महानत्यागी बाबा जुमदेवजी
ग्रामस्वच्छता अभियान उद्या
बहुउद्देशीय परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी नगर पंचायत कार्यालय मोहाडी जि.प. हायस्कुल महाविद्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान रविवार दि. २९ जानेवारी २०२३ ला सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर स्वच्छता अभियान बहुउद्देशीय परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन मोहाडी येथे होणार आहे. व कनिष्ठ देशपांडे व प्रमुख अतिथी न.प. मोहाडी मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम हे राहणार असून उपस्थिती मध्ये जि.प. मोहाडी प्राचार्या सुषमा पांडेय, जि. प. भंडारा नरेश ईश्वरकर, यशवंतराव ढबाले, नरेश सव्वालाखे, देवा ईलमे, सचिन गायधने, वंदना पराते, देवश्री शहारे, जोतीष नंदनवार, पवन चव्हान, हेमचंद पराते, महेश निमजे, यादोराव कुंभारे, निशा निमकर, न.प. मोहाडी नगरसेविका रेखा हेडाऊ, यशवंत थोटे, सिराज शेख, उमेश मोहतुरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवक सेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोरेश्वर सार्वे यांनी केले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मोहाडी न.प.च्या नगराध्यक्षा छाया डेकाटे यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक मोहाडी राहुल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा