सिरसोली येथे कोजागिरी कार्यक्रम - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

सिरसोली येथे कोजागिरी कार्यक्रम

 


✨ कोजागिरी कार्यक्रम 🙏
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा सिरसोली येथे कोजागिरी निमित्ताने भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
चंद्रप्रकाशात भक्ती, सेवा आणि सद्भावनेचा संदेश देत सर्वांनी एकत्र येऊन कोजागिरी साजरी केली 🌸



सिरसोली येथे कोजागिरीचा उत्सव उत्साहात पार पडला

सिरसोली (ता. मोहाडी) येथे ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा सिरसोली येथे सर्व सेवकांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व समाजबांधव, सेवक, सेविका व युवक-युवतींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भगवंत व महाणत्यागी बाबा जुमदेवजी व वाराणशी आई यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंतराव ढबाले गुरुजी (अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी) यांनी भूषविले. मुख्य अतिथी म्हणून आध्यात्मिक प्रमुख लताताई दिलीपजी बुरडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये मोरेश्वरजी सार्वे (सचिव, अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी), राजुजी माटे (संचालक, अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी), नरेशजी ईश्वरकर (सभापती, भंडारा जिल्हा), दिनेशजी देशमुख (मार्गदर्शक, कन्हान), मदनलालजी कनोजे (कामठी), विलासजी शेंडे (अकोला), विजयजी दमाहे (खुटसावरी), स्वप्नीलजी बडवाईक (कान्द्री), शंकरजी मोहारे (सिरसोली), सरस्वता बाई माटे (संचालिका, अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी), रुपाली ताई मोहारे (सरपंच, ग्रामपंचायत सिरसोली), तुळजा आई ढबाले (मोरगाव) यांचा विशेष उल्लेखनीय उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश भाऊ सव्वालाखे (उपाध्यक्ष, अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी) यांनी केले. त्यांनी कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा व परमात्मा एक विचारधारेचा प्रसार व सेवाभाव याचे महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर लताताई दिलीपजी बुरडे, नरेश भाऊ इश्वरकर आणि मोरेश्वरजी सार्वे यांनी सेवकांना मार्गदर्शन करताना आध्यात्मिक उन्नती, सामाजिक एकता आणि मानवधर्माच्या तत्वांची प्रेरणा दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात यशवंतराव ढबाले गुरुजी यांनी अध्यक्ष, ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, सिरसोली मंडळाच्या कार्याची प्रशंसा करत सर्वांना “परमात्मा एक” या विचाराशी जोडून राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सांगता लताताई दिलीपजी बुरडे (आध्यत्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारिका)यांच्या मंगल मार्गदर्शनाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात धर्म,सेवाभाव, साधना आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मण माहुले यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मोरेश्वर दमाहे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संपूर्ण सेवक, सेविका, बालसेवक तसेच युवक मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कोजागिरीचा हा कार्यक्रम भक्तिमय आणि संस्मरणीय ठरला.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages