये. परतू अचानक आल्यास आणि लक्षात आल्यास त्याला काहीही खाण्यास किंवा पिण्याकरिता देऊ नये. व त्याला घराबाहेर जाण्यास सांगावे, घरासमोर "दारु पिऊन येऊ नये" अशी पाटी लावावी.

➤ शारीरिक दुःख झाल्यास भगवंताला समोर ठेवून उपचार करावेत.

➤ मार्गात आल्यावर त्यागातील काही चूका होतात. त्यामुळे संपूर्ण दुःख दुर होत नाही किंवा त्याला सारखी दुःखे येतात. आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्याचे त्यागाचे कार्य सफल झाले नाही हे समजून पुन्हा ११ दिवसाचे साधे कार्य घ्यावे. त्यानंतर ४१ दिवसाचे कार्य घ्यावे.


➤ ज्या सेवकाकडून प्रथम मार्ग घेतला असेल त्याच सेवकाकडे जाऊन आपले दुःख सांगावे आणि त्याच्या कडूनच मार्ग घ्यावे, शक्यतोवर दुसऱ्याकडे जाऊ नये.


➤ कोणालाही दु:ख झाल्यास आपले दु:ख (अडचण) स्वतःची चूक लक्षात आणून स्वतःचे दुःख दुर करावे. सेवकासमोर एकाएकी दुःख सांगू नये. जर दुःख दुर होत नसेल तर ज्याच्यापासून मार्ग घेतला असेल त्याच्याकडे मार्गदर्शनाकंरिता जावे.

➤ कुटूंबात जर कोणी व्यसन करायला सुरवात केली तर त्याला कुटूंबात ठेवू नये अन्यथा मार्गाच्या बाहेर व्हावे. तसेच त्या सेवकाला इतर सेवकांनी आपल्या कार्यात ठेवू नये. इतकेच नव्हे तर त्याच्याशी संबंध विच्छेद करावा. अशा सेवकांविषयी मार्ग देणाऱ्या सेवकांजवळ किंवा मठाधिपतीजवळ शिफारस घेऊन आलेल्या सेवकास जर आपत्ती आली तर तो स्वतः जिम्मेदार राहील.

➤ सेवकांच्या कुटूंबावर आपत्ती आली किंवा सेवकास देवाज्ञा झाली असता कोणत्याही सेवकाने त्यास सहकार्य केले तर त्याचा मोबदला घेऊ नये. निष्काम कार्य करावे.

➤ सहकार्यकर्त्यांनी आपले चारित्र्य सांभाळून एखाद्याच्या कुटूंबात एकट्याने जाऊ नये. जेणेकरुन दुसऱ्यास शंका येईल. निष्काम भावनेने कार्य केल्यास दुसर्या सेवकाने काही शंकाकुशंका केली तर त्याने पुराव्यासहीत ती शंका दुर करावी. जवाबदार सेवकापुढे ही गोष्ट आल्यास आणि पुरावा मिळाल्यास अशा सेवकाला मार्गातून काढण्यात यावे. अन्यथा निव्वळ शंका करणारा सेवक खोटी बदनामी करित आहे असे समजावे व त्याच्याशी संबंध ठेवू नये. याप्रमाणे मठाधिपतींना किंवा मंडळाला कळवावे.

 मंडळाकडून काही आदेश निघाल्यास ज्याप्रमाणे आदेश राहील त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे. काही शंका असल्यास मंडळास विचारण करावी. प्रत्येकाने मठाधिपतीकडे जाऊन वेगवेगळे विचारू नये. बाबांना असे आढळले आहे की, दि. २१/१२/९० पासून साधे कार्य देण्यात आले होते. परंतू बऱ्याच सेवकांनी स्वेच्छेने त्यागाचे कार्य केले हे महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाच्या विरुद्ध कार्य झाले ते बरोबर नाही. यावर सेवकावर आपत्ती आल्यास तेच सेवक जवाबदार राहतील. कोणत्याही सेवकाने त्यांची अडचण ऐकू नये. कारण मंडळकडून निघणारे आदेश बाबांच्या आदेशनुसारच निघतात.


➤ सेवकाचे साधे कार्य सुरु असतांना इतर सेवकाकडे हवनाला गेल्यास हवनात बसून आहूती टाकता येणार नाही.

सेवकांनी सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे...
नमस्कार जी.....

काही शंका असल्यास खाली Comment करावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages