मोहाडी येथे सामुहिक हवनकार्य ३० जानेवारीला - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

रविवार, २९ जानेवारी, २०२३

मोहाडी येथे सामुहिक हवनकार्य ३० जानेवारीला

मोहाडी येथे सामुहिक हवन कार्य ३० जानेवारीला

            भंडारा बहुउद्देशीय परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी यांच्या वतीने भव्य सेवक संमेलन, व्यसनमुक्ती व सामुहिक हवन कार्य सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ ला सांस्कृतिक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आध्यात्मिक प्रमुख मानवधर्म प्रचारीका लता दिलीप बुरडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून य. म. ढबाले हे राहणार आहेत. या कार्यक्रमात रामेश्वर बिलवणे आकोट, वासूदेव सिंदेघनसुर ताडगाव, जयपाल पटले नागपूर, मार्तंड हुकरे दिघोरी / मोठी यांचा गौरव होणार आहे. तर मोहाडी येथील शिवशंकर सोरते, शंकर मारबते, दुर्गा मेहर, रेणुका बावणे यांचा सत्कार होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनिल मेंढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले, आ.राजु कारेमोरे, आ. नरेंद्र भोंडेकर, विधान परिषद सदस्य परिणय फुके, आ. अभिजित वंजारी, आ.राजु जैन, पो. नि.मोहाडी राहुल देशपांडे, माजी जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, न.प. मोहाडी मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, शाखा अभियंता विनोद मस्के, डॉ. आशिष माटे, नरेश दिपटे, अभय ढेंगे, अनिल गायधने अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे. दि. ३० जानेवारीला सकाळी ९ ते १० सामुहिक हवनकार्य, सकाळी १० शोभायात्रा तसेच रविवार दि. २९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजतापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. असे आयोजक यशवंतराव ढबाले, नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजु पिल्लारे, नत्थु कोहोड, भगवान पिल्लारे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages