१】 मार्ग देणाऱ्या सेवकांनी नवीन मार्गात येणाऱ्या लोकांना दुःख आणि
त्याचा कुटूंबातील सर्व लोकांच्या दुःखाचे संपूर्ण स्पष्टीकरण ऐकावे.
२】 त्यानंतर त्याला या मार्गात येण्याबद्दलचे नियम सांगावे ते नियम संपूर्ण कुटूंबाने मान्य केले तरच त्याला वरील दुःखाबद्दल मार्गदर्शन करावे. अन्यथा मार्गदर्शन करू नये.
३】 कुटूंबाने एकमत झाल्याने व सर्व नियम बंधनकारक असल्याचे वचन
दिल्यावरच प्रथम ११ दिवसाचे साधे कार्य द्यावे. कसल्याही प्रकारचे
त्याग किंवा बंधन देऊ नये.
४】त्यानंतर २१ दिवसाचे साधे कार्य द्यावे. जोपर्यंत कुटूंबातील सर्वांना समाधान मिळत नाही तोपर्यंत साधे कार्य सुरु ठेवावे.
५】 पुर्ण समाधान मिळाल्याचे सांगीतल्यानंतरच ४१ दिवसांच्या त्यागाचे दिवस देण्या अगोदर मठाधिपतींना सेवकाबरोबर भेटून संपूर्ण स्थितीचे विवरण करावे आणि त्यांच्या आदेशप्रमाणे ४१ दिवसाचे त्यागाचे कार्य द्यावे. ४२ व्या दिवशी त्याची समाप्ती करण्यास सांगावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा