● मार्गात येणाऱ्या नवीन सेवकांकरिता नियम ●
०२】 जुने विचार जे अंधश्रद्धेबाबत आहेत ते विसरावे.
०३】 तांत्रिक व मांत्रिक लोकांच्या हाताने तयार केलेले धागे-दोरे तोडावे.
०४】 घरात बांधलेले दोरे, लिंबु आणि इतर वस्तू तोडून फेकाव्यात.
०५】 सर्व देव-देवतांच्या मुर्ती आणि फोटोचे विसर्जन करावे.
०६】 कोणत्याही मंदिरात किंवा तिर्थस्थानावर कोणत्याही देवाला नमस्कार करु नये.
०७】 मार्गात येणाऱ्या लोकांनी सेवकांशी खरे बोलावे. मर्यादा पाळावी आणि प्रेमाने वागावे.
०८】 महानत्यागी बाबा जुमदेवजींनी निर्माण केलेल्या सर्व संस्थांशी खरे व्यवहार करावे.
०९】 कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन जे मानवी जीवनाला खाली उतरवितात ते संपूर्ण आयुष्यात बंद करावे. उदा. दारु, जुवा, सट्टा, लॉटरी कोंबड्याची काती, पटाची होड, इत्यादि तसेच नवीन पिढीला या मार्गाची शिकवण वडील लोकांनी द्यावी.
१०】 या मार्गात येण्याकरिता ते ज्या सेवकांकडे मार्ग घ्यावयास जातील त्याच्या जवळ आपल्या कुटुंबातील दुःखाचे कारण सांगावे. कितीही मोठी गोष्ट असली तरी त्याचे स्पष्टीकरण करावे. उदा. चारित्र्य हनन (हीन), स्त्री किंवा पुरुष असो त्याचेही न लाजता स्पष्टीकरण सांगावे. त्यामुळे एक भगवंत त्याची पुर्ण मुक्ती करतो व त्याला मोक्ष मिळतो. त्याने जर कोणतीही गोष्ट लपवून ठेवली तर मार्गात आल्यावरही दुःखे येतात. आणि मार्गात पुर्णपणे लाभ मिळत नाही.
११】 मार्गात येणाऱ्या प्रमुखांनी आपल्या कुटूंबाचे एकमत करावे. व मार्गाची रुपरेखा सर्वांना समजावून सांगावी.
१२】 सेवकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कार्य घडवावे.
१३】 नवीन येणार्या सेवकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव मिळाल्यानंतर जीवनात कोणत्याही प्रकारची भावना मनात उत्पन्न करू नये. "मरे या जीये भगवत् नाम पर" या तत्वाप्रमाणे जीवनात ध्येयाने एकच भगवंत मानावा.
१४】 शारीरिक दुःख आल्यास भगवंताला समोर ठेवून डॉक्टरी उपचार करावे.
१५】 बाबांनी दिलेल्या शिकवणीचे तंतोतंत पालन करावे.
१६】 ४२ दिवसांचे त्यागाचे कार्य पुर्ण झाल्यावर ९ महिने ९ हवने करावी लागतात. अशा वेळेस समाप्तीच्या हवनाची तारीख सोडून दसरी कोणतीही तारीख निश्चित करुन त्याच तारखेवर प्रत्येक महिन्यात हवन करावे.
१७】 ९ महिन्यांच्या हवनात जर कुटूंबात घरच्या बाईला अडचण आली (मासीक पाळी) आणि हवनाची तारीख त्या काळात आली तर त्या महिन्याच्या हवनाची तारीख पाचवी आंघोळ झाल्यावर हवन करावे. आणि त्यापुढील महन्याचे हवन मात्र पुर्वी ठरलेल्या तारखेलाच करावे. कुटूंबातील दुसरी बाई हवनाची तयारी करणारी असल्यास हवनकार्य ठरलेल्या तारखेला करता येईल.
१८】 पहिले हवन घडवितांना बाहेरील पाच सेवकांना इच्छेनुसार हवनात बसता येईल. पण त्या पुढील ९ महिने त्याने एकट्यानेच करावी. दुसर्या सेवकाने फक्त त्याच्याकडे तो हवन कसा करतो या कडे लक्ष द्यावे, आणि मार्गदर्शन करावे.
१९】 नवीन मार्गात येणाऱ्या लोकांच्या कुटुंबात जर कोणी बाई चारित्रहीन असेल अशा बायांनी मार्ग देणाऱ्या सेवकांकडे त्याबद्दल स्पष्ट खुलासा करावा. सत्य उल्लेख केल्यावर त्या बाईने भगवंतासमोर जीवनात चारित्रहनन करणार नाही असे सत्य वचन द्यावे. आणि क्षमा मागावी. म्हणजे त्या बाईला दैवीशक्ती मुळे भगवंत मुक्ती देतो. सत्य वचन आणि क्षमा मागीतल्याशिवाय त्या कुटूंबाला मार्ग देता येणार नाही.
२० 】 साधे किंवा त्यागाचे कार्य सुरु असतांना त्या कुटुंबातील बाईची मासीक पाळी आल्यास तिला कार्यात बसता येणार नाही. पाचवी आंघोळ झाल्यावरच कार्यात बसावे. परंतू घरात कोणी करणारे नसतील तर घरात वापरता येईल.
नमस्कार जी .....
नमस्कार जी .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा