महानत्यागी बाबा जुमदेवजींचे देहावसान - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

महानत्यागी बाबा जुमदेवजींचे देहावसान

महानत्यागी बाबा जुमदेवजींचे देहावसान


अंत्ययात्रा दिनांक ७.१०.९६ ला सकाळी १० वाजता

       परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बैँक, परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय ग्राहक भांडार, परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक "महान त्यागी बाबा जुमदेवजी" यांचे दुःखद निधन गुरूवार दिनांक ३.१०.९६ रोजी रात्री ११.३५ ला झाले.

      बाबांचा जन्म दिनांक ३ एप्रिल १९२१ ला झाला. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ५१ वर्षापूर्वी एका भगवंताची प्राप्ती करून अनेक गोर-गरीब मानवांना व्यसनमुक्ती व अंधश्रद्धेतून मुक्त केले. बहुजन समाजातील हजारों लोक त्यांचे अनुयायी झाले असून मानवांच्या सर्वांगीण उन्नतीकरिता बँक, ग्राहक भांडार, दुग्ध संकलन केंद्र, वाचनालय, धर्मार्थ दवाखाना, वसतीगृह इत्यादी संस्था स्थापन करून गोरगरीब जनतेला सामाजिक, आर्थिक, व शारीरिक लाभ मिळवून दिले आहे. उपरोक्त कार्य सफल करण्याकरिता बाबांनी अहोरात्र परिश्रम करून त्यागाने संस्थेस नावारूपास आणलेले आहे.

       महान त्यागी बाबा जुमदेवजींचे सुपुत्र डॉ. मनो ठुब्रीकर हे अन्त्ययात्रेत सामिल होण्याकरिता अमेरिकेतून दिनांक ६.१० ९६ ला सायंकाळी ५.०० वाजता विमानाने नागपूरला आले होते. बाबांची अंत्ययात्रा दिनांक ७.१०.९६ रोज सोमवार सकाळी ११ वाजता बाबांचे निवासस्थान टिमकी येथून निघून त्यांच्या पार्थिव देहावर गंगाबाई घाट येथे लाखोच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार व हजारोंच्या संख्येने बाबांचे सेवक आहेत.

1 टिप्पणी:

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages